झुंज

Submitted by UlhasBhide on 26 July, 2013 - 00:36

मूळ रचनेतील व्याकरणाची एक ढोबळ चूक, श्री. विजय पाटील (विदिपा) यांनी निदर्शनास आणल्याने
संपादित रचना प्रकाशित करत आहे. धन्यवाद विजय.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
झुंज (संपादित रचना)

झुंजणे जमले न ते तगलेच ना
मर्म हे कळले तरी वळलेच ना

जाणती का आसवांचे मोल ते
हुंदके ज्यांनी कधी गिळलेच ना

गीत जागे, स्पंदने हेलावता
जे न गाती ते कधी जगलेच ना

दु:ख प्याले रिचवुनी जे धुंदले
जीवनाला ते कधी विटलेच ना

झुंजता दु:खासवे जे झिंगले
हारही झाली तरी हरलेच ना

.... उल्हास भिडे (१-८-२०१३)

-----------------------------------------------------------------------------
खालील शेरात अलामत भंगल्याने तो वेगळा लिहिला आहे.

नांदतो 'उल्हास' ज्यांच्या अंतरी
प्रौढ झाले; वृद्ध ते झालेच ना

.... उल्हास भिडे (१-८-२०१३)

------------------------------------------------------------------------------

झुंज (मूळ रचना)

झुंजणे जमले न ते, तगलेच नाही
मर्म हे कळले तरी वळलेच नाही

काय ठावे आसवांचे मोल त्यांना
हुंदके ज्यांनी कधी गिळलेच नाही

स्पंदनाचा ताल चुकता जागणारे
गीत जे गाती न ते, जगलेच नाही

प्राक्तनाने ओढलेल्या कोरड्यांचे
विस्मृतीने वळ कधी पुसलेच नाही

रिचवुनी फेसाळलेले दु:ख-प्याले
धुंदले जे, जीवना विटलेच नाही

दु:ख-द्वंद्वाच्या नशेने झिंगले जे
हारही झाली तरी हरलेच नाही

.... उल्हास भिडे (२६-७-२०१३)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीमाझ्या प्रतिसादात पहिल्या...असे लिहिले होते ......

अनेक खयाल चंगले
शेर व्यक्तिशः मला अपेक्षा होती तितके भिडले नाहीत त्याची काही कारणे शोधतो आहे काही समजली आहेतही पण त्यावर चर्चा करणे फारसे महत्त्वाचेही नाहीच तसेही ...तूर्तास तुम्ही जी गझल उपलब्ध करून दिलीत तिचा जास्तित जास्त आस्वाद घेण्याच्या प्रयत्नात आहे

चर्चा करणे फारसे महत्त्वाचे नव्हते तरी स्वभाव त्रास देतो म्हणून मग गप्प बसवत नाही त्यामुळे उगाचच चर्चा करत बसलो होतो क्षमस्व

उकाका माफ करा

एक शेर आठवला स्वतःचे शेर लोकाना ऐकवायला आवडते म्हणून देत आहे गै न

तुझी सद्दी खपत नाही नि करतो बंड्खोरी मी
स्वभावा..वाटतो मित्रा.. तसा मी भांडका नाही

धन्स उकाका व पुनश्च सॉरी Happy

वैवकु,
"चर्चा करणे फारसे महत्त्वाचे नव्हते तरी स्वभाव त्रास देतो म्हणून मग गप्प बसवत नाही त्यामुळे उगाचच चर्चा करत बसलो होतो क्षमस्व " >>> मनमोकळी चर्चा घडायलाच हवी. चर्चेतून बरंच शिकता येतं.

"उकाका माफ करा" >>> कशाबद्दल ?? उगाचच ?
चूक्/अपराध इ.इ. केले तरच माफी मागतात ना ?

Pages