मैत्रीदिनाच्या समस्त मायबोलीकरांना मनापासून शुभेच्छा!

Submitted by के अंजली on 3 August, 2013 - 22:53

३ वर्ष १५ आठवडे...

मायबोलीशी नातं जोडून आज इतके दिवस झालेत!

या आंतरजालावर जेंव्हा मायबोली मला सापडली तेंव्हा इतका आनंद झाला की बास..! नविन नविन लेख आणि कविता वाचायला मिळतील याचाच आनंद होता तो.. एखादा मोठ्ठा खजिना गवसावा तसं झालं अगदी..!

इथल्या कविता, लेख, प्रकाशचित्रे,प्रवासवर्णने,कला, ललित,विनोदी लेखन.. पाककला,बापरे कितीतरी विवीध साहित्य वाचायला मिळाले..काही अगदी सकस, काही अभ्यासपूर्ण,काही वाचल्यावर अगदी आहा! असे तोंडून यावे इतके सुंदर!!

या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यात अगोदर आपले अ‍ॅडमीनदा यांचे खूप आभार! आज त्यांना सर्वात प्रथम मैत्रीदिनाच्या खूप खूप शुभेच्छा! Happy

माझ्या या मायबोलीच्या प्रवासात ज्यांच्या उत्तमोत्तम साहित्याने मला वाचनाचा आनंद मिळाला,मला खूप काही शिकायला मिळालं त्या माझ्या न पाहिलेल्या..ज्ञात अज्ञात मायबोलीकरांना..

ज्यांच्याशी संवादातून मला आनंदाचे काही क्षण गोळा करता आले त्या मायबोलीकरांना..

आणि मायबोलीला भेट दिल्याशिवाय ज्यांना चैन पडत नाही अशा माझ्यासारख्या मायबोलीकरांना.. Happy

आणि माझ्या समस्त मायबोलीकर मित्रांना..

आजच्या मैत्रीदिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा!!!

तुम्हां सर्वांना अभिमान वाटावा असा मित्रपरिवार लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना...!! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समस्त मायबोलीकरांना मैत्रीदिनाच्या भरपुर शुभेच्छा. छान मनोगत के अंजली.

अंजली आपण माबो.ची विश्वप्रार्थनाच लिहिलीये!!
सगळ्यांना मैत्रदिनाच्या हार्दीक शुभेच्छा !!

अंजली ,
>>या आंतरजालावर जेंव्हा मायबोली मला सापडली तेंव्हा इतका आनंद झाला की बास..! नविन नविन लेख आणि कविता वाचायला मिळतील याचाच आनंद होता तो.. एखादा मोठ्ठा खजिना गवसावा तसं झालं अगदी..!
या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यात अगोदर आपले अ‍ॅडमीनदा यांचे खूप आभार! आज त्यांना सर्वात प्रथम मैत्रीदिनाच्या खूप खूप शुभेच्छा! >>

अगदी माझ्या मनातले भाव आणि आपल्या सर्वांच्याच..

तुला,अ‍ॅड्मिनदा आणि सर्व माबोकरांना खूप मैत्रीपूर्ण शुभेच्छा..