स्विस सहल - भाग १/१ इन टु द आल्प्स - आर गॉर्ज

Submitted by दिनेश. on 5 August, 2013 - 06:03

तर आता एकेक स्थळाला सवडीने भेट देऊ या. स्विसला गेल्यावर आपले वास्तव्य जर झुरीक मधे असले तर
या सहलींना जाणे सोपे पडते. विमानतळावरुन रेल्वेने थेट झुरीक स्टेशनला जाता येते. ( विमानतळ म्हणजे फ्लुगाहफेन मग ओर्लिकॉन आणि मग झुरीक स्टेशन ) हॉटेल जर याच भागात असले तर उत्तम.
झुरीक स्टेशनसमोरचा एकच रस्ता दिवसभर गजबजलेला असतो. पण आजूबाजूचे भाग दिवसाही निवांत असतात.

आपल्याला या सहली भारतातूनही बूक करता येतात पण तिथे गेल्यावर सगळी माहितीपत्रके बघून सहली निवडल्याच चांगले. तसे स्विसमधे कुठल्याही भागात बसने / ट्रेनने जाणे अवघड नाही. पण जर सहलींने गेलो तर तिकिटासाठी धावपळ वाचतेच शिवाय तिथले उत्तम गाईडस आपल्याला सुंदर माहिती देत राहतात.

स्टेशनजवळच एका मोठ्या पटांगणातून या सहली निघतात. बेस्ट ऑफ स्वित्झर्लंड आणि ग्रे लाईन या दोन कंपन्या तिथून सहली काढतात. त्यांच्या वेळा काटेकोर पाळाव्या लागतात कारण ठरल्या मिनिटाला बस तिथून निघते.

तर आज आपण जाऊ, इन टू द आल्प्स या सहलीवर. या सहलीचा पहिला टप्पा म्हणजे आर गॉर्ज.
या जागेबद्दल फारशी माहिती नेटवरही नाही. पण या जागेचा एखादा फोटो तुम्हाला भारून टाकू शकतो.
आणि आता तिथे जाऊन आल्यावर मला आवर्जून सांगावेसे वाटते, कि फोटोतूनही त्या जागेची नीट्शी कल्पना
येत नाही.

आर हे एका नदीचे नाव. अनेक वर्षांपासून तिने एका डोंगराला भेदत एक अरुंद दरी निर्माण केलीय. एरवी अश्या
दरीत शिरणे धोकादायक असू शकते. पण स्विस तंत्रज्ञांनी गेल्या शतकापासूनच हि भक्कम पायवाट
तयार केली आहे. आजही तिची देखभाल त्याच तर्‍हेने करतात.

हि वाट अगदी सोपी आहे. साधारण ४० मिनिटात आपण ती पार करू शकतो. शेवटच्या टप्प्यात किंचीत चढ आहे. दोन्ही बाजूंना खायची प्यायची सोय आहे. दोन्ही बाजूंना ( जरा पायपीट करायची तयारी असेल तर )
रेल्वे स्टेशन्स आहेत. ( रेल्वे मात्र गॉर्ज मधून न जाता, स्वतंत्र बोगद्यातून जाते. )

स्विसमधे जायला जुलै / ऑगस्ट हे महीने सर्वात चांगले कारण हा त्यांचा उन्हाळा असतो आणि सगळीकडे मस्त वातावरण असते. फुले तर असंख्य असतात. मला या फुलांसाठी वेगळे बाफ काढावे लागतील पण
अगदी खास फुलांचे फोटो इथेच देतो.

तर चला...

झुरीक मधून बाहेर पडल्यावर अशी सुंदर निसर्गदृष्ये दिसू लागतात.

एका कड्यावर थांबल्यावर पायाशी दिसलेली हि फुले.

आल्प्सचे प्रथम दर्शन

हा फोटो खास लाजो साठी. या ठिकाणी MERINGUES चा शोध लागला, असे सांगितले.

आणि हा फोटो निंबुडासाठी. या जागेचा संदर्भ शेर्लॉक होम्सच्या कथेत आला आहे असे सांगितले. कोपर्यात त्याचा पुतळाही दिसतोय.

