अंदाजे दोन-एक वर्षांनी कामानिमीत्त आज डेक्कनला गेले होते. 'गुडलक' ला जस्ट पास झाले...खरतर अस डावलून पुढे जाववेचना! (सवय वाईटच म्हणा कोणतीही) गाडी पार्क केली, काम आटोपलं, चालत-चालत मागे फिरले अन गाठलचं गुडलक !
वेटींगही नेहमीचचं ! पण एकटीला ते प्रकर्षानं जाणवल. तेवढ्यात वेटर विचारत आला "आप सिंगल ना? तो आईये इधर !' टेबलाशी घुटमळत खुर्चीवर टेकले, भिरभिरत्या नजरेने सभोवार नजर टाकतेय तोच पाणी नि मेन्यूकार्ड हजर !!!
नजर तर मेन्यूकार्डवर होती पण डोळ्यांचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचत नव्हता, पाण्याचा तरल पडदा जो मधे आला होता दोघांच्या ! मिटवल त्याला तसचं.... ! अक्षयला कॉल करुन विचारल की चिकन-बिर्याणी अन खिमा आणू का रे पार्सल गुडलक मधून ? .....तो उडालेलाच !!! सावरुन पटकन म्हणाला मॉम एक काम कर बिर्याणी गरम गरम खाऊनच ये तू ... मस्त पावसाळी वातावरण आहे आणि तुझ्या आवडीचा गरमागरम रस्साही असेलच ना !
सो जस्ट एंजॉय ईट विथ मटका कुल्फी ! खिमा आण वाटल्यास ....!
ऑर्डर केली...ती टेबलावर येईपर्यंत बरीच सावरले.....ऑर्डर आली, प्लेटमधे थोडी सर्व्ह् ही केली...पण का कोण जाणे घमघमाट तर परिचयाचा होता तरीही चव नेहमीची वाटेचना !! उरलेली अर्धी बिर्याणी पॅक करायला सांगून उठलेच कशी ! तडक काँटरवर बिल द्यायला.......!!!
पैलतीरावर तसे पोहचणे कठीण नाही
डळमळतो आहे आठवणींचा पूल जरासा
-सुप्रिया.
आनंदाचे क्षण वेचुन पुढे चालता
आनंदाचे क्षण वेचुन पुढे चालता चालता
मागिल गल्लीत ठेउन गेले उदास उसासा
<<<<सावरुन पटकन म्हणाला मॉम
<<<<सावरुन पटकन म्हणाला मॉम एक काम कर बिर्याणी गरम गरम खाऊनच ये तू ... मस्त पावसाळी वातावरण आहे आणि तुझ्या आवडीचा गरमागरम रस्साही असेलच ना !
सो जस्ट एंजॉय ईट विथ मटका कुल्फी ! खिमा आण वाटल्यास ....!>>>>
हे आवडले! प्रत्येक दिवस त्याच दिवशी जगावा! प्रत्येक क्षण त्याच क्षणी जगावा!
कठिण आहे. मान्य आहे. तरी प्रयत्नाने शक्य आहे.
निलीमा,शरद मनापासून आभार
निलीमा,शरद मनापासून आभार आपल्या प्रतिक्रियांबद्दल....
पण हा धागा चुकून दोनदा विणल्या गेलाय इथे
-सुप्रिया.
म्हटली तरी प्रासंगिक आठवण; पण
म्हटली तरी प्रासंगिक आठवण; पण त्यातही विशेष म्हणजे गुडलकच्या गर्दीतही भावविश्व डोहाळले गेले आणि गतस्मृतीच्या आठवणींचे काही क्षण चक्षूसमोर तरळले अन् त्यातुन उतरलेला हा छोटासा भावनीक लेख. यातील मनी भिडलेली एक ओळ म्हणजे :
डळमळतो आहे आठवणींचा पूल जरासा
~ सुंदरच. जरी पूल डळमळला असला तरी तो कधी कोसळणार नाही याची ग्वाही ही स्मृती देत राहील.
अशोक पाटील