मधुबनी पेंटींग.

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 17 July, 2013 - 07:20

नमस्कार,
मधुबनी पेंटींग बद्दल मी काय सांगु.बिहार मधील ही कला अतिशय सुंदर आणि रेखीव आहे.तिथल्या गावांमध्ये घराघरात मधुबनी पेंटींग्ज भिंतींवर काढली जातात.संपुर्ण चित्र हे दोन ओळींनीच काढले जाते.मग त्यात वेजिटेबल रंग भरले जातात.हे रंग जरा महाग असतात.म्हणजे शहरात तरी ते खुप महाग मिळतात.आणि सहजासहजी तरी उपलब्ध नसतात.कॉटन कपड्या वर हे चित्र काढल्यावर त्यावर वेजिटेबल रंग भरुन घेतले जातात.
एक हा प्रकार.आणि दुसरा म्हणजे काळ्या शाईने संपुर्ण चित्र काढायचे.मी तसेच काढलेय.अशी अनेक चित्रे काढुन त्याच्या छोट्या छोट्या फ्रेम्स बनवल्या.
एक दोन रंग भरुनही बनवल्या पण त्यांचे फोटोज मात्र काढु शकले नाही.
आज वाईट नक्कीच वाटतयं..

fish1.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर !
[बहुतेक आतां तुम्ही 'वारली' चित्रकलेचा नमुनाही सादर करणार !'क्रिएटिव्ह्माउ' आयडी चपखल बसते तुम्हाला !! ]

अजुन एक नविन सुंदर आर्ट! तुमच्यामुळे नविन नविन आर्ट पाहायला, शिकायला मिळते. काळ्या शाईने काढलेले चित्र कापडावर काढलेत कि कागदावर?
'क्रिएटिव्ह्माउ' आयडी चपखल बसते तुम्हाला !! .... भाऊ म्हणतात ते १००% खंर आहे.

सुरेख.

हे कागदावर काढलंय ना? कोणता कागद वापरलाय? सहसा हँडमेड कागदावर बघितली आहेत मधुबनी चित्रं. आणि हो रंगवलेल्या चित्रांमध्ये तुम्ही कोणते रंग वापरले होते?

हि चित्रे खरं म्हणजे हँडमेड पेपर वरच काढतात..
मी हे चित्र ही तसेच काढले आहे..मात्र बाकी साध्या कागदावर काढलेली आहेत.
कपड्यवर तस उत्तमच दिसते..काढुन बघा..मी हवे तर मला वेळ मिळाला की त्याची सुरुवात कशी करायची ..कुठली कुठली चित्रे काढायची हे दाखवीन.