दुनियादारी त्यांची आणि आमची

Submitted by घारुआण्णा on 19 July, 2013 - 13:32

दुनियादारी त्यांची आणि आमची
आमची म्हणजे कोणाची तर८०-९०च्या दशकात संपुर्ण कॉलेज तरुणाईचं जिवन व्यापुन टाकलं आणि आम्ही त्या कादंबरीची पारायण केली ...!! पाठ केली.... !!!!
त्यांची म्हणजे ज्यांनी कादंबरी वाचलेली नाही आणि एका तिराहीताच्या नजरेतुन केवळ चित्रपट पहाणार आहेत.
आजच फस्ट डे फ़र्स्ट शो पाहीला.....
एकंदरीत चित्रपट बराच चांगला झाला आहे कथेतले बदल आणि डीटेलींग सोडता, गाणीही छान आहेत.
केवळ तुलना म्हणुन काही मुद्दे( न आवडलेल्या गोष्टी या आमच्या आणि आवडलेल्या त्यांच्या)पण तरीही वर नावात लिहील्याप्रमाणे आमची दुनियादारी खरचं अगदी अर्धवट शेवटासकट परीपुर्ण आहे...या चित्रपट रुपांतर करता मात्र फक्त पट कथेतच नाही तर मुळ कथेतही खुप सारे बदल केले गेलेत."सु.शि." जर आज असते तर... कदाचित हा शेवट ही त्यांना आवडला असता आणि बदललेली कथाही.
इतकं डीटेलींग प्रत्यक्ष कथेत असुनही अनेक पात्रांचे चित्र नीट उभे राहात नाही... ( उद. नित्या... अस्सल आकडे लावणारा, कोडी घालणारा चिंतु जोशी, प्रितम,रानी मा, मिस्टर तळवळ्कर),आणि मह्त्वाचे एम के ची संपुर्ण पात्र.....( अगदी वाया घालवल्यं)
डीसपी आणि साई च्या वादाची कारणं,कट्ट्यावर असणारा इरसालपणा, हे अधिक दाखवता आंले असते.
गाणी:खरतरं अनावश्यक.त्याऎवजी प्रसंग आणि संवाद वाढ्वता आले असते. कट्टा आणि कट्टेकरी नुसते करायला हवे म्हणणार्यातले नाही तर करुन टाकायचं या प्रवृत्तीतले हे ठ्सणं आवश्यक होते. काही ठिकाणांचे संदर्भ येणं अत्यावश्यक होतं जसं अलकाचा चौक, रिगल, खंडाळ्याच्या सहलीचे प्रसंग आणि तिथेच येणारी सुर्योदय आणि सुर्यास्ताचे संदर्भ.कारन हे हे सर्व त्यातले कलाकारच ठरतात.
पात्र निवड .... श्रेयस ने या पिक्चर साठी शुन्य मेहनत घेत्ल्याचं सतत जाणवतं. अंकुशने प्रयत्न नक्की केलाय. एम के ला पुर्ण वाया घालावल्यं .त्यातल्यात्याभाव खाउन जातो तो साई. प्रत्यक्ष कथेत साईचे डीटेल खुप कमी आहेत. पण जितुने त्यात खुनशी आणि मग्रुरपणाचे चांगले रंग भरलेत.
बाकी मीनु,इतर कट्ट्य़ाचे मेंबर फुटेजप्रमाणेच कामं
वेशभुषा: आणखी डीटेल भरता आले असते उदा: दिग्याची एन्ट्री आणी संपुर्ण चित्रपटात टिपिकल पुणेरी दाखवता आला असता पायजमा, कुर्ता
कादंबरी ही खरतर अनेक नात्यांचे परत परत गुंतत जाणारे आणि उलगडणारे धागे अगदी हळुवारं पणे दाखवते , त्यामानाने चित्रपट फारच जलद गतीने पुढे सरकतो.प्रेम त्रिकोणाचे वारंवार येणारे संदर्भ, फक्त प्रसंग आणि पात्र वेगळी
आवडलेल्या गोष्टी त्यांच्या
बरोबरच्या ३ जणांनी कादंबरी वाचलेली नव्हती.त्यां ना हा विषयच नवीन होता. त्यामुळे त्यांच्यासाठी चांगली कथा,चांगली गाणी.....
कॉलेजच्या आजच्या संदर्भातले काही संवाद एकदम आजच्या काळालाही लिंक करुन जातात. दिग्या हा ही त्यांना त्यांच्यातला वाटतो. मुळ कथा माहीत नसल्या ,प्रत्यक्ष सहज घडणारी फक्त किंचीत लाउड वाटणारी अशी ....

अधिक उणे करता एकदा सर्वांनी पाहायला हरकत नाही पण केवळ कादंबरीचे संदर्भ घेउन पाहु नका भ्रम निरास होइल.
मोकळ्या डोक्यानी आणि मनाने पाहीला तर चित्रपट म्हणुन चांगला.....

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर झाल रिव्हू टाकलात....पाहणार आहे उद्या किव्हा परवा....बघू जमेल तसं...

पटकथा, संवादः चिन्मय मांडलेकर..... ??????????//
तु तिथे मी पाहुन हिम्मत होत नाहिये...... Uhoh

मला चित्रपट आवड्ला....
आवडलेल्या गोष्टी
१) जे माझ मनोराज्य होत कांदबरी वाचल्यानंतर ते इथे होत
२) अंकुशच खुपच जास्त दिवसांनी छान काम
३) गाणे
४) "फक्त माझ्या पाया पडल्या तरी चालेल"(त्या कलाकारने त्याचे सीन खाउन टाकले)
५) मला शिरीन आवड्ली....

न आवडलेल्या गोष्टी
१) श्रेयस आणि शिरिनच नात्यामधे नीट रंग नाही भरला
२) श्रेयस म्हणुन स्वजो
३) जितेन्द्राला वाया घालावला....