ए बी पी न्यूज- प्रधानमंत्री

Submitted by श्रीकांत on 21 July, 2013 - 12:12

नुकतीच ए बी पी न्यूज चॅनेल वर प्रधानमंत्री "> ही मालिका सुरु झाली आहे. विख्यात दिग्दर्शक शेखर कपूर हे या मालिकेचे अँकर आहेत. या मालिकेच्या बद्दल पत्रकारपरिषदेत"> व ए बी पी माझा वर साक्षात "> या कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिलीत व अनेक प्रश्न ही मांडले आहेत.
लोकाना फारसा ठाउक नसलेला इतिहास, तो ठाउक न व्हावा या मताचे लोक सत्ताधारी असल्याने जो आजवर फारसा समजला नाही चर्चिला नाही असाही इतिहास या मालिकेच्या निमित्ताने समोर येतो आहे.

शनीवार व रवीवारी भारतीय वेळेनुसार रात्री दहा वाजता ए बी पी न्यूज वर सादर होणार्‍या या मालिकेचे भाग एक http://www.youtube.com/watch?v=S_3i0Hf8KMI व भाग दोन http://www.youtube.com/watch?v=tUJPsKDYimg मी आज आंतरजालावर पाहिले. शेखर कपूर दिग्दर्शक म्हटल्यावर अपेक्षा आहेतच. नाट्यरूपांतरण करून दाखवलेल्या अनेक प्रसंगांमधे पात्रांची भाषा त्या त्या प्रदेशातील हिंदीच्या लहेजा ची वाटत नाही. कदाचित काय घटना घडत होत्या ते दाखवण महत्वाच याचा विचार जास्त केला असावा.

एका हिंदी वृत्तवाहिनीवर येणार्‍या या मालिकेवर मायबोली सारख्या मराठी संकेतस्थळावर चर्चा का व्हावी ? असा आक्षेप आल्यास व्यवस्थापकांनी योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा तसेच या धाग्यावर मते मतांतरे व्यक्त करतांना संयमित भाषेत लिहावे अशी मी सर्वांनाच विनंती करतो. वैयक्तिक टीका टिप्पणी टाळावी.
ही पंतप्रधानांवर असणारी मालिका आहे व पंतप्रधान सर्व भारतीयांचे असतात याची जाणीव असू द्यावी. अभ्यासपूर्ण प्रतिसाद लिहिणारे लोक हीन पातळीवरच्या वादंगात पडू इच्छित नाहीत व मग सगळ्याच वाचकांच नुकसान होत अस या धाग्यावर न व्हाव. या उप्परही व्यवस्थापक आक्षेपार्ह प्रतिसाद रद्दबातल करू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या मेल मधली घटना खरी कि खोटी यावर वाद न घालता मी इतकच म्हणेन की डीन साहेबां सारख्या लोकांच्या भावना सच्च्या होत्या व शास्त्रीजींसाराखा नेताही !!>>>>>>>>>>> हे जास्त महत्त्वाचं...

कुठून पाहीलं असं झालं.
माझी दैवतं यात खलनायकाच्या रुपात दाखवली गेली. कल्याणसिंह, अटलजी आणि अडवाणीजी ही तर माझी दैवतच आहेत. पण नरसिंहराव देखील मला प्रिय आहेत. ते काँग्रेसी कधीच वाटले नाहीत. सिंघलजी, कटियारजी, तोगडियाजींचं दर्शन झालं. या सिरीयलमधे अत्यंत नीच आणि हीन आरोप झाले. हा चॅनेल अमेरिकेतल्या चर्चेसच्या मालकीचा आहे असं समजलं आहे. म्हणजेच पुन्हा कोंग्रेसचं सरकार यावं म्हणून इलेक्शनच्या तोंडावर जुनी मढी उकरून काढली जात आहेत. मोदीजींना याचं दु:खं होणार आहे. जनतेच्या विनंतीला मान देऊन प्रधानमंत्री व्हायला तयार झालेल्या या महान तपस्वी नेत्यास असा काँग्रेसी अपशकुन व्हावा हे पटले नाही

सध्या बघते आहे. आधी असेच काही भाग रॅंडमली बघितले. पण आता पहिल्या भागापासून बघत आहे. खूपच चांगली, माहितीपूर्ण सीरीज आहे. शेखर कपूरचे सादरीकरण अव्वल दर्जाचे आहे त्यामुळे बघायला जास्त आवडतंय.

Pages