आपण सारखेच....

Submitted by सचिनकिनरे on 6 August, 2013 - 14:59

आपण सारखेच....

तुझ्या रस्त्याने जाताना,
अजुनही हाक येते.
कसा आहेस?
मी म्हणतो, तुझ्यासारखाच....
दर पावसाळ्यात वाटत की,
आता फुटणार नाही,
पण बांध फुटतोच....
आपण सारखेच....

तो म्हणतो,
ती इथे येत नाही आजकाल...
तिने शहरच बदलले,
मी म्हणतो, जाऊदेना...
आपण इथेच राहू,
ती कधी आली तर,
आपण नसुन कसे चालेल?
जसा तू वाट बघतोयस..
पुढच्या गल्लीतल्या समांतर रस्त्याची...
आपण सारखेच....

काल तू मला घाईने बोलावलेस,
म्हणालास, शेवटचे येऊन जा....
एक खोल जखम होतेय अंतरात,
माझ्यावर पुल बांधतायत...
पण तो, पुढच्या गल्लीतल्या रस्त्याला सोडुन,
त्या पुढे उतरतोय, मला नाही जायचे रे तेथे,

मला बघवत नाही, ऐकवतही नाही..
तेव्हापासुन मी तुझ्या रस्त्याने जात नाही..
तुझ्यावरही कुंकवाचा पुल झालाय आता...
आपण सारखेच...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users