अशी हि " दुनियादारी "

Submitted by जय@ on 9 August, 2013 - 07:21

" दुनियादारी " हा मराठी चित्रपट हाऊसफुल असून देखील संपूर्ण महाराष्ट्रातील थेटर मधून आज हद्दपार झाला. कारण काय? तर आज शाहरुख खान निर्मित चेन्नई एक्सप्रेस हा हिंदी सिनेमा प्रदर्शित होतोय. मराठी चित्रपटाची महाराष्ट्रात हि अवस्था...!
या निमित्ताने काही वर्षा पूर्वीचा एक प्रसंग आपणास सांगू इच्छितो. त्या काळी महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांची निर्मिती होणं व प्रेक्षकांनी हे चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करणं , या घटना दुमिर्ळ होत्या.
' सोंगाड्या ' हा चित्रपट प्रख्यात विनोदवीर दादा कोंडके यांनी दिग्दशिर्त केलेला हा चित्रपट प्रदशिर्त करण्यास ' कोहिनूर ' चे तत्कालीन मालक कपूर यांनी नकार दिला होता. दादा कोंडके यांनी ही बाब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निदर्शनास आणताच , शिवसैनिकांनी एक टोळी ' कोहिनूर ' वर चालून गेली. ' गणपती बाप्पा ' चा गजर करत कपूर यांची चित्रपटगृहाबाहेर शिवसैनिकांनी चांगलीच हजेरी घेत ' सोंगाड्या ' प्रदशिर्त करण्याचं वचन त्यांच्याकडून घेतलं.
' कोहिनूर ' मध्ये ' सोंगाड्या ' नंतर दादा कोंडके यांचे पुढील सर्व मराठी-हिंदी चित्रपट प्रदशिर्त झाले , त्यातील अनेक चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरले.
महाराष्ट्रातील एकही नेता दुनियादारी चित्रपटाच्या बाजूने उभा राहू शकत नाही हेच महाराष्ट्राच्या जनतेचे कमनशीब आणि म्हणून बाळासाहेबांसारखा नेता या महाराष्ट्राला हवा होता.
या विषयी मी काही चित्रपट गृहात चोकशी केली असता. मला हि माहिती मिळाली.
आज आम्ही चेन्नई एक्सप्रेस हा सिनेमा प्रदर्शित नाही केला तर आम्हाला एकही हिंदी हिट चित्रपट distributor देणार नाही. वर्षभर मराठी चित्रपट हिट होणार आहेत काय ? मराठी एखाद दुसराच चित्रपट चालतो. पैसे लावायचे कसे आणि दुप्पट वसूल हि कसे करावयाचे हे हिंदी चित्रपटवाल्याना बरोबर जमते.
जाऊदे हि दुनियादारी अशीच चालायची.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या इथे नाशिक मधे जितके शो आधी होते तेवढेच शो आता देखील आहेच....चांगले हाउस्फुल्ल चालु आहे...

राज ठाकरे बरोबर बोलणी केल्यानंतर चित्रपटगृहात जर आधीपासुन दुनियादारी लागलेला असेल तर किमान एक तरी शो दाखवला जाईलच असे ठरवलेले होते.......( ऐकिव माहिती प्रमाणे )

त्यामुळे उगाच गळा काढण्याची गरज नाही ...

तुम्ही दुनियादारी चित्रपटगृहात जाउन पाहिला का ? कि आज दुसरा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर बघण्याची इच्छा निर्माण झाली ?

त्यामुळे उगाच गळा काढण्याची गरज नाही ...>>>>>>>म्हणजे? उदयन, अश्याच प्रकारे मराठी लोकच शांतेचे नारे देत फिरतात आणि कोणी बोलायला लागले कि 'गळे' दाबतात. मराठी लोकांनाच काही गरज वाटत नाही मराठी चित्रपटांबद्दल....आणि जिथे घरचेच मान देत नाहीत, तिथे बाकीच्यांचा प्रश्नच येत नाही.

