डळमळतो आहे आठवणींचा पूल जरासा

Submitted by सुप्रिया जाधव. on 9 August, 2013 - 12:12

अंदाजे दोन-एक वर्षांनी कामानिमीत्त आज डेक्कनला गेले होते. 'गुडलक' ला जस्ट पास झाले...खरतर अस डावलून पुढे जाववेचना! (सवय वाईटच म्हणा कोणतीही) गाडी पार्क केली, काम आटोपलं, चालत-चालत मागे फिरले अन गाठलचं गुडलक !

वेटींगही नेहमीचचं ! पण एकटीला ते प्रकर्षानं जाणवल. तेवढ्यात वेटर विचारत आला "आप सिंगल ना? तो आईये इधर !' टेबलाशी घुटमळत खुर्चीवर टेकले, भिरभिरत्या नजरेने सभोवार नजर टाकतेय तोच पाणी नि मेन्यूकार्ड हजर !!!

नजर तर मेन्यूकार्डवर होती पण डोळ्यांचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचत नव्हता, पाण्याचा तरल पडदा जो मधे आला होता दोघांच्या ! मिटवल त्याला तसचं.... ! अक्षयला कॉल करुन विचारल की चिकन-बिर्याणी अन खिमा आणू का रे पार्सल गुडलक मधून ? .....तो उडालेलाच !!! सावरुन पटकन म्हणाला मॉम एक काम कर बिर्याणी गरम गरम खाऊनच ये तू ... मस्त पावसाळी वातावरण आहे आणि तुझ्या आवडीचा गरमागरम रस्साही असेलच ना !
सो जस्ट एंजॉय ईट विथ मटका कुल्फी ! खिमा आण वाटल्यास ....!

ऑर्डर केली...ती टेबलावर येईपर्यंत बरीच सावरले.....ऑर्डर आली, प्लेटमधे थोडी सर्व्ह् ही केली...पण का कोण जाणे घमघमाट तर परिचयाचा होता तरीही चव नेहमीची वाटेचना !! उरलेली अर्धी बिर्याणी पॅक करायला सांगून उठलेच कशी ! तडक काँटरवर बिल द्यायला.......!!!

पैलतीरावर तसे पोहचणे कठीण नाही
डळमळतो आहे आठवणींचा पूल जरासा

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग Sad
हे तिकडे थोपुवर वाचून मी घरात खुप वेळ रडत बसलेले..आईने कसं बसं समजावलं आणि शांत झाले
आता पुन्हा वाचलं Sad
आता काय करू मी?

रियु, भावनांना लेखणीतून वाट मोकळी करुन देण्याचा प्रयत्न केला की एक सच्चा दोस्त समोर बसून ऐकून घेतोय आपल सारं म्हणणं अस वाटत बघ !....तूही अजमावयाला हरकत नाहीय हे Happy

जाई, वैवकु ,रिया धन्स !

-सुप्रिया.

<<<<सावरुन पटकन म्हणाला मॉम एक काम कर बिर्याणी गरम गरम खाऊनच ये तू ... मस्त पावसाळी वातावरण आहे आणि तुझ्या आवडीचा गरमागरम रस्साही असेलच ना !
सो जस्ट एंजॉय ईट विथ मटका कुल्फी ! खिमा आण वाटल्यास ....!>>>>

हे आवडले! प्रत्येक दिवस त्याच दिवशी जगावा! प्रत्येक क्षण त्याच क्षणी जगावा!

कठिण आहे. मान्य आहे. तरी प्रयत्नाने शक्य आहे.

<<<या दु:खातून ईश्वर लवकरात लवकर आपल्याला बाहेर काढो ही प्रार्थना.>>>>

बेफिजी,
आपल्या भवनांचा आदर करतेय तरीही दु:ख उगाळत बसून सहानुभूती मिळवण्याचा हेतू अजिबातच नाहीय माझा....प्रत्येक भावना जगतो आपण ती नेहमीच व्यक्त करणे शक्य नसते म्हणून मोकळं होण्यासाठी हा प्रपंच Happy

कृ गै न

सुप्रिया.

शरदजी,

पैलतीरावर तसे पोहचणे कठीण नाही
डळमळतो आहे आठवणींचा पूल जरासा

हा शेरही तेच सागंतोय Happy

मनःपुर्वक धन्यवाद आपले.

म्हटली तरी प्रासंगिक आठवण; पण त्यातही विशेष म्हणजे गुडलकच्या गर्दीतही भावविश्व डोहाळले गेले आणि गतस्मृतीच्या आठवणींचे काही क्षण चक्षूसमोर तरळले अन् त्यातुन उतरलेला हा छोटासा भावनीक लेख. यातील मनी भिडलेली एक ओळ म्हणजे :

डळमळतो आहे आठवणींचा पूल जरासा

~ सुंदरच. जरी पूल डळमळला असला तरी तो कधी कोसळणार नाही याची ग्वाही ही स्मृती देत राहील.

अशोक पाटील

तायडे, मी मुळीच करत नाही हे Happy
मला 'व्यक्त' होईचीच भिती वाटते.कोणापाशीही अगदी स्वतःपाशीही
न जाणो 'मी खुप स्टाँग आहे' या स्वतःशीच जपलेल्या इमेजला तडा गेला तर?

रिया 'अभि'ला छान रेखाटलयस की , मी विसरणार नाहीय कधीच ते .

<<<<जरी पूल डळमळला असला तरी तो कधी कोसळणार नाही याची ग्वाही ही स्मृती देत राहील.>>>>>

अशोकजी अगदी मनातल बोललात आपण.

नंदिनी, स्मितू धन्स !

-सुप्रिया.

सुप्रिया, फेबुवरही वाचले तेव्हा आवडले होतेच.रोजनिशीतल्या नोंदींसारखी ही मुक्त स्वगते असतात, हळवेपणाचा निचरा करून स्वतःकडे पहाताना पुनः नव्या जीवनेच्छेची जाणीव करून देतात.

दु:ख उगाळत बसून सहानुभूती मिळवण्याचा हेतू अजिबातच नाहीय<<< नाही हो तै ते तसं म्हणतच नसावेत

...मनात खोलवर ही दु:खे दबा भरून बसतात ती अशी शोधून शोधून लवकरात लवकर बाहेर काढायला हवीत Happy

___________________

न जाणो 'मी खुप स्टाँग आहे' या स्वतःशीच जपलेल्या इमेजला तडा गेला तर?<<< रिया एक शेर

मनाचे कायदे हरतील ह्या एकाच भीतीने
कधीही भांडलो नाही मनाशी खर्‍यासाठी .
...~ वैवकु Happy

अस व्यक्त केलय कि माझ्याच डोळ्यात पाणी आलं...
काही माहीत नसतानाही सारं कळून गेलं ...

माझी आत्या म्हणते की दु:ख मनाच्या तळघरात डांबुन ठेवायच आणि सु़ख चौकटिला .. मला नाही झेपत तिच logic...

पुढे मात्र काहीच सुचत नाहीये >>> मला पण....:(