सुखाशी भांडतो आम्ही

Submitted by विरोचन प्रभु on 9 August, 2013 - 13:24

ऑफिस च्या कामातून जाम वैतागलो होतो , गेल्या २-३ आठवड्यातून साधे पुस्तक वाचायला पण वेळ मिळाला नव्हता त्यामुळे जास्तच वाईट वाटत होते , पण नेमके काल "सुखाशी भांडतो आम्ही " हे गिरीश ओक आणि चिन्मय मांडेलकर यांचे वैचारिक खाद्य पुरवणारे एक उत्तम नाटक पाहायला मिळाले. नाटक, गाण्याची मैफिल आणि काही उत्कृष्ठ मराठी सिनेमे ( मराठी कारण हल्ली हिंदीत उत्कृष्ठ म्हणण्यासारखे काहीच घडत नाहीये) या माझ्या आयुष्यातील अशा गोष्टी आहेत कि जिथे मी कोनात्याहीवेली आणि कुठेही एकटा जायला देखील तयार असतो, आणि नेमके कालही एकटाच गेलो.
अपले मन त्याचे प्रश्न त्याला आपणच घातलेली समजूत पुन्हा त्या सामाजुतीविरुद्ध बंड करून उठणारे ते मन आणि त्याला ताब्यात आणणारी आजची सो कोल्ड मेच्युअर्द मंडळी आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधत फिरणारी काही लोक ( ज्यांना समाज वेडे / इम्प्रेक्तीकल / असमंजस ) म्हणतो ... अशा दोन वेगवेगळ्या लोकांचे विचार, जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी , व्यावहारिक जीवन म्हणवताना स्वताच्या विचारांना घातलेली मुरड यासारख्या असंख्य गोष्टींचे विविध पैलू त्या अडीज तासात पाहायला मिळाले , चिन्मय ने रंगवलेली एका शुद्ध विचारांच्या वेड्याची भूमिका तर अप्रतिम .. आणि त्याच्या त्या प्रश्न उत्तरे देणारे गिरीश ओक यांची आणि आपली उत्तरे तंतोतंत जुळणारी. ..... प्रश्न उत्तराच्या या खेळत वेळ कसा संपतो तेच कळत नाही. आजच्या कळत घरातील मुलांना शिकवला जातो तो फक्त व्यवहार, पुढे जाण्याची वखवख .. त्यात प्रेम भावना यांना किंमतच नसते मुळी .. आजचे जग खरेच इतके वाईट झालेय कि ते माणसांनी जगण्याच्या लायकीचेच नाहीये हीच शिकवण तर त्यांना दिली जाते ... आणि तीच मुले उद्या मोठी झाल्यावर म्हणतात "मला अमुक एक गोष्ट मिळवायाचीये "AT ANY COST" ... आणि हीच COST .. पालकांना महागात पडते ....पण जेव्हा ती महागात पडल्याची जाणीव होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते घर समाज देश चांगले वाईट योग्य अयोग्य यासारख्या असंख्य विषयावर भाष्य करून आपलाच आपल्याशी असलेला झगडा दाखवणारे नाटक म्हणजेच "सुखाशी भांडतो आम्ही

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users