साडी जुनीच आहे (हजल)

Submitted by देवा on 16 July, 2013 - 00:28

साडी जुनीच आहे काही नवीन नाही
मी रोज धूतल्याने उरली मलीन नाही

तो पेटलाच आहे ती पेटलीच आहे
पण रंग आज त्यांचा ऑरेंज ग्रीन नाही

मी एकटाच जातो सगळीकडे अजोनी
अद्याप बायकोच्या इतका अधीन नाही

माझ्या सरोगसीच्या रे आड कोण येतो
मी बाप दो मुलांचा अद्याप तीन नाही

देवा तिच्यावरी रे मी भाळलो कधीचा
तीही हसेल बहुधा पण हा तो सुदीन नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Biggrin

मी एकटाच जातो सगळीकडे अजोनी
अद्याप बायकोच्या इतका अधीन नाही

मस्तं.
छान जमलीये हझल.