चार्/पाचपाती दिवे असलेले पंखे!!!!!

Submitted by हर्ट on 18 July, 2013 - 02:20

नमस्कार,

मला दिवानखान्यात पाच वा चार पाती दिवे असलेला पंखा लावायचा आहे. असे पंखे सुरक्षित असतात का? उपयोग होतो ना की फक्त शो पीस म्हणून राहत?

कृपया इथे गम्मतजम्मत टाळावी. अन्य बीबींचा त्याकरिता उपयोग करावा Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हवा देणारे पंखे लावा. ते बरे पडेल. Proud
तुम्हाला पंख्याखाली शो करायचा नसेल तर ते शो पीस म्हणूनच राहतील Light 1

बी,
१. तुम्हाला चार्/पाच पाती असलेला पंखाच का लावायचाय?
त्याचा काही विशेष उपयोग होतो का? नेहमीच्या तीन पत्ती पेक्षा या चारपत्तीचे वेगळे काय गुणधर्म आहेत?

२.तुम्हाला दिवाणखान्यातच असा पंखा लावायचाय असे का?
बेडरूममध्ये तुम्ही काय लावणार?
३. स्वयंपाकघरात किती पात्याचा एक्झॉस्ट लावणार?
की बिल्डरने अगोदरच लावून दिलाय?

मी असा पंखा वापरला आहे नवीन असताना फार छान दिसते. ड्रॉइन्ग रूमला एक मस्त वॉर्म ग्लो येतो. जर रेग्युलर घरी डिनर्स, पार्ट्या करत असाल, जास्त मेहमान वगैरे येत असतील तर पूर्ण ड्रॉइन्ग रूम डिझाइन प्लॅन करताना असा एक पंखा घ्यावा. वेगळे झुंबर आणि एसी असा ही एक ऑप्शन घेता येतो. झुंबर / शोच्या दिव्यांमध्ये जास्त चॉइस आहे जो फॅनला लावलेल्या दिव्यांमध्ये नसतो.

दोन तीनच जुन्या पद्धतीचे स्टायलिंग असतात. त्यातले जे बल्ब ते ही १ +१ असे जास्तीचे घेऊन ठेवा कारण ते नंतर मिळत नाहीत व लगेच फ्यूज होतात. मग पंखा बिचारा अंधारा पडून राहतो. त्या दिव्यामुळे खोलीत जर इतर लायटिंगची सोय केलेली नसेल तरही प्रश्न येतो.

मुख्य म्हण्जे चार पाच पात्यांचे पंखे वापरायचे तर खोली प्रशस्त मोठी अशी हवी. बारक्या खोलीत
त्याचा पर्फॉरमन्स नीट येणार नाही. वेगळे क्रिस्टल चे झुंबर घ्यावे आणि चट्पटीत बारका पंखा घेतले तर जास्त प्रक्टिकल होते.

शक्यतो घेऊ नका. त्यापेक्षा भिंतिंवर दिवे लावा. ते अधिक चांगल दिसेल आणि स्वच्छतेसाठी सोपं पडेल.

बी
तुमचे कौतुक आहे. एका प्रश्नावर २०-२५ जण उलट्सुलट मते देतात.त्याला चाळणी लावून हवे ते उत्तर कसे
शोधता?

.

प्रश्ण-पुत्रा, तू मायबोली रूपी विक्रमाच्या खांद्यावर लटकलेला पाच तोंडाचा वेताळ असावास. 'माझे बी प्रष्ण' असा एकच धागा उघड म्हणजे दांपासून-बाइंपर्यंत सगळ्यांचे (कंपूसहीत) सल्ले एकाच ठिकाणी मिळतील ... Proud

अरे प्रष्ण विचारायच्या आधी तु त्या संदर्भात केलेला रिसर्च आणि तु त्याला शोधलेले उत्तर हे लिही की मग विचार की तुझे उत्तर बरोबर आहे का की ते इंप्रुव्ह होऊ शकते.

मुख्य म्हण्जे चार पाच पात्यांचे पंखे वापरायचे तर खोली प्रशस्त मोठी अशी हवी. बारक्या खोलीत
त्याचा पर्फॉरमन्स नीट येणार नाही. >> +१

'माझे बी प्रष्ण' असा एकच धागा उघड म्हणजे दांपासून-बाइंपर्यंत सगळ्यांचे (कंपूसहीत) स>ल्ले एकाच ठिकाणी मिळतील ... ...:P

Lol
अरे माणसा, कुठलाका फॅन असेना बाबा, तो सुरक्षित असल्याशिवाय मार्केटमध्ये येईल का? आला तरी टिकेल का? तरी शंका असल्यास दुकानदाराला रिपोर्ट विचारा अन त्याहून जास्त शंकेखोर स्वभाव आहे तर सरळ कंपनीकडून सेफ्टी स्पेसिफिकेशन्स, सेफ्टी ट्रायल्सचे रिपोर्ट वगैरे मागवा.
बी चे प्रश्न अधिकाधिक विनोदी होत चाललेत, पण आपल्याला मात्र गम्मतजम्मत करु नका म्हणतोय तो. Proud

चार/पाच पाती पंखे लावण्यापेक्षा एक सिंहासन आणा किंवा राजेशाही वाटेल असा सोफा आणा.
पाहुणे आले की त्यांना त्यावर बसवा आणि बाजुला उभे राहून मखमलच्या पंख्याने नाहीतर मोरपिसांच्या पंख्याने वारा घाला.
पाहुण्यांना अशी राजेशाही उठबस केल्याने खुश होतील. घर कसे एकदम मस्त राजदरबार दिसेल.