राज ठाकरेंनी त्यात हात घातला म्हणून बरे...नाहीतर आज एकही शो नसता 'दुनियादारीचा'.

बाकी जयदीप, तुमच्याशी मी सहमत आहे.

उदयन, मि म्हणतो मराठी चित्रपट हाऊसफुल असताना चित्रपटाला एकच शो का ? आणि ते हि महाराष्ट्रात ...!
मराठी माणूस तिकिटाचे पैसे कमी देतो का ? असे हिंदी चित्रपट हाऊस फुल असताना मराठी चित्रपटासाठी त्यांची जागा खाली करतात का ?

मराठी माणसाचा गळा कापन्याची वेळ आली आहे तरी असेच बोला...... उगाच गळा काढण्याची गरज नाही ...

मि हा चित्रपट पहाण्यासाठी ६ फेऱ्या चित्रपट गृहात मारल्या मात्र प्रत्येक वेळीस हाऊस फुल पाटी दिसली. आणि ७ फेरीला "चेन्नईएक्सप्रेस" दिसली. मग काय करावे बोला ..... गळा काढू कि गळा कापु.

मि हा चित्रपट पहाण्यासाठी ६ फेऱ्या चित्रपट गृहात मारल्या मात्र प्रत्येक वेळीस हाऊस फुल पाटी दिसली. >>>>
अरे मग अभिनंदन करा आनंद व्यक्त करा......

मराठी चित्रपट ला "हाउसफुल्ल"ची पाटी लागायला सुरुवात झाली... कधीतरी सकारात्मक घडत आहे ... चांगले लिहा... आमच्या इथे नाशिक मधे अजुन देखील आहे चालु........काल चेन्नई एक्स्रेस बघायला गेलेलो तेव्हा कित्येक जण विचारुन गेलीत "दुनियादारी" आहे का ? शो टाईम विचारुन गेलीत.. काही जणांनी रात्रीच दुसर्या दिवशीचे टिकिट काढलीत का तर नंतर शो हाउसफुल्ल होतो...

बघायचे असेल तर लोक बघतातच ... अ‍ॅड्व्हान्स बुकिंग करुन जा .......चांगली वेळ आली मराठीला .. लोकांना आदल्या दिवशी अ‍ॅड्व्हास बुकिंग करावे लागत आहे ते ही मराठी चित्रपटाला...

आणि ७ फेरीला "चेन्नईएक्सप्रेस" दिसली. >>> तुमचा प्रोब्लेम नेमका काय आहे.. ७ व्या फेरीला चेन्नई एक्स्प्रेस दिसली हे नको होते या ६ ही वेळा दुनियादारी हाउसफुल्ल होती हे ? Uhoh

तुम्हाला हाउसफुल्ल मुळे तब्बल ६ वेळा बघायला मिळाला नाही ... सातव्या वेळेला जर चेन्नई नसता तरी तो हाउसफुल असता मग .....तुम्हाला परत तिकीट मिळाले नसते Biggrin ...

उदयन,मराठी चित्रपट पुर्वीही "हाउसफुल्ल" होत असत. माहेरची साडी लोकानी चार चार वेळा बघीतलाच ना !
मझ्या एका साध्या प्रश्नाचे उतर द्या " दुनियादारी " हा मराठी चित्रपट हाऊसफुल असून देखील त्याची जागा खाली करुन चेन्नई एक्सप्रेस हा सिनेमा का?

आमच्या इथे नाशिक मधे अजुन देखील आहे चालु........
नाशिक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे.
आमच्या येथे एकही शो नाही म्हणून आम्ही गळा काढतोय.

