जेव्हा मी तुला पाहतो

Submitted by अमोल परब on 23 July, 2013 - 15:00

मरगळलेल्या मनात आनंदाच्या सरी बरसु लागतात......................जेव्हा मी तुला पाहतो

आजवर पाहिलेली सगळी स्वप्ने खरी वाटु लागतात......................जेव्हा मी तुला पाहतो

निराशेच्या अंधारात आशेचे नंदादिप उजळु लागतात.....................जेव्हा मी तुला पाहतो

मिटलेल्या डोळ्यांतही तुझ्याच अदा रेंगाळु लागतात......................जेव्हा मी तुला पाहतो

चांदणरातीतली सारी नक्षत्रे तुझीच छबी दिसु लागतात...................जेव्हा मी तुला पाहतो

तुझवर रुसायची सारी कारणे पुढे बालिश वाटु लागतात...................जेव्हा मी तुला पाहतो

सुखांची हरवलेली सारी गाठोडी अवचित हाती लागतात..................जेव्हा मी तुला पाहतो

तुझवीन जगण्याच्या सार्‍या कल्पना नकोश्या वाटु लागतात............. जेव्हा मी तुला पाहतो

आता

माझ्या स्वः च्या खुणा तुझ्या आस्तित्वात दिसु लागतात..................जेव्हा मी तुला पाहतो

Group content visibility: 
Public - accessible to all site users