दुचाकीची काळ्जी संदर्भात माहिती हवी आहे.

Submitted by वर्षादेसाई on 8 August, 2013 - 02:46

मी होंडा कंपनीची "डिओ" गाडी वापरतेय.
दुचाकीच इंजिन सुस्थितीत राहण्यासाटी कोणती काळजी घ्यावी?

१. इंजिन ऑईल किती कालावधी नंतर बदलावे?
२. गाडीचा अ‍ॅवरेज कसा वाडेल?
३. गाडीची सव्हिसिंग साधारण किती दिवसांनी करावी?

ह्या व्यतिरिक्त अजुन काही असल्यास तर ते पण टायपा इथे.

धन्यवाद ___/\___

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तीन हजार कीमीनंतर ऑईल चेंज करा.

एव्हरेज वाढवण्यासाठी इंजिन टायमिंग व्यवस्थीत सेट करुन घ्या. चांगला स्पार्कप्लग वापरा ,जमत असल्यास त्याची गॅप अर्धा मीमी वाढवा .

एअर फिल्टर कार्ब्युरेटर साफ करायला शिका. एक्झॉस्टला एक जाळी बसवलेली असते, बर्याचदा त्यामुळे इंजिन चोक अप होते व एव्हरेज आणि पिकअप कमी होतो. जाळी काढा, गाडीचा आवाज अगदी थोडा वाढेल पण पैसे वाचतील. टायर प्रेशर योग्य ठेवा. वेग ४० ते ६०च्या दरम्यान ठेवा.

दर आठ दहा महीन्यांनी सर्व्हीसींग करा. बेस्ट लक.