Submitted by मी मुक्ता.. on 5 August, 2013 - 01:22
जाई, जुई आणि चमेली यातील नक्की फरक काय?
५ पाकळ्या आणि एकाच्या मागे गुलाबीसर पट्टा असणारी ती जाई ना?
कोणी फरक स्पष्ट करुन सांगू शकेल का? जमल्यास फोटोसह.. फोटोची लिंक दिली तरी चालेल..
प्लीज...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेवाळीला सुवास असतो ना?
नेवाळीला सुवास असतो ना? कागड्याला वासच नसतो ना?
हो का? मग मला नेवाळी म्हणजे
हो का? मग मला नेवाळी म्हणजे कोणती ते अगदीच लक्षात येत नाहीये.
(फोटो दाखवा म्हटलं तर एकजण दाखवेल तर शपथ! :P)
मी पण आता कन्फ्यूज झालेय
मी पण आता कन्फ्यूज झालेय गूगलला nevali kagada लिहिलेलं समजत नाहिये.
मी-आर्या फक्त बरोबर . बाकी
मी-आर्या फक्त बरोबर :).
बाकी सगळे चूक
श्रा.घे भाजी सारखा फुलणार हा बीबी !
मुक्तेश्वरच्या फोटो मधिल
मुक्तेश्वरच्या फोटो मधिल :
चमेली = जाई
आणि जुई बरोबर आहे
बाई, वाक्य पूर्ण करायला काही
बाई, वाक्य पूर्ण करायला काही सुचलं का? भारीच उत्सुकता लागून राहीलीये.
>>मी ज्या वेलीला जाई म्हणते
>>मी ज्या वेलीला जाई म्हणते तिला इकडे विदर्भात चमेली म्हणतात, तर जुईला जाई म्हणतात.
अहो नाही हो! चमेलीला चमेली, जाईला जाई आणि जुईला जुईच म्हणतात. तिन्ही वेगळी फुलं आहेत (बहुतेक).
मुक्तेश्वर यांनी टाकलेले दोन्ही फोटो बरोबर वाटले.
मुक्तेश्वरांनी फक्त चमेली
मुक्तेश्वरांनी फक्त चमेली बरोबर टाकलीय.
दुसरा फोटो जो टाकलाय त्यांनी तो नेवाळीचा आहे.
आणि हो, जाई, चमेली व जुइ पुर्ण वेगळे फुलं आहेत.
मी_आर्याने जो दुसरा फोटो
मी_आर्याने जो दुसरा फोटो टाकला आहे त्यालाच आम्ही सायली म्हणतो बहुतेक
आणि एक बरसाती जाई म्हणूनही एक प्रकार आहे ना..
चम्पा कोण असते? जाई सहसा
चम्पा कोण असते?
जाई सहसा घराच्या बागेत लावली जात नाही कारण घरातील सगळ 'जाई जाई' होत अशी (अंध)श्रद्धा असायची - माळ्यापासून मालकापर्यंत सर्वांची (काहीही न..!) त्यामुळे कुंपणाबाहेर, गेटवर सापडते ती जाई
आमच्या बाल्कनीला पूर्ण जाईचा
आमच्या बाल्कनीला पूर्ण जाईचा वेल होता. मागच्या पानावर मी आर्याने टाकलेला फोटो आहे तशीच फुलं व पानं असायची..
लगेहाथ विचारून घेते. वेलीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? जाम आठवत नाहीये.. :|
वेलीला इंग्लिशमध्ये काय
वेलीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? क्रीपर
जाई, जुई आणि चमेली - नक्की
जाई, जुई आणि चमेली - नक्की कश्या ओळखाव्या? >>> न ओळखता यायला काय झालं ? .............. तिळ्या आहेत का त्या ?
तिळ्या आहेत का त्या ? >> झाल
तिळ्या आहेत का त्या ? >> झाल का सुरु धागा भरकटवने!! एकमेकीना प्रोक्सी हजेरी लावतात न त्या मग ... नाही गोंधळ होणार?
जाई सहसा घराच्या बागेत लावली
जाई सहसा घराच्या बागेत लावली जात नाही कारण घरातील सगळ 'जाई जाई' होत अशी (अंध)श्रद्धा असायची - माळ्यापासून मालकापर्यंत सर्वांची (काहीही न..!) त्यामुळे कुंपणाबाहेर, गेटवर सापडते ती जाई >>> सिमन्तिनी, म्हणजे पाहुणे आल्यापावली परत जात असतील!