" दुनियादारी " हा मराठी चित्रपट हाऊसफुल असून देखील त्याची जागा खाली करुन चेन्नई एक्सप्रेस हा सिनेमा का? >>>

मागच्या २ प्रतिसादात दिला आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तरी देखील परत देत आहे

जिथे जिथे दुनियादारी होता तिथे अजुन ही आहेच नेट वर शोधलात तरी दिसेल..किमान १ शो तरी आहेच

तो ही का आहे कारण चित्रपट हाउसफुल आधी २ ते ३ शो मधे होता म्हणुन ....त्याचे शो कमी केलेत पण एकदम काढुन टाकलेला नाही आहे (काही ठिकाणी अपवाद असेल) राजसाहेबांच्या कृपेने या मराठि लोकांच्या प्रतिसादाच्या कृपेने ... शेवटी सिनेमा हॉल च्या मालकाला देखील पैसे कमवायचे असतातच.. आता जे शो आहेत ते हाउसफुल ठेवण्याचे काम मराठी लोकांच्या हातात आहे...ते देखील मोकळे झाले तर तो एक शो सुध्दा काढुन टाकण्यास सिनेमा हॉल चा मालक कमी करणार नाही...

शेवटी पैसा हाच महत्वाचा आहे..... चांगल्या दर्जेदार मराठी चित्रपटांना भरभरुन प्रतिसाद द्यायला सुरुवात करा...निश्चितच चित्र बदलेल.. (आता हे म्हणु नका की चित्र बदलायला देत नाहीत .. नाशिक ला चेए बरोबरीने दुनियादारी जोरात चालत आहे लोक विचारतात आवर्जुन आणि अ‍ॅडव्हान्स मधे तिकीट काढुन ठेवतात.. त्यामुळे चित्रपटगृहाच्या मालकाला चित्रपट दाखवावाच लागतो ...कारण तो हाउसफुल असतो.. आता यात नाईलाज म्हणा या नफ्याचे गणित म्हणा)

मराठी चित्रपट दिसतोय ना ते महत्वाचे ......

आशा आहे तुम्हाला माझी पोस्ट समजली असेल........परत परत तेच तेच विचारणार नाहीत

नाशिक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे.
आमच्या येथे एकही शो नाही म्हणून आम्ही गळा काढतोय. >>>>>>>> इतर ठिकाणी आहे ना.. तिथे जाउन बघा..
तुम्हाला आता मराठी चित्रपट सुध्दा घराच्या दारी आणुन हवा ? Uhoh काहीच्या काही कारण देत आहेत...

आणि तुमचे शहर म्हणजे महाराष्ट्र नाही आहे.....तिथे लागला नाही म्हणजे कुठेच लागला नाही आहे... गळे काढायला

सगळॅ शो जर दुनियादारीचे लावलेत तर सगळे हाउसफुल्ल होणार आहे का ? चित्रपटगृहाचा खर्च वसुल होणार आहे का ? उगाच तोट्याचा भार त्याच्यावर टाकायचा ? जिथे लागला आहे तिथे जाउन बघा...

मी मुंबईत सुध्दा राहतो... माझ्या आजुबाजुला नाही लागलेला कुठे "खोखो" बघायचा होता म्हणुन ठाण्याला जाउन बघितला....गळा काढला नाही...

दुनियादारी रीलीज होऊन किती आठवडे झालेत?

चित्रपट थेटरमधे लावण्याचे एक गणित असतं. साधारणपणे चित्रपट रीलीज झाल्या झाल्या सर्वच थेटरमधे आधीचे शोज काढून लावला जातो, कारण सध्या पहिल्या वीकेंडमधेच गल्ला कमवायचा असतो. लोक रीलीज झाल्यावर लगेच चित्रपट बघणे पसंद करतात. त्यामुळे ज्या पिक्चरला अधिक पब्लिक अपेक्षित आहे ते चित्रपट सर्वच भारत्+परदेश इथे एकाच वेळेला लावले जातात. कारण, दोन तीन आठवड्यानंतर पब्लिक चित्रपट बघत नाही. तोपर्यंत दुसरा चित्रपट येतो.

