बाबा

Submitted by अनघा कुलकर्णी on 4 August, 2013 - 07:16

बाबा

चंदना सारखा झिजतो तो, कुटुंबासाठी घाम गाळतो ,
स्वकष्टाचे चीज करतो. चिमुकल्यांना आसरा मिळावाम्हणून घरटे बांधतो तो ।

असेल त्या परीस्थितीत स्वत:ला झोकून देतो,
उनपावसाचा मारा झेलीत संकटांशी हात मिळवणी करतो तो।

माया ,ममतेचे पाश जरा दूर ढकलतो ,
आद्य कर्तव्याची कास धरतो ।

घराच्या सुखा साठी स्वत: नव्याने रोज उभा राहतो तो,
दिसत नाही त्याचे कष्ट ,संयम ,शांतता,
सहन शिलतेचा मंत्र सतत जपत असतो तो।

उच्च अधिकारी होतो तो,
गर्व नाही ,अभिमान बाळगतो तो I

कल्परुक्षाचे झाड लावतो,पुढील पिढीच्या सुखासाठी आज मात्र झोकून देतो।
जाणीव असावी मुलांना असा कष्टकरी बाबा आपला असतो।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनघा,
खूपच सुंदर निरुपण केलेत पितारुपी देवाचे.
छान वाटले वाचुन, माझे बाबा आठवलेच, माता पित्याची खर्‍या अर्थाने जाण राखत आहात, धन्य आहात.
नमस्कार |