जगण्यावरचे लाख पहारे !

Submitted by सुप्रिया जाधव. on 29 July, 2013 - 00:17

अतृप्तीच्या लाटेवरती
इच्छांचे झुलते डोलारे
तना-मनाच्या व्दंव्दामध्ये
कर्तव्यांचे दूर किनारे

सामंजस्याच्या वाटेवर
वैमनस्यांचेच निखारे
नात्यांच्या भिंती तकलादू
उव्दीग्न मनाचे गाभारे

नैतिकता अन संस्कारांचे
विचारांस फुटतात धुमारे
शिथिल होता होतच नाहीत
जगण्यावरचे लाख पहारे

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नैतिकता अन संस्कारांचे
विचारांस फुटतात धुमारे
शिथिल होता होतच नाहीत
जगण्यावरचे लाख पहारे

मस्त!

सुप्रिया,
छान लिहीता तुम्ही. ही कविता वाचताना तर अगदी गाणं गायल्यासारखं वाटावं इतकी छान लय पकडते. आणि वरून यातल्या भावनांना चपखल पकडणारे शब्द! क्या बात है! हे पहारे बसवण्यात स्वतःचा वाटा किती अन्‌ दुसऱ्यांचा किती हा प्रश्न पुन्हा नव्याने पडला मला हे वाचून.

बेफिजी, विदिपा धन्स !

सई गs सई,

<<<<हे पहारे बसवण्यात स्वतःचा वाटा किती अन्‌ दुसऱ्यांचा किती हा प्रश्न पुन्हा नव्याने पडला मला हे वाचून.>>>>

तेच तर !

नैतिकता अन संस्कारांचे
विचारांस फुटतात धुमारे......त्यामुळे स्वतःचाच स्वतःवर कडक पहारा असतो सदोदीत Sad

धन्यवाद सई !

-सुप्रिया.

खूप आवडली कविता. अंत:करणाला भेदून जाते, विचार करायला भाग पाडते.

माझं एक वैयक्तिक मत आहे. सगळी बंधनं आपणच आपल्यावर लादून घेतो.