बसरा मोत्यांची नथ

Submitted by दादाश्री on 5 August, 2013 - 12:24

ही बसरा मोत्यांची ४०० ते ५०० वर्षापुर्वी ची नथ आहे,(आजोबांनी दिलेल्या माहिती प्रमाणे Happy )

IMG_20130804_101240.jpgIMG_20130804_101307.jpg

अन ही तीची पेटी ज्यावर मेड इन जपान अस लिहिलय

IMG_20130804_101454.jpg

ही पेटीत विराजमान

IMG_20130804_101643.jpg

आहे ना सुंदर Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच देखणी आहे. शेवटला, पेटीतला फोटो आवडला.

फोटोंत कॅमेराचा फ्लॅश ऑन आहे का? तो न वापरता नैसर्गिक प्रकाशात काढता येईल का? त्यामुळे मोत्याचा खरा रंग आणि शीन (चमक?) कळेल असं वाटतं.

सुंदर आहे.
अगदी अश्शीच नथ माझ्या आईकडे आहे तिच्या माहेरकडून्(माझ्या आजोळातून मिळालेली), पण वजनाने जड असल्याने ती फक्त एकदा-दोनदाच घातली गेली आहे. तरीही आम्ही ती जपून ठेवलीय एक वारसा म्हणून!!

ही बसरा मोत्यांची ४०० ते ५०० वर्षापुर्वी ची नथ आहे,

>> खरंच? ४०० ते ५०० ?? Uhoh

तेव्हा नथी होत्या की नाही हे जाणकार सांगतील..

पण तेव्हा नथीला प्लॅस्टिकचे मणी (हिरवा आणि लाल) लावायचे?

४००-५०० वर्षांपूर्वी प्लॅस्टिक होतं? तेही भारतात? महाराष्ट्रात?

>>४००-५०० वर्षांपूर्वी प्लॅस्टिक होतं? तेही भारतात? महाराष्ट्रात?
प्लास्टिक नव्हे. लाल माणिक (Ruby) आणि हिरवा पाचू (Emerald) असावे.

इथे आणखी काही प्रकार आहेत.

हि खरेच ४००-५०० वर्षापुर्वीची आहे का?

माझ्या आईकडे एकदम अशीच दिसणारी आहे(ती आजीची होती.. आईने अशीच वारसा म्हणून ठेवलीय.)

नथ सुंदर. पण मला एक शंका आहे. मोती खूप मौल्यवान असतील तर (सोने व चांदीत उजवे सोनेच अस्ते ना )मग नथ चांदीत का घडवली असेल असा प्रश्न पडतो. त्यासाठी काही स्पेसिफिक कारण असेल का?

धन्यवाद !
सुमेधाव्ही >>> ती सोन्यातच आहे फोटु गंडलाय Happy
झंपी >>> परंपरागत आलेली आहे...
पियु परी >>> प्लास्टिक Lol मृण्मयी यांनी सविस्तर लिहिलय वर म्हणुन बर झाल Happy
गमभन >> आम्ही ती जपून ठेवलीय एक वारसा म्हणून!!>> +१

आरे माझ्या फोटु ग्राफीवर शंका घ्या सारे पन नथी वर नको Lol , मला हा अमुल्य ठेवा आपल्या सगळ्यांशी शेअर करावासा वाटला म्हणुन , नाहीतरी घरात आहेच एवढी वर्षे , आजुन जाइल पुढे अशीच कित्येक वर्षे ...

सुंदर आहे नथ. मोत्यांची क्वालिटी फोटोतूनही कळतेय. बसरा मोती असेच परफेक्ट गोल नसतात.
दादाश्री, धन्यवाद ही नथ आम्हालाही दाखवल्याबद्दल Happy

माझ्याकडेही अशीच एक जुनी नथ आहे पण ती चांदीत आहे. त्यामुळे माझ्या मनात शंका आहे की नथीचे मोती जड असल्यामुळे ते वजन पेलण्यासाठी सोन्यापेक्षा चांदी बरी म्हणून ती चांदीत घडवली असेल काय?

>>>> ४००-५०० वर्षापूर्वीची असेल हे मनाला पटत नाहीये पण. <<<<<
ताजमहाल, हे शिवमंदिर आहे हे जसे पटत नाही, तस्सेच हे देखिल! त्यात नवल ते काय? Proud

ये हमारे खानदानी कंगन है अस नवीन सुनेला देत सासु म्हणायची तसा काय डॉयलॉग नाय का दादाश्री तुमच्या घरी? Happy

नथ सुंदर आहेच. Happy

मस्तच.

सुंदर आहे नथ!

आमच्याकडे पण अशीच नथ आहे. माझ्या पणजीची... आता माझ्या बहिणीकडे आहे..
हा फोटो... अत्ता भाचीच्या लग्नात तिने घातली होती.

Nath.jpg

ताजमहाल, हे शिवमंदिर आहे हे जसे पटत नाही, तस्सेच हे देखिल! त्यात नवल ते काय?>> गप्पे लिंब्या. खरच म्हणतोय. ४००-५०० म्हणजे छत्रपतींच्या काळातली झाली.

असु शकते. घरी आईला विचारतो आमच्याकडची नथ कधी बनवलेली आहे म्हणुन. माझ्या माहीतीप्रमाणे आजीच्या वेळी बनवली असावी, म्हणजे साधारण १२५-१५० वर्षापूर्वी असेल. म्हणुन शंका आली. बाकी काही नाही.

नथ सुरेखच आहे.

Pages