छातीत धडधड वाढते

Submitted by विजय दिनकर पाटील on 26 July, 2013 - 11:34

ही कविता ऐकायची असल्यास प्रत्यक्ष भेटा अथवा येत्या काही महीन्यात प्रकाशित होत असलेल्या पुस्तकाची वाट पहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्वस्थते वेगातली स्थित्यंतरे थांबव तुझी
आयुष्यभर मेंदूमधे मी नांदवत आलो तुला

केव्हा कुठे होईल काही नेम नाही वाटते
झाले जरासे खुट्ट की आपादमस्तक हालतो

सावट भयाचे वागवत एकेक अवयव राहतो
पाठीत येते कळ तशी छातीत धडधड वाढते

जगण्यातले स्वारस्य तर अद्याप नाही संपले
पण ती जुनी उत्फुल्लता केवळ हवी आहे परत

ह्या ओळी फार आवडल्या...

>>
जगण्यातले स्वारस्य तर अद्याप नाही संपले
पण ती जुनी उत्फुल्लता केवळ हवी आहे परत
<<
वा वा! काय नेमके चपखल शब्द वापरलेत!! Happy

कविता वेगळीच आहे, शेवटची ओळ आवडली.

अवांतरः छातीत धडधड वाढते वाचुन वाटले की दुनियादारीच्या गाण्यावर काही विडंबन केले की काय्!:फिदी: कवितेचे शिर्षक त्या चालीत वाचुन बघा.

"केव्हा कुठे होईल काही नेम नाही वाटते
झाले जरासे खुट्ट की आपादमस्तक हालतो" >>> ही द्वीपदी सर्वात विशेष वाटली. अस्वस्थतेचा भाव नेमका व्यक्त करणारी.

थकल्या शरीरावर नको ना गाजवू अंमल तुझा<<< वा

सावट भयाचे वागवत एकेक अवयव राहतो
पाठीत येते कळ तशी छातीत धडधड वाढते

जगण्यातले स्वारस्य तर अद्याप नाही संपले
पण ती जुनी उत्फुल्लता केवळ हवी आहे परत<<< व्वा व्वा

कविता आवडली.

आभार