मायबोली गणेशोत्सव २०१३ साठी स्वयंसेवक हवेत

Submitted by रूनी पॉटर on 26 July, 2013 - 12:12

मायबोली गणेशोत्सव २०१३ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.

गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.

मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.

पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चैत्राली, चैतन्य दिक्षीत, नीलमपरी, पेरू, सानी, साती, रिया., भारती.., सुहास्य, संदीप एस.

>>> है शाब्बास! दणदणीत आहे संयोजक मंडळ. दणक्यात होऊ द्यात गणेशोत्सव, आम्ही वाट बघतोय.

मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. Happy

संयोजक मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा>>

गणपती बाप्पा मोरया!!! मायबोली गणेशोत्सव मंडळ वगैरे चालू झालं की मला बाप्पाचे खर्‍या अर्थाने वेध लागतात.

मंडळाचे अभिनंदन. दरवर्षीप्रमाणेच दणक्यात उत्सव साजरा होईलच ह्यात शंका नाही.. पण फक्त कार्यक्रम मर्यादीत ठेवा...

मस्त ! काही मदत लागली तर सान्गा .... देल्ली गुरगाव मधे शाडू ची मुर्ति कुथे मीळू शकेल ?

Pages