सॅमसंग टॅब २ ७.० - ईबुक रिडर अ‍ॅप्स एसडी कार्ड्मध्ये ट्रान्सफर कसे करावे?

Submitted by यशस्विनी on 22 July, 2013 - 22:23

माझ्याकडे सॅमसंग टॅब २ ७.० आहे. ज्याची अंतर्गत स्टोरेज कॅपॅसिटी ८ जीबी व बाह्य स्टोरेज कॅपॅसिटी १६ जीबी आहे. मी मुख्यतः या टॅबचा उपयोग ईबुक्स वाचण्यासाठी करते. कोबो व बुकगंगा हे दोन इबुक रिडर्स मी वापरते. हे दोन्ही रिडर्स टॅबचे इनबिल्ट स्टोरेज वापरत आहेत, जो ४.४९ जीबी दाखवत आहे. या दोन्ही रिडर्समध्ये भरपुर प्रमाणात ईबुक्स डॉउनलोड केल्यामुळे माझी इनबिल्ट स्टोरेज कॅपॅसिटी खुपच कमी झाली आहे. त्यामुळे नविन विकत घेतलेली ईबुक्स, नविन अ‍ॅप्स, अ‍ॅप्सचे अपडेट्स डॉउनलोड होताना "स्टोरेज स्पेस रनिंग आउट" असा मेसेज येत आहे. टॅबमधील बाह्य १६ जीबी स्टोरेज कॅपॅसिटी अजुनही वापरली गेलेली नाही.

इतर सॅमसंग फोन/ नोट प्रमाने यामधील फाईल मॅनेजर / अ‍ॅप्स मॅनेजर मध्ये "मुव्ह टु एसडी कार्ड" असा ऑप्शन दिसत नाही. त्यामुळे मला अ‍ॅप्स, इबुकरिडर एसडी कार्डमध्ये हलवता येत नाही आहेत. मी मुव्ह्टुएसडी, लिंकटुएसडी असे काही अ‍ॅप्स वापरुन बघितले पण त्याचाही या टॅबमध्ये काही उपयोग होत नाही आहे. कोणाकडे हा टॅब आहे का? मला मुख्यतः दोन्ही ईबुक रिडर्स बाह्य स्टोरेजमध्ये हलवायचे आहेत. ज्यामुळे मी जास्तीत जास्त ईबुक्स स्टोअर करुन ठेउ शकेन. "माय फाईल्स" मधुन कट-पेस्ट करुन गाणी,पिक्स,विडियोज बाह्य स्टोरेजमध्ये ट्रान्सफर करता येतात फक्त कोबो व बुकगंगासारखे इबुक्स अ‍ॅप्स ट्रान्सफर करता येत नाही आहेत. कोणाला याविषयी माहीती असल्यास कृपया येथे शेअर करा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी बुकगंगा दोनदा अनइन्स्टॉल करुन पुन्हा इन्स्टॉल केले होते. पुन्हा तेवढीच जागा घेते. बुकगंगाचे डेस्कटॉप अ‍ॅप मात्र फक्त २.२४ एमबी जागा घेत आहे ज्यात तेवढीच पुस्तके डाउनलोड केली आहेत. बुकगंगालाच विचारुन बघते आता.

Pages