Submitted by आनंद पेंढारकर on 29 July, 2013 - 10:57
पेलुनी आयुष्य ओझे चालताना एकटा
वाट गेली फसवुनी चकव्यात फिरतो एकटा
दिवस सारा भोवताली माणसांचे घोळके
रात्र होता, चांदणे, आकाश अन मी एकटा
वाटतो आनंद अवघा गोतगण ना पाहता
दु:ख कुरवाळीत आडोशास बसतो एकटा
बूच भरले दु:ख त्यांचे उठुन जाती संपता
बाटलीच्या संपण्याचा मीच साक्षी एकटा
मैफिलीची ओढ, टाळ्यांची नशा रक्तामध्ये
आळवीतो मग कधी मी मारवा कां एकटा ?
पाठ राखायास आहे सैन्य आता केवढे
फुंकली जेव्हा तुतारी मीच होतो एकटा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काफिया काय आहे?
काफिया काय आहे?
गझल नाही ही ...या विभागातून
गझल नाही ही ...या विभागातून कविता विभागात हलवा ही रचना