तुम्ही आहारातील पदार्थांची निवड कोणत्या निकषांनुसार करता?

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 15 July, 2013 - 10:41

नमस्कार!

मी करत असलेल्या कोर्सच्या असाईनमेन्ट संदर्भाने मला खालील प्रश्नांची उत्तरे मायबोलीकरांकडून जाणून घ्यायला आवडतील.

१] तुमच्या नेहमीच्या (दैनंदिन) आहारातील पदार्थ तुम्ही कोणत्या निकषांनुसार निवडता?

अ] कॅलरीज (उष्मांक)
आ] पदार्थाची/ अन्नाची तुम्ही राहता त्या भागातील उपलब्धता
इ] तुमचे अन्नासाठीचे बजेट
ई] वैयक्तिक आवड / चव
उ] पदार्थ बनविण्यातला / खाण्यातला सोपेपणा
ऊ] त्यावेळचा मूड
ए] अन्य (उदा. पथ्य इ.)

२] तुमच्या या आहाराच्या सर्वसामान्य आराखड्यात तुम्ही कधी बदल करता का? किंवा बदल होतात/घडून येतात का?

३] जगातील इतर लोक आपल्या आहाराच्या बाबतीत कोणकोणत्या बाबींचा व कारणांचा विचार करून आपला आहार ठरवितात असे तुम्हाला वाटते?

ह्यात तुम्ही जगातील लोकसंख्येच्या बाबतीत लोकांचे वय, सामाजिक व आर्थिक स्थान/श्रेणी, लिंग आणि भौगोलिक स्थान यांचा विचार करू शकता.

उत्तरांसाठी आगाऊ धन्यवाद! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेळेवर जसं असेल तसं... फारच जर महाग असतील तरच काही गोष्टी नाही आणल्या जात. शक्यतो चांगल्या दुकानातून / ओळखीच्या दुकानातून आणल्यात तर जनरली चांगल्या प्रतीचं मिळतं असा अनुभव.

क्यालरीज चा खूप बाऊ नाही पण भरमसाठ तेलकट / तुपकट खातही नाही. (चिवडा, शेव, भुजीया चावायला जाम मजा येत्ये पण... Sad वजनाचा विचार + बैठ्या कामाचा विचार करता तेही प्रमाणात ठेवण्याचा प्रयत्न करतो)

कधी कधी वेगळे प्रकार पण करून पहातो, ते मात्र फुरसतीचा वेळ पाहूनच.

तीन नंबर चा प्रश्नः भौगोलिक स्थान हे महत्त्वाचं कारण आहारात. त्यानंतर बाकी गोष्टी असं मला वाटंत...

१. माझे निकष
आ. उपलब्धता
उ. बनवण्यातला सोपेपणा
ई. आवड/ चव
अ. उष्मांक

सुदैवाने खाण्यासंदर्भात बजेटचा विचार करण्याची वेळ आता येत नाही.

२. हो, खरेतर सर्वसामान्य आराखडा असा फारसा नाही. पुष्कळ बदल होतात सतत.

३. उपलब्धता, आवड, बजेट हे सर्वसाधारण निकष जगभरात कुठेही लागू होतील असे वाटते.

चांगले प्रश्न आहेत अकु !

१] तुमच्या नेहमीच्या (दैनंदिन) आहारातील पदार्थ तुम्ही कोणत्या निकषांनुसार निवडता?

कॅलरीज (उष्मांक) - नुस्त्या उष्मांकाचा विचार न करता न्यूट्रिशनल व्हॅल्यूचा विचार करते - पालेभाज्या, कडधान्ये, लीन प्रोटीन, सी फूड, फळे , दुध - दुधाचे पदार्थ या सर्वांचा समतोल असावा असा प्रयत्न असतो.

आ] पदार्थाची/ अन्नाची तुम्ही राहता त्या भागातील उपलब्धता - शक्यतो सीझनल अन लोकली उगवलेले पदार्थ घेण्याकडे कल असतो. . प्रोसेस्ड, पॅकेजड अन्न कमी वापरण्याचा प्रयत्न असतो

ई] वैयक्तिक आवड / चव
उ] पदार्थ बनविण्यातला / खाण्यातला सोपेपणा - याचा विचार प्रामुख्याने होत नाही, पण कधी कधी इतर व्यवधानं जास्त असली की बनवायला सोपे पदार्थ जास्त आणले जातात,

२] तुमच्या या आहाराच्या सर्वसामान्य आराखड्यात तुम्ही कधी बदल करता का? किंवा बदल होतात/घडून येतात का?

सीझन प्रमाणे बदल होतात बर्‍यापैकी, गेल्या काही वर्षात जाणीवपूर्वक लोकल, सीझनल पदार्थांकडे कल वाढवला आहे. फ्रेंच चीझ कमी करुन लोकल आमच्या स्टेटमधले, काउंटीमधले चीझ इत्यादी

३] जगातील इतर लोक आपल्या आहाराच्या बाबतीत कोणकोणत्या बाबींचा व कारणांचा विचार करून आपला आहार ठरवितात असे तुम्हाला वाटते?

