Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 25 July, 2013 - 01:39
कधी नको तर कधी वाटतोस रम्य दु:खा
तुझ्या नि माझ्यामधील नाते अगम्य दु:खा
असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा
जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा
तुझ्यामुळे जाणले सुखाचे महत्व यास्तव
तुझे हजारो गुन्हे ठरवतोय क्षम्य दु:खा
उपस्थितीने तुझ्या तशी तीव्रता मनाला
तरी मुखावरति नेहमी भाव सौम्य दु:खा (अलामतीची सूट)
जगात जीवन नसेल जर काय दु:खविरहित
जगावयाची कशास इच्छा अदम्य दु:खा
हजार 'कैलास' जन्मती तव कथन कराया
तुझ्यामुळे या 'कथा 'जोवरी सुरम्य दु:खा
---डॉ.कैलास गायकवाड
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाहवा ! मस्त ! पहिले दोन शेर
वाहवा ! मस्त !
पहिले दोन शेर खूपच आवडले .
मस्तय गझल एक्दोन जागी खटकले
मस्तय गझल एक्दोन जागी खटकले (किरकोळ मुद्दे आहेत)
पण हे लेखन ललितलेखनात का दिसते आहे हे समजू शकलो नाही चुकून मिश्टेक झाली असावी असा कयास आहे
छान.
छान.
कधी नको तर कधी वाटतोस रम्य
कधी नको तर कधी वाटतोस रम्य दु:खा
तुझ्या नि माझ्यामधील नाते अगम्य दु:खा
असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा
जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा
व्वा!
व्वा. गझल आवडली.
व्वा. गझल आवडली.
पहिले दोन शेर अत्तिशय आवडले.
पहिले दोन शेर अत्तिशय आवडले.
सुप्रियाताईंशी सहमत. मलाही
सुप्रियाताईंशी सहमत. मलाही पहिले २ फार आवडले!!
खरच... पहिले दोन सुरेखच आहेत.
खरच... पहिले दोन सुरेखच आहेत.
मनःपूर्वक आभारी आहे
मनःपूर्वक आभारी आहे सर्वांचा.
असा कसा बेसुमार आलास
असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा
जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा<<<
चांगला शेर!
(विपू)
असा कसा बेसुमार आलास
असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा
जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा <<< व्वा ! >>
मतला पण सुंदर
तुझ्यामुळे जाणले सुखाचे महत्व
तुझ्यामुळे जाणले सुखाचे महत्व यास्तव
हजार गुन्हे तुझे ठरवतोय क्षम्य दु:खा
जगात जीवन नसेल जर काय दु:खविरहित
जगावयाची कशास इच्छा अदम्य दु:खा >>>> हे दोन सर्वात विशेष..... दुसरा खास.
असा कसा बेसुमार आलास
असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा
जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा >> सुंदर!
सुर्रेख..सुर्रेख..! असा कसा
सुर्रेख..सुर्रेख..!
असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा
जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा>>> बहोत खूब..!
तारतम्य!! खल्लास!
तारतम्य!! खल्लास!
फेबू वर वाचली होती... दु:खाला
फेबू वर वाचली होती...
दु:खाला अगदी शेजारी बसवून छान गप्पा मारल्याइतकी सहजता असलेली गझल... क्लास!
दु:खाला अगदी शेजारी बसवून छान
दु:खाला अगदी शेजारी बसवून छान गप्पा मारल्याइतकी सहजता असलेली गझल<<<
बागेश्रींचा प्रतिसाद आवडला