पुन्हा नव्याने..

Submitted by के अंजली on 24 July, 2013 - 10:51

मनात माझ्या ठरली होती हीच कविता
शब्दांनी मग गुंफण केली पुन्हा नव्याने..

आशेच्या तंतुंनी जाळे अलगद विणता
उमजून सारे गुरफटले मी पुन्हा नव्याने..

गाता गाता आयुष्याने हरकत घेता
दिली वाहवा विसरुन सारे पुन्हा नव्याने..

शब्द वाटले जरा शहाणे खुळे वागता
हसले मीही सवेत त्यांच्या पुन्हा नव्याने..

नव्यानव्याने पुन्हा जुन्यावर प्रीती जडता
लखलख झाले जडाव सारे पुन्हा नव्याने..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संपूर्ण कविता सुंदरच ...
पण हे विशेष आवडले -
गाता गाता आयुष्याने हरकत घेता
दिली वाहवा विसरुन सारे पुन्हा नव्याने.. >>> केवळ अप्रतिम ...

गाता गाता आयुष्याने हरकत घेता
दिली वाहवा विसरुन सारे पुन्हा नव्याने..<<< व्वा! तुम्ही भेटू शकाल का?

शब्द वाटले जरा शहाणे खुळे वागता
हसले मीही सवेत त्यांच्या पुन्हा नव्याने..<<< छानच!

नव्यानव्याने पुन्हा जुन्यावर प्रीती जडता
लखलख झाले जडाव सारे पुन्हा नव्याने..<<< पहिल्या ओळीसाठी पुन्हा व्वा!

व्वा ! छान जमलेय.
"गाता गाता आयुष्याने हरकत घेता
दिली वाहवा विसरुन सारे पुन्हा नव्याने..>>> ही द्वीपदी सर्वात विशेष वाटली.

धन्यवाद सगळ्यांना!

>> तुम्ही भेटू शकाल का?....?

हो.. बेफि....अगदी अगदी... मायबोलीवरच.. Happy

काय दाद दिलीत!

शशांकजी, राजीवजी, भारतीताई, वैवकु आणि उल्हासजी..

खूप आभार!

उत्तम!!

आशेच्या तंतुंनी जाळे अलगद विणता
उमजून सारे गुरफटले मी पुन्हा नव्याने..

गाता गाता आयुष्याने हरकत घेता
दिली वाहवा विसरुन सारे पुन्हा नव्याने..

हे विशेष आवडले!

....
नव्यानव्याने पुन्हा जुन्यावर प्रीती जडता
लखलख झाले जडाव सारे पुन्हा नव्याने..

हे 'लखलख झाले जडाव सारे'... जबरदस्तं ... (हे माझ्या लिखाणात कुठेतरी लखलखलं तर ते तुला आत्ताच अर्पण)

नव्यानव्याने पुन्हा जुन्यावर प्रीती जडता
लखलख झाले जडाव सारे पुन्हा नव्याने..

अगदी लाख वेळा लख लख सुंदर

गाता गाता आयुष्याने हरकत घेता
दिली वाहवा विसरुन सारे पुन्हा नव्याने.....क्या बात !!! मस्त ओळी .