आणि हे एक खास फुल.

गॉर्जमधून बाहेर पडणारी हि आर नदी.

या बोगद्यातून आपण गॉर्जमधे शिरतो

इथून या पायवाटेला सुरवात होते.

या ठिकाणी हि गॉर्ज जेमतेम मीटरभर रुंद आहे.

मग हि वाट अदृष्य झाल्यासारखी वाटते.

मग वाट दिसूही लागते.

बाहेरचे आणि आतले तपमान यात फरक असल्याने, नदीवर धुकेही असते.

या वाटेची माहिती देणाला फलक.

या वाटेवर काही बोगदेही लागतात. अंधार पडल्यावर इथे खास प्रकाशयोजना असते.

बोगद्यातून दिसणारे धुके

धुक्याच्या सानिध्यात

या गॉर्जच्या भिंतीही चांगल्याच उंच आहेत. काही ठिकाणी त्या २०० मीटर्स उंच आहेत. डोक्यावर आकाशाचा अरुंद पट्टा दिसत राहतो.

मधेच ही गॉर्ज थोडी तिरकस आहे.

पाण्याचा प्रवाह खोल आहे. आणि त्याचा सदोदीत आवाज येत राहतो. ( पण अजिबात दुर्गंधी येत नाही )
हि पायवाट सोडून जायचे नाही अशा सुचना दिलेल्या असतात आणि ते पाळण्यातच आपले हित असते.
( सहल संयोजक, आपण गॉर्जमधे आपल्या जबाबदारीवर जातोय, असे लेखी निवेदन घेतात. )

वाटेत एक धबधबा दिसतो. त्याची माहीती.

आणि हा प्रत्यक्ष धबधबा.

त्या धबधब्यानंतर हि गॉर्ज थोडी रुंद होते.

खळखळ वाहणारे पाणी.

अत्यंत जबाबदारीने वावरणारे पर्यटक. कुठेही ढकला ढकली होत नाही.

मग आपल्याला शेवट दिसू लागतो, तरी तो तसा दूरच आहे.

मग आपण प्रवाहापासून थोडेसे वर चढत जातो.

ग्लेशियर मिल.. म्हणजे थोडक्यात मोठा रांजण खळगा.

~
ग्लेशियर मिलची माहिती

उंच कडे

मला आवडलेली एक फ्रेम.

शेवट आल्यावर आपल्याला थोडा चढाव लागतो.

तिथली पार्किंग लॉट. इथली जागा जरा कमी असल्याने, केवळ लहान गटांच्या सहलीच इथे आणल्या जातात.

तिथले एक झोकदार वळण

ती गॉर्ज सोडताना, मन उदास होते. मागे वळून पाहताना..

समोरून येणारी नदी आणि तिच्यावरचा पूल

पुढे रेल्वे ट्रॅक आणि स्टेशनचा परीसर दिसतोय.

तिथे रस्त्याच्या कडेला उगवलेली निळी फुले.

या ठिकाणाहून आपण बाहेर पडतो. या दरवाज्यातून बाहेर न पडता त्याच तिकिटात आपण परत जाऊ शकतो.

एकदा तरी भेट द्यावीच अशी हि जागा आहे. परत एकदा रेल्वेने तिथे जावेसे वाटतेय.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ प्र ति म!!
धन्स दिनेशदा!! अशा आम्हाला अपरिचित आणि अद्भुत ठिकाणांची माहिती करुन दिल्याबद्दल!! Happy

धन्स दिनेशदा!! अशा आम्हाला अपरिचित आणि अद्भुत ठिकाणांची माहिती करुन दिल्याबद्दल!!>>>+++११११११११

असलं अद्भूत सौंदर्य या पृथ्वीतलावर आहे हेच पाहुन डोळे विस्फारले जातात्.:स्मित: परीकथेचा देश निसर्गसौंदर्याने एवढा अफलातुन नटला सजला असेल यावर आधी विश्वास बसत नव्हता, पण आता नक्कीच बसलाय. स्वीसचे फोटो आधी पाहिले होते. पण प्रत्येकाची आवड आणी सौंदर्य पहाण्याची दृष्टी वेगळी असते.

