ट्रॅव्हलिंग नॉऊ ऍन्ड देन

Submitted by मधुरा आपटे on 3 August, 2013 - 08:59

कोकणातली एस टी आणि तिचा तो प्रवास म्हणजे पूलंच्या'म्हैस'साठी जमून आलेलं उत्तम कॉम्बिनेशन!पण २१व्या शतकाचे वारे वाहू लागले आणि सगळचं चित्र पालटलं,प्रवासाचं रुपांतर ट्रॅव्हलिंग मध्ये झालं,प्रवाशी झाले टुरिस्ट आणि कोकणासारखी ठिकाणं झाली टुरिस्ट स्पॉट!अणि हा बदल तिकिटांपासून ते मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत सगळ्यात झाला.पहिले प्रवास म्हटलं की अगदी सगळं घरच उचलून नेण्याच्या तयारीला लोकं लागायची,आंथरुणं-पांघरुणं इथपासून ते जेवणापर्यंत!उन्हाळ्याच्या सुट्ट्या,घरातली शुभकार्य अशी निमित्त घेऊन लोकं फिरायला जायचे.पण विकली ऑफचं फॅड आलं आणि आठवड्याचे शनिवार-रविवार आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्या ट्रॅव्हलिंग साठी कारणं ठरु लागली.आणि ट्रॅव्हलिंगचा नूरच सगळा पालटला,त्याचाच हा घेतलेला आढावा.... funny_amazing_interesting_weird_stuff_american-tourists_200907161348195481.jpgट्रंका ते सॅक:
ट्रंका,होल्डॉर,पिशव्या अशा टिपिकल सामान ठेवण्याच्या वस्तूंची जागा टुरिस्ट बॅग्जने घेतलेली आहे.मोठमोठे पेटारे,पत्र्याच्या ट्रंका,कापडाच्या पिशव्या अशी मोठीच्या मोठी लिस्ट आहे.पण त्या वापरायला कठीण आणि त्याचा व्याप बराच मोठा असल्याने त्या गोष्टी हळू हळू मागे पडल्या आणि वापरायला सोप्प्या,हलक्या आणि मूळात जास्त सामान मावू शकेल अशा सूटकेस घराघरात दिसू लागल्या.पण आता ते ही मागे पडताना दिसतयं!पाठीवरती मोठ्या मोठ्या ट्रॅव्हलिंग बॅगा किंवा सॅक,व्हीलच्या सूटकेस लावून फिरणारे फॉरेनर्स लोकांना दिसू लागले आणि भूरळ पाडू लागलेत.त्यामुळे आता तुम्ही कुठेही जा तसल्या बॅग्ज जागोजागी दिसतील.

तिकिट बुकिंग:
रेल्वे/एसटीच्या त्या लांबच लांब रांगा,रिझर्वेशनसाठी असलेली ती भली मोठ्ठी गर्दी,गोंधळ,गडबड आणि उन्हाळ्याचे दिवस असतील तर गळणार्‍या घामाच्या धारा आणि पावसाळा असेल तर झालेली चिकचिक!नको वाटतं!जवळ जवळ ५-६ दशकं आपण बाहेरगावी जायचं म्हटलं की ह्या प्रंसगाला तोंड द्यावच लागायचं.पण गेल्या ५-६ वर्षांपासून ह्यासगळ्यालाच डच्चू दिला जातोय कारण म्हणजे ऑनलाईन बुकिंग!ट्रॅव्हल एजन्ट हे अगदी गल्लोगल्ली झालेले असल्याने ऑन-लाईन बुकींग हि सहज आणि सोप्पी पद्धत सगळे अवलंबताना दिसतात.रेल्वे पासून ते विमाना पर्यंत सगळ्याचच टिकिट ऑन-लाईन असल्याने त्यालाच प्रिफरेन्स दिला जातोय.
1240390164_car_clipart_3.jpgशिदोरी ते लंच पॅक:
खायचं-पेयचं सामान ही म्हणजे ट्रॅव्हलिंग मधली अति महत्त्वाची गोष्ट!पण देशात टूरिझमचे वारे वाहू लागले आणि ह्या सगळ्या गोष्टी भर प्रवासात मिळू लागल्या.कोल्ड्रींक,चॉकलेट्स इथ पासून ते लंच पॅक पर्यंत सगळ्याच सोयी 'ड्युरिंग द ट्रॅव्हल' मिळू लागल्या. पूर्वी बरोबर घेऊन जावा लागणारे तांबे आणि भांडे बाद होऊन त्याची जागा थर्मास आणि प्लॅस्टिकच्या बॉटल्सनी घेतली.ट्रॅव्हलिंगला लागणारा कमी वेळ त्यात 'हर एक गांवकी स्पेशॅलिटी' असा प्रकार असल्याने चटणी,लोणची,चिवडे,लाडू ह्यांचे पत्ते कट आहेत.मुबलक प्रमाणात आणि चविष्ट सगळं त्या त्या गावात मिळत असल्याने टुरिस्ट त्या पदार्थांवर मस्त ताव मारताना दिसतात.

