दररोज सकाळी ६ वाजता पोहोचल्या-पोहोचल्या आपोआपच पाय देवळाकडे वळायचे. नुकतच उजाडायला लागलेल. आकाशात लाल-नारिन्गी रन्गाची उधळण.... सूर्य हळूहळू वर येत आहे... पक्शान्चा किलबिलाट... आणि अशा वातावरणात तानपुर्याचा आवाज... सर्व जग विसरायला लावणारे सन्गीताचे सूर...
सूर म्ह्णल्याबरोबर सर्वात प्रथम आठवतात ते गाण्याचे सूर. पण याहूनही ''सूर'' या शब्दाला बरेच अर्थ आहेत. अगदी पाण्यात मारायचा सूर, माणसाच्या स्वभावातील पैलू दाखविणारा सकारात्मक तसेच नकारात्मक सूर, रडण्याचा सूर, असे कितीतरी अर्थ सान्गता येतील. या सुरान्मद्ध्येसुद्धा किती विविधता आहे! वर्तमानपत्रात तर हमखास '....ला आज सूर सापडला.' हे एकदा तरी वाचायला मिळतच किवा बरोबर उलट.
"मी चान्गल कोकणात जायच ठरवल होत पण त्याने नकाराचा सूर लावला" याचा अर्थ त्याने नकार दर्शविला. "...पण त्याने वेगळाच सूर लावला" म्हणजेच त्याने वेगळाच विषय काढला.
एखाद्या व्यक्तीला सूर गवसण म्हणजे 'गाडी पुन्हा रुळावर येणे'. एखाद्याला खूप अपयशाचा सामना करून बर्याच कालावधीनन्तर यश मिळाल की अस म्हणणे रास्त होइल. याशिवाय 'सूर अळवणे' म्हणजे एखाद्या गोष्टीवर अडून रहाणे असा आहे.
सन्गीताबद्दल बोलायच असेल तर सूर-स्वर हा खूपच महत्त्वाचा आहे. सूर जर बरोबर लागले नाहीत तर सन्गीतातल माधुर्य अनुभवता येत नाही. सुराशिवाय सन्गीत पूर्णच होऊ शकत नाही. मग ते सूर गायकाच्या गळ्यातून असोत किवा वादकाच्या वाद्यातून असोत.
आपण अगदी सहज म्हणून जातो की त्याच आणि माझ चान्गल Tuning जमल आहे. म्हणजे अगदी नातेसम्बन्धातदेखील सूर जमावा लागतो.
तर असे हे "सूर" या शब्दाचे विविध अर्थ...
सूर
Submitted by Mo on 15 July, 2013 - 13:20
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला तर सूर म्हटलं की
मला तर सूर म्हटलं की सूर्-पारंब्या (एक खेळ) आणि सुरेश वाडकर (तू सप्तसूर माझे) आठवतात.