तुम्ही अतीशय सुंदर सहल घडवलीत. फोटो पहातांना आपण प्रत्यक्ष तिथे आहोत असा अनूभव आला. तुम्ही दिलेली माहिती पण छानच आहे. धन्यवाद परत एकदा या सहलीबद्दल. आता युंगफ्रॉ / जुंगफ्रॉ ला न्या पाळण्यात बसवुन्.:फिदी:

व्वा! सुंदर फोटो आणि माहिती. Happy
धन्स दिनेशदा!! अशा आम्हाला अपरिचित आणि अद्भुत ठिकाणांची माहिती करुन दिल्याबद्दल!! >>>>>>>>>>>+१ Happy
मस्त होणार आहे ही मालिका, दिनेश. सुंदर फोटो आणि नेटकी माहिती.>>>>>>>>+१ Happy

दिनेशदा, धन्यवाद !!!!!
आम्हाला अपरिचित आणि अद्भुत ठिकाणांची माहिती करुन दिल्याबद्दल!! >>>>>>>>>>>+१

दिनेशदा, मस्तच फोटो आणि वर्णन. फुलं तर विशेषकरून मस्त. पिवळी फुलं खूपच आवडली.

स्वित्झर्लंडला गेल्यावर भरपूरच फिरायला लागतं. त्याकरता सरळ एक स्विस पास घेऊन टाकायचा. ट्रेन, बस, ट्रॅम सगळीकडे पुन्हा पुन्हा तिकीटं काढायला लागत नाहीत.

स्टेशनवर चौकशी खिडकीत आपलं त्या दिवसाचं डेस्टिनेशन सांगितलं की गाडी किती वाजता, कोणत्या प्लॅटफॉर्मवरून निघणार, पुढे कोणत्या ठिकाणी स्टेशन बदलायचे आणि तिथेही कोणत्या प्लॅटफॉर्मवरून किती वाजता गाडी पकडायची ते परतीच्या प्रवासाची सगळी आखणी करून, प्रिंटआऊट काढून हातात देतात. एकदम शिस्तशीर काम. ट्रेनही सेकंदाबरहुकुम वेळेवर येते.

फर्स्टक्लास, सेकंडक्लास सारखाच असतो. फक्त फर्स्टक्लासमध्ये गर्दी कमी आणि पैसे जास्त.

ट्रेनमध्ये अनाउन्समेंट करताना फ्रेंचमध्ये "पुश्शिनाहे" असं म्हणत राहतात ते पहिल्यांदा मजेचं (आणि नंतर कंटाळवाणं होतं). त्याचा अर्थ पुढचं स्टेशन! Proud

बरेचजणं स्वित्झर्लंडमध्ये एकाच शहरात राहून पूर्ण देशभर फिरतात. ते शक्य असलं तरी ट्रेनचा प्रवास खूप करावा लागतो. आम्ही गेलो होतो तेव्हा (जिनिव्हा एअरपोर्टला उतरून) मॉंत्र्यु, झरमॅट, ल्युसर्न आणि झुरीक (येथूनच परतीचं विमान) असा प्रवास आखला होता. त्या त्या ठिकाणाहून आजूबाजूची ठिकाणं पाहणं सोपं जातं. माँत्र्युहूनच गोल्डनपास एक्स्प्रेस निघते तर झरमॅटहून ग्लेशियर एक्स्प्रेस निघते.

ग्रुएर येथिल चीज फॅक्टरी आणि अतिसुरेखसं मेडीएवल शहर पाहून मॉंत्र्युला परत येताना त्या स्टेशनवर योगायोगानं गोल्डनपास ट्रेनमध्ये बसलो. ती परतीच्या मार्गावर होती आणि टुरीस्ट सीझन सुरू झाला नव्हता त्यामुळे (पुन्हा योगायोगानंच) पहिल्या डब्यात चढलो आणि जॅकपॉटच लागला.

