म्हाताऱ्याच्या प्रेताजवळ

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 29 July, 2013 - 10:03

साठ वर्ष
म्हातारा म्हातारी
संसार करत होते
खेड्यातील घरामध्ये
दोघेच राहत होते .
एकदा म्हातारा
खूप आजारी पडला
अचानक एका रात्री
मरुनिया गेला
घरात एकटी म्हातारी
कडी लावून बाहेर पडली
दूरवर शेजारी
आमच्या घरी आली
आणि म्हणाली
सांगायाला बर वाटत नाही,
पण मला फार
भीती वाटू लागली !
म्हातारा तर गेला
वाटले ,
मला घेवून गेला तर ?
आणि जर पुन्हा उठला
तो तोच नसला तर ?
जिता होता तोवर
कधी काही वाटले नाही
आजारपण काढले त्याचे
कमी केले नाही
पण गेल्यावर तो
आपला वाटत नाही .
भीतीने मन,
थिजून गेले बाई
तिच्या डोळ्यातून
अश्रू वाहत होते
ते दु:खाचे होते का
भीतीच्या लाजेचे
मला कळलेच नाही .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भज गोविंदम...चर्पटपंजरिकेच्या एका श्लोकात म्हणून तर म्हणलं आहे, गतवति वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन्काये।। (देहामधूनी जीव गेला, पत्नीही घाबरे, त्या देहाला । )

या ओळी एका F.B वरील सहकाऱ्याने पोस्ट केल्या .आवडल्या म्हणून तश्याच पोस्ट करत आहे .

वेगळा प्रयोग, आवडला. कवितेच्या फॉर्ममध्ये बरंच काही आणत असता नेहमीच. ले.शु.