चित्रपट वितरक कधीही आपला फायदा बघून मगच सिनेमा उचलतात. त्यांच्यासाठी तो धंदा आहे, सिनेमाप्रेम अथवा कलासक्तता नव्हे. आधी पैसे देऊन सिनेमा उचलल्यावर त्यांना स्वतःचा फायदा कराय्चा असतोच शिवाय चित्रपटगृहाच्या मालकालादेखील आर्थिक फायदा हवाच असतो.

मझ्या एका साध्या प्रश्नाचे उतर द्या " दुनियादारी " हा मराठी चित्रपट हाऊसफुल असून देखील त्याची जागा खाली करुन चेन्नई एक्सप्रेस हा सिनेमा का? >>> अजून दोन आठवड्याने चेन्नई एक्स्प्रेस उतरून दुसरा सिनेमा चढतो की नाही बघा. दुनियादारी ऐवजी अगदी शाहरूखचाच दुसरा एखादा सिनेमा असता तर तोपण तसाच उतरला असता... दुनियादारी जेव्हा रीलीज झाला तेव्हा आधीचा जो कुठला सिनेमा होता, तो उतरून मगच रीलीज झाला ना??

तुम्ही सहावेळा चित्रपटगृहच्या फेर्‍या मारण्याऐवजी "आगाऊ तिकीट बूकिंग" केले असते तर एव्हाना तुमचा चित्रपट पाहून झाला असता. यापूढे लक्षात ठेवा, आपल्याला आवडता सिनेमा रीलीज झाला की लगेच बघून घ्या. सहासात वेळा चित्रपटगृहाच्या वार्या करू नका.

अजून दोन आठवड्याने चेन्नई एक्स्प्रेस उतरून दुसरा सिनेमा चढतो की नाही बघा >>> दोन आठवडे पण फार आहे पुढच्याच आठवड्यात अक्षय चा वन्स ऑपन टाईम येतोय आणि त्यानंतर सत्याग्रह आणि मद्रास कॅफे....

हिंदीचित्रपटांमधे सुध्दा १च आठवडा मिळतो त्यात त्यांना रेकॉर्ड कमाई करुन घ्यायची असते...आता गेले ते दिवस २५ आठवड्याअंचा रौप्यमहोत्सव

पुढच्याच आठवड्यात अक्षय चा वन्स ऑपन टाईम येतोय आणि त्यानंतर सत्याग्रह आणि मद्रास कॅफे....
<<< मग नेस्क्ट वीकला सिंगल स्क्रीनमधून तरी नक्की उतरणार. वन्स अपॉन टाईम टिपिकल सिंगल स्क्रीन मूव्ही आहे.

मग मी लगेच "आमच्या चेन्नईचा चित्र्पट होता म्हणूनच उतरवला, नॉर्थ इंडियन्स आम्हा तमिळींवर असा अन्याय कायमच करतात" असा धागा काढणार!!!!

मी, पालघर जि.ठाणे येथे रहातो. पालघर,बोइसर इथे राज सिनेमा, प्रकाश सिनेमा, गोल्ड सिनेमा, के.टि.व्हिजन अशी अनेक थेटर आहेत. शुक्रवार पासून इथे दुनियादारी या चित्रपटाचा एकही ............. एकही शो नाही. (हाऊस फुल असताना देखील) तो एक तरी शो ठेवा. एवढीच अपेक्षा होती.

online booking हि हाऊस फुल दाखवत होते आणि म्हणूनच प्रत्यक्ष जावे लागले.

जयदीप२७८१,
तुमची आत्ताची पोस्ट या धाग्याच्या विषयाशी विसंगत नाही वाटत का?
म्हणजे तुम्ही सुरुवात अशी केलीये की" "दुनियादारी हा मराठी चित्रपट हाऊसफुल असून देखील संपूर्ण महाराष्ट्रातील थेटर मधून आज हद्दपार झाला".
पण तुमची आत्ताची पोस्ट तर नेमके याच्या उलट चित्र दाखवतेय.