विश्वकोशातली जाई(म)=
विश्वकोशातली जाई(म)= चमेली(हिं)
जुई
वर्रच्या फूलगर्दीत मोगरा येऊन
वर्रच्या फूलगर्दीत मोगरा येऊन गेला नाही का?
आज संध्याकाळी आमची गजरा जर आली तर हमखास जाई आणि मोगर्याचे फोटो टाकेन.
सायली आणि कुंद दोन्ही एकच ना
सायली आणि कुंद दोन्ही एकच ना का वेगळे?
आणि मग मदनबाण कुठला?
आणि मग मदनबाण कुठला?
अगगं.. किती ते प्रश्न.. एक
अगगं.. किती ते प्रश्न.. एक उत्तर धड मिळालेल नाहीये..
कोणीतरी सगळ्या फुलांचे फोटो टाका ना.. टोट्ल कन्फुजन
हा मदनबाण. मी काढलेला सापडत
हा मदनबाण. मी काढलेला सापडत नसल्याने आंतरजालावरून साभार!
सायली आणि कुंद दोन्ही एकच ना
सायली आणि कुंद दोन्ही एकच ना का वेगळे?>>> अगदी वेगळे. सायलीच्या पाकळ्या नाजूक असतात आणि वेलीवर येतात. कुंदाच्या पाकळ्या जाडसर असतात आणि त्याचे झाड असते. आणि अर्थात वासही वेगळा वेगळा असतो.
जाई ,जुई चमेलि, यांचा एक औषधि
जाई ,जुई चमेलि, यांचा एक औषधि ऊपयोग सांगते जो मि माज्या मुलिसाथि ति लहान आसतांनाकेला होता...तिला केस फार कमि होते.माझि मैत्रिन म्हनालि कि, तिचे सर्व केस काढुन टाक आणि वरिल वनस्प्तिच्या फांद्या जाळुन त्यांचि राख खोबरेल तेलात कालऊन डोक्याला लाऊन फड्के गुनडाळुन ठेव.हा प्रयोग रात्रि झोपण्याअगोदर दोन तास अगोदर कारणे अंथरुणाला तेल न लागावे म्हणुन......मझ्या मुलिला भरपुर केस आले.....हा माझा अनुभव...पहा कुणाला याचा ऊपयोग होतो का......
हाय दैय्या! इतनी सारी पोस्टस
हाय दैय्या! इतनी सारी पोस्टस मगर कन्फुजनवा अभी भी बाकी है.....
जाई, जुई आणि चमेली - नक्की
जाई, जुई आणि चमेली - नक्की कश्या ओळखाव्या?
सोप्पय!
आधी "जाई" अशी हाक मारायची. जी मागे वळून पाहील तीचे नाव जाई!
हेच मग जुई आणि चमेलीबाबत करायचे
अजुन तिढा मिटला नाही
अजुन तिढा मिटला नाही का
जागुताई कुठे आहेस
जाई, तुझा फोटो टाक!
जाई, तुझा फोटो टाक!
मामे
मामे
मुक्ता काल माझ्याकडे याहु
मुक्ता काल माझ्याकडे याहु उघडत नव्हत त्यामुळे मेल मिळाला नव्हता. पण मी तुझी लिंक पाहीली तेंव्हा फोटो शोधायला लागले आणि थोड्यावेळात ऑफिसमध्ये कामात पूर्ण बिझले. रात्री मोबाईल मधून तुझा धागा उघडला तेंव्हा मुक्तेश्वर यांनी माझे काम सोपे केले.
मुक्तेश्वर यांनी टाकलेले फोटो बरोबर आहेत.
ही नेवाळी.
कागडयाच्या पाकळ्या थोड्या रुंद असतात आणि वास जरा उग्र असतो किंवा नसतोच म्हणा. नेवाळीला पण तसा विशेष वास नसतो.
मदनबाण. ह्याला भरपूर सुगंध असतो.
व फुल मोगर्यापेक्षा मोठे असते.
कुंद .
ही चमेलीची कळी. ह्याची पानेही छोटी असतात.
ह्या जूईच्या कळ्या आकाराने लहान असतात.
फुललेली जुई
ही रातराणी
डबल मोगरा
मोगरा
रानजाई
तगर
आणि प्रांतानुसार वेगवेगळी नावे असू शकतात.
आली आली जागू आली. सध्या
आली आली जागू आली. सध्या आमच्या कडे तीन प्रकारची फुले फुलतायत. १ जुई, २. नेवाळी, ३. बहुतेक जाई असेल.
Pages