Submitted by टकाटक on 26 July, 2013 - 03:22
पुण्यातील कोथरुड , पर्वती , सिंहगड रोड भागातील सिनीयर सिटीझन्सचा कुठला ग्रुप आहे का? माझ्या मित्राची आई एकटीच राहते. मित्र कामानिमित्त बाहेरगावी राहतो. आई आधीपासुन पुण्यात राहत असल्याने तिला ते ठिकाण सोडुन कुठेही जायची ईच्छा नाही. आजकाल एकटी असल्याने ती खुप चिडचिड करायला लागली आहे. सिनीयर सिटीझन्सचा असा कुठला ग्रुप मिळाला की ज्याच्यात बाहेर जाणं, सत्संग , काही सामाजिक कार्य असे होत असेल तर तिच्या वागण्यात बदल होऊ शकतो. घरात राहुन हे करणं ते करणं हे आपण फक्त विचारच करु शकतो प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही असा ग्रुप असल्यास सगळ्यांबरोबर अशा गोष्टी करायला उत्साह येतो आणि आपल्याकडे लक्ष दिलं जातंय ह्यामुळे सिनीयर सिटीझन्सना बरंही वाटतं.
कुणाला माहीती असल्यास जरुर कळवा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खालिल धाग्यावर जाऊन दिलेल्या
खालिल धाग्यावर जाऊन दिलेल्या नंबरवर फोन करा.
http://navasinhgadparisar.com/
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/43211 या धाग्यावर मी अगोदर माहिती दिली आहेच. कोथरुड परिसरात बरेच ज्येष्ठ नागरिक संघ कार्यरत आहेत.
पटवर्धनबाग, नवसह्याद्री, वारजे, पौड रोड, डहाणूकर कॉलनी इत्यादी परिसरांत नोंदणीकृत ज्ये ना संघ आहेत. त्यांचे नियमित स्वरूपात अनेक कार्यक्रम चालू असतात. सहली, व्याख्याने, स्लाईड शो, मनोरंजनाचे कार्यक्रम, समाजोपयोगी कार्यक्रम इ.इ. एका ठिकाणी संपर्क केलात तर तिथून अन्य ठिकाणच्या संघांबद्दलही माहिती कळू शकेल असे वाटते.
त्यातील पटवर्धनबाग संघाचा हा पत्ता :
एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संस्था,
'विरंगुळा केंद्र', डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी उद्यान, पटवर्धन बाग, एरंडवणे, पुणे ४११००४.
कार्यालयीन वेळ : सोम ते शुक्र सायं ५ ते ७.
फोन क्रमांक : ०२० २५४५१८६५.
अध्यक्ष : श्री दिगंबर दैठणकर : ९४२१००६६२५.
कार्याध्यक्ष : श्री मधुकर शिधये : ९८५०९५८६१५.
कार्यवाह : श्री श्रीकांत पुराणिक : ९७६३७०१४९४.
अरुंधती कुलकर्णीजी धन्यवाद
अरुंधती कुलकर्णीजी धन्यवाद
या खेरीज कोथरुड परिसरातील
या खेरीज कोथरुड परिसरातील अनेक उद्यानांमध्ये, सोसायट्यांच्या जागांमध्ये सकाळी हास्यक्लब असतात.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाशेजारील थोरात उद्यानात सकाळी हास्यक्लब असतो, दुपारी गीता वर्ग असतात, ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम असतात, जॉगिंग ट्रॅक आहे, एक वाचनालयही आहे, मंदिर आहे, जवळच पोहोण्याचा तलाव आहे.
नवसह्याद्रीच्या ताथवडे उद्यानातही बर्याच अॅक्टिविटीज चालू असतात.
तुम्हाला नक्की कुठल्या
तुम्हाला नक्की कुठल्या भागातली माहिती हवीये? कोथरूड की पर्वती की सिंहगड रोड?
लोकमान्यनगरमधील उद्यानामधे एक हास्यक्लब असतो. त्यांच्या भरपूर अॅक्टीव्हिटीज चालतात. तुमच्या मित्राच्या आईंना हा भाग जवळचा पडणार असेल तर त्यांचे तपशील विचारून सांगते.