काही गोल्डनपास ट्रेन्समध्ये हा पहिला डबा फर्स्टक्लासचा असतो आणि मोटरमन वरच्या मजल्यावर बसलेला असतो. डब्याला पुढे फक्त काच आणि त्यातून पहिल्या रांगेतल्या सहा सीटसना अप्रतिम दृष्य दिसतं. डब्यात आम्हीच तिघं होतो (आमच्याकडे फर्स्टक्लासचा स्विसपास होता नाहीतर चढू दिलं नसतं कारण या डब्याकरता एक स्पेशल अटेंडट होती) आणि रात्र झाली असली तरी तो अनुभव केवळ अदभुत होता. या सीटस आधीच बुक कराव्या लागतात आणि थोडा प्रिमीयमही द्यावा लागतो. नंतर दिवसा प्रवास करावा म्हणून आम्ही चौकशी केली तर सीटस ऑलरेडी भरल्या होत्या.

आभार दोस्तांनो, या ट्रीपचे दोन टप्पे अजून बाकी आहेत. ( एकूण सहली ५ आहेत Happy )

मामी, स्विसची ट्रान्सपोर्ट सिस्टीम तर अगदी झक्कास आहे. आणि हवी ती माहिती सहज उपलब्ध असते.
अगदी साधे तिकिट काढले तरी, लगेच असणार्‍या गाड्यांचे टाईमटेबल हातात देतात.

तुमचा सिझन अगदी जराश्याने चुकला. यावर्षी त्यांचा उन्हाळा नेहमीपेक्षा नंतर सुरु झाला. काही ठिकाणचे रस्त्यावरचे बर्फ अजून तसेच होते. ऑगस्ट पासून परत बर्फ पडायला सुरवात होईल असे कळले. ते ऑक्टोबरमधे थोडेसे कमी होते.

यावेळेस चीज / चॉकलेट फॅक्टरी टाळलीच. म्यूझियम पण बघायचे बाकी ठेवले. त्याला पुर्ण दिवस हवा आणि बाहेर इतका सळसळता निसर्ग असताना.. शिवाय मोजक्या दिवसात सगळे बसवायचे होते ना !
माझ्या व्हीसा अ‍ॅप्लिकेशनमधे थोडा तांत्रिक प्रॉब्लेम होता. अर्ज करण्यापुर्वी मी भारतात ६ महिने नव्हतो, त्यामूळे अर्ज प्रिटोरियाला करायला हवा होता. पण मी प्रत्यक्ष जाऊन माझी बाजू मांडली. बारकासा इंटरव्ह्यू झाला, पण व्हीसा मिळाला.

अप्रतिम वर्णन आणि फोटोज दिनेशदा. Happy

तुमच्या आधीच्या स्विस वर्णनात तुम्ही एकच गॉर्जचा फोटो दाखवला होता आणि तो मी पाहिलेल्या गॉर्जशी मिळताजुळता होता. मात्र, हे फोटो पाहिल्यावर लक्षात आलं, की मी ग्रिन्डेलवाल्ड मधल्या ग्लेत्शरश्लुकला (ग्लेत्शर गॉर्ज) गेले होते. आर गॉर्ज आणि तो वेगवेगळे आहेत. ग्रिन्डेलवाल्डच्या गॉर्जच्या बाहेरच्या बाजूला एक छोटेसे क्रिस्टल म्युझिअम आहे. हे गॉर्ज तसे बर्‍यापैकी निर्जन ठिकाणी वसलेले आहे. आम्ही तिकडे कारने गेलो असल्याने आणि इतरही लोक तसेच- पर्सनल कारने आलेले दिसले त्यामुळे पब्लिक ट्रान्स्पोर्टच्या व्यवस्थेची कल्पना नाही. तिथेही चालण्यासाठी अशीच लाकडी वाट बनवलेली होती.

हे माझे काही फोटो:
१. हा गॉर्जच्या बाहेरील व्ह्यू:-

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

Pages