Submitted by अभय आर्वीकर on 14 August, 2013 - 04:25
लोकशाहीचा अभंग
आपुलिया हिता । असे जो जागता ।
फक्त त्याची माता । लोकशाही ॥
कष्टकरी जणू । सवतीचे पुत्र ।
वटारते नेत्र । लोकशाही ॥
पुढारी-पगारी । लाडके जावई ।
माफियांची ताई । लोकशाही ॥
संघटन, एकी । मेळ नाही ज्यांचे ।
ऐकेचना त्यांचे । लोकशाही ॥
मिळवुनी माया । जमविती धाक ।
त्यांची घेते हाक । लोकशाही ॥
वापरता तंत्र । दबाव गटाचे ।
तालावरी नाचे । लोकशाही ॥
सत्तापिपासूंच्या । द्वारी मटकते ।
रस्ता भटकते । लोकशाही ॥
चार पिढ्या सत्ता । एका कुटुंबाला ॥
म्हणू कशी हिला । लोकशाही? ॥
जनता 'अभय' । निर्भयाने व्हावी ।
ताळ्यावर यावी । लोकशाही ॥
- गंगाधर मुटे
------------------------------------------------
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....!
------------------------------------------------
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त रदीफ सारखा एक शब्द
मस्त
रदीफ सारखा एक शब्द शेवटी आणून केलेला अभंग वाचायाची माझी फार इच्छा होती..धन्स सर
वैवकु, अभंगात रदिफ़
वैवकु,
अभंगात रदिफ़ वापरण्याचा प्रयोग करून बघितला. बघुया प्रयोग कितपत यशस्वी होतो ते!
वास्तव मांडलंय ....
वास्तव मांडलंय .... त्याबरोबरच शेवटच्या कडव्यात आशावादही आहे हे फार बरं वाटलं.
खूपच छान!! निवडक दहात नोदं!
खूपच छान!!
निवडक दहात नोदं!
वैवकु, उल्हासजी,
वैवकु, उल्हासजी, गणेशजी
धन्यवाद!
खूप सुरेख....आणि नेमक्या
खूप सुरेख....आणि नेमक्या शब्दांत वास्तव !!
सुशांत खुरसाले, धन्यवाद.
सुशांत खुरसाले, धन्यवाद.
छान आहे.
छान आहे.
धन्यवाद अविनाशजी.
धन्यवाद अविनाशजी.