गाव ते रिसॉर्ट:
सुट्ट्या म्हणजे आजोळी जाण्याचं परमिट असायचं.त्यात ते आजोळ गावात असेल तर त्यासारखी मजा नाही!सकाळी लवकर उठून एसटीने किंवा रेल्वेने जायचं पूढे गावात गेल्यावर टांगा किंवा बैलगाडी,आंघोळ करायला नदी,खायला जांभळं,बोरं,चिंचा,आंबे असं बरच काही!गावची मजाच न्यारी असं म्हणाणारे संख्येने सापडायचे!पण २१व्या शतकात पदार्पण केल्यावर बराच फरक पडला!स्वतःचं गाव आहे असं म्हणणारे आता विरळ झालेत,पण निसर्गाची ओढ नाही म्हटलं तरी आहेच!त्यामुळे ह्यांची भूक नानाविविध रिसॉर्टस् भागवतायेत!त्यात आता विकली ऑफ असल्याने शहराच्या जवळ असलेले पण तरीही निसर्गरम्य असलेले रिसॉर्ट अशा टूरिस्ट लोकांना ऍट्रॅक्ट करतायेत.वन डे किंवा टु डे साठी अशी रिसॉर्टस् उत्तम असल्याने अशांची संख्या भलतीच वाढतेय.सुंदर नदी,दाट झाडी,उत्तम जेवण आणि स्वस्तात मस्त असा रिसॉर्टवाल्यांसाठी युएसपी ठरतोय.

कॅम्पेन: sleeping-in-tent.png
कॅम्पेनिंग हा पाश्चात्त्य प्रकार आता आपल्या इथेही रुजू होतोय.त्यामुळे हल्ली बर्‍याच ट्रॅव्हल कंपन्या कॅम्पेन करण्याची सोय सुद्धा टूरिस्टना करुन देतात.नदीच्या किनारी किंवा जंगलात कॅम्प टाकून रहाणं हे युथला आकर्षित करतयं. इझी टू युज अस ह्या कॅम्पचं वैशिष्ट्य असल्याने तो कुठेही घेऊन फिरता येतो.समोर शेकोटी पेटवून,आणलेला शिधा शिजवून खाण्यात युथला थ्रिल वाटतयं.

कॅमेरा,मोबाईल,टॅब आणि....
प्रवासाला निघायचं म्हटलं की घरातली पोरंटोरं पहिले पत्ते,सापशिडी,बुद्धीबळ अशा बैठ्या खेळांची जमवाजमव करुन ठेवायची.पत्यांचे खेळ,लूडो,सापशिडी हे प्रवासात खेळताना एक वेगळीच मजा असायची.पण टेक्नॉलॉजी वाढल्याने मोबाईल,टॅब,व्हिडीओ गेम्स हे हातात आले आणि ते बैठे खेळ मागे पडले.पत्ते,सापशिडी,बुद्धिबळ हे आता मोबाईल,टॅब ह्यांच्यात सहज उपलब्ध झालेत.त्यामुळे प्रवासासाठी लागणार्‍या महत्त्वाच्या ऍक्सेसरीज मध्ये आता मोबाईल,टॅब,व्हिडीओ गेम्स हे ही समाविष्ट झालेत.त्यात कॅमेरा,व्हिडिओ आणि मॅप अशाही फॅसिलिटीज उपलब्ध असल्याने वेगळा कॅमेरा घेण्याची किंवा पत्ते विचारण्याचीही गरज राहिलेली नाही.

प्रत्येक प्रवासाची मजा ही वेगळी असते.त्यात अनेक चांगल्या-वाईट गोष्टी घडतात.तसचं प्रवास ते ट्रॅव्हलिंग हाही प्रवास काही चांगल्या-वाईट गोष्टी देणारा आहे.तुम्ही त्याची मजा किती घेता हे मात्र तुमच्यावर अवलंबून आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाण्याची पिशवी हे एक प्रकरण असायचं...त्यातनं गळुन न गेलेलं पाणी गार रहायचं. खाण्याचं म्हणाल तर जिथे जाल तिथलं फेमस काय ते खाउन पहावं, वेगवेगळ्या चवी अन प्रकार कळतात.

बाकी लेख बरा जमलाय.

आवडलं ... मजा घेणे महत्त्वाचं, फक्त साधनं बदललीत इतकच...

ही चित्रं तुम्ही स्वतः काढलेली आहेत की आंतरजालावरुन घेतलेली आहेत? आंतरजालावरुन घेतलेली असल्यास , प्रताधिकार मुक्त आहेत का ? प्रताधिकार मुक्त असल्यास कुठुन घेतली त्याचा ऋणनिर्देश करायला हवा