एक प्रश्न.
चहा कोण्त्या कपातून द्यावा. चिनीमातीच्या, काचेच्या, पितळेच्या, मगातून?

२रा प्रश्नः
असे चांगले कप पुण्यात कुठे मिळतील?

३रा प्रश्नः
कप घेताना घ्यायची काळजी?

एक प्रश्न.
चहा कोण्त्या कपातून द्यावा. चिनीमातीच्या, काचेच्या, पितळेच्या, मगातून?
मागीतल्याशिवाय देऊ नये... चहा घेउन आला असालच, असेच म्हणावे, पुणेरी बाणा जपावा Happy

२रा प्रश्नः
असे चांगले कप पुण्यात कुठे मिळतील?

घेण्याची गरज आहे ?

३रा प्रश्नः
कप घेताना घ्यायची काळजी?

फुटणार नाही असे कप घ्यावे आणि चांगल्या पॅकींगमध्ये ठेउन माळ्यावर टाकावे.

Light 1 घ्या सांगणे न लगे Lol

प्रश्ण-पुत्रा, तू मायबोली रूपी विक्रमाच्या खांद्यावर लटकलेला पाच तोंडाचा वेताळ असावास. 'माझे बी प्रष्ण' असा एकच धागा उघड म्हणजे दांपासून-बाइंपर्यंत सगळ्यांचे (कंपूसहीत) सल्ले एकाच ठिकाणी मिळतील ..>>> Lol

आता प्रश्न साबणावर घसरणार, मग दारापुढे कोणती पायपुशी ठेवावी, घाण पायाने टाईल्स खराब झाल्यास कोणते लिक्वीड वापरावे, ते कुठे मिळेल. !

कृपया.........फॅन कोणता घ्यावा या सल्ल्या बरोबर तो कोणत्या कंपनीचा घ्यावा हे देखील लिहावे अन्यथा ..... Wink

काही पोटेन्शिअल प्रश्न:
१.इन्वर्टर कुठला घ्यावा.
२.टीवी कुठला घ्यावा./टीवी सर्विस प्रोवायडर कुठला घ्यावा.
४.मोबाइल फोन कुठला घ्यावा/सर्विस प्रोवायडर कुठला घ्यावा.
५.मायक्रोवेव कुठला घ्यावा.
६. फ्रीज कुठला घ्यावा.
७. वॉशिंग मशिन कुठले घ्यावे?
८.वॉटर प्युरिफायर कुठले घ्यावे?
९. नेट कनेक्शन वायरलाईन का वायरलेस्? कुठला प्रोवायडर घ्यावा./फोन कुठला घ्यावा?
१०.घराला रंग कुठला द्यावा? कोण चांगले देउ शकेल?
११.मॉस्किटो रीपेलेंट कुठले घ्यावे?
१२.वॉशिंग डिटर्जंट कुठला घ्यावा?
१३.डिश वॉशिंग लिक्विड कुठले चांगले आहे?
१४. किचनसाठी लागणारी भांडी कुठुन घ्यावी?
१५.गाडी कुठली घ्यावी? (यावर आधीच एक उत्तम बाफ आहे)
१६. पेट्रोल्/डिझेल कुठने घ्यावे?
१७. खेळणी कुठने घ्यावी?
१८.औषधे कुठने घावी?
१९. शाळा कुठली चांगली?

असो..

जोक्स अपार्ट , बी प्रश्न विचारतात ते खरेतर चांगले आहे पण प्रत्येक प्रश्नासाठी वेगळा बाफ काढल्याने जरा गमतीशीर वाटतेय. ही सगळी माहिती संकलित करुन एका बाफच्या खाली लिहिली तर ती सगळ्याना उपयुक्त होइल.

बी ह्यांना नक्की काय घ्यायचंय? चार्/पाचपाती दिवे असलेले पंखे की दिवे असलेले चार/पाचपाती पंखे?

पुण्यात चार/पाचपाती दिवे कुठे मिळतील?

Rofl

बी वर मनस्मि यांनी म्हंटले आहे तसे केलेस तर जास्त बरे होईल. इतके धागे उघडत उघडता तूच त्या धाग्यात गुरफटुन जाशील्.:फिदी:

आणी एवढे प्रश्न मुळात हवेच कशाला? वर अश्विनीमामी यांनी म्हंटले आहे ते बरोबर आहे. हॉल/ दिवाणखाना छोटाच असेल तर असे पंखे, सोफे, टिव्ही ( मोठ्या स्क्रीनचे एलसीडी/ एलईडी वगैरे) यांचा काहीच उपयोग होणार नाही.

त्यापेक्षा जे जास्त जरुरी आणी उपयुक्त आहे, त्यावर भर दे. उगाच शो हवा कशाला?

Pages