हिस्टॉरिकली - (गेल्या शतकाच्या मध्यापर्यंत साधारण) उपलब्धता व परवडणे या दोनच बाबी असाव्यात बहुतेक.
आता मात्र ग्लोबलायझेशनमुळे आव॑डी निवडी बदलत चालल्या आहेत, उपलब्धता पण बदलते आहे . त्यामूळे बहुतेक चव, आवड, उपलब्धता या बाबी जास्त महत्वाच्या होत चालल्या असाव्यात, तरिही ' आमच्यात नाही ब्वा < अमूक ढमूक> चालत' अशी वृत्ति पण असेल असे वाटते.

मी

अ] कॅलरीज (उष्मांक) - बघत नाही. परंतु "टाकाऊ अन्न" (junk food)" आणि मला वाटलेले अनारोग्यदायी अन्नपदार्थ आणत नाही. असे बरेचसे पदार्थ अधिक उष्मांकाचे असतात.

आ] पदार्थाची/ अन्नाची तुम्ही राहता त्या भागातील उपलब्धता - हो. मुद्दामहून जवळ होणा-या भाज्या आणतो. पण धान्य/डाळी नाही.

इ] तुमचे अन्नासाठीचे बजेट - दराचा जरूर विचार करतो.

ई] वैयक्तिक आवड / चव - सर्व पदार्थ रुचीकर करता येतात असा विश्वास असल्याने ह्यावर फार विचार करत नाही.

उ] पदार्थ बनविण्यातला / खाण्यातला सोपेपणा - करतो. परंतु शाकहारी असल्याने बनविणे आणि खाणे दोन्हीही सोपे आहे असे वाटते.

ऊ] त्यावेळचा मूड - नाही. पण कोणते पदार्थ केंव्हा खायचे ते ठरलेले आहे. म्हणजे सकाळी उठुन भाजी खात नाही.

ए] अन्य (उदा. पथ्य इ.) - फारसे नाही. फक्त वातकारक/पित्तकारक् पदार्थ सलग तीन-चार दिवस खात नाही.

१. वैयक्तिक आवड्/चव, उपलब्धता, पदार्थ बनविण्यातला / खाण्यातला सोपेपणा हे मुद्दे महत्त्वाचे वाटतात. कॅलरीजचा विचार हल्लीहल्लीच करायला लागलेय. बाकी मूडचा फारसा प्रश्न येत नाही. बजेटचा किंबहुना आर्थिक मुद्दा (किंमतीसंदर्भात) विचारात घेतला जातो (उदा. हापूस आंबा मोसमाच्या सुरुवातीला फार महाग असतो. तेव्हा आणण्याचे टाळतो Happy )

२. पदार्थ सहजगत्या उपलब्ध असतील तर सर्वसामान्य आरखड्यात फारसे बद्ल होत नाहीत असे मला वाटते. नवीन पदार्थ ट्राय केले जातात पण दैनंदिन् आहाराचा अविभाज्य भाग होत नसावेत. म्हणजे पोळी भाजी असे म्हटले तर वेगवेगळे पराठे, भाकरी, सिजनल/रिजनल भाज्या असा बद्ल असू शकतो. इथे सवयीचा मुद्दाही येऊ शकतो.

३. भौगोलिक स्थान आणि बजेट हे महत्त्वाचे मुद्दे असावेत.

या चर्चाप्रस्तावावरील चर्चेतून 'अ‍ॅचिव्ह' काय करायचे आहे तेही लिहिले असते तर बरे झाले असते का? Happy

१.
उपलब्धता, बनवण्यातला सोपेपणा, उष्मांक, आवड - चव, बजेट.

आवडत असले तरी बनवायला अवघड असणारे पदार्थ नेहेमी केले जात नाहीत, त्याला पर्यायी सोप्पे पदार्थ शोधण्याचाच कल असतो. तेच उष्मांकाबद्दल. कितीही आवडत असले तरी जास्त उष्मांकावाले पदार्थ कमी खाल्ले जातात. जवळच्या बाजारात, दारावरच्या भाजीवाल्याकडे मिळणार्‍या सिझनल भाज्याच नेहेमी खाल्ल्या जातात. धान्य, कडधान्याबाबतही तेच म्हणजे ज्वारीच्या ऐवजी मक्याच्या किंवा बाजरीच्या भाकरी..

शक्यतो प्रोसेस्ड फुड टाळलं जातं. अगदी इमर्जंसीच्या वेळेसाठी प्रोसेस्ड फुड असा फंडा आहे. आणि पोळ्याची बाई, मी आणि नवरा असे तिन जण स्वैपाक करण्यासाठी उपलब्ध असल्याने इमर्जंसी कधी येत नाही. (तसंच यासाठी टेकअवे चा ऑप्शन पण असतोच)

त्याचप्रामाणे प्रत्येक जेवणात (नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण) डाळी / कडधान्य/पनीर-दही /चिकन, भाज्या/ कोशिंबीरी/सलाड, भात /भाकरी/ब्रेड्/फुलके याप्रत्येक गटातला किमान एक पदार्थ तरी असावा यासाठी प्रयत्न केले जातात.

२.सिझनप्रमाणे थोडेफार बदल होतात पण तरी वरच्या प्रत्येक ग्रूपमधला एखादा प्रकार कोणत्या ना कोणत्या स्वरुपात खाल्ला जावा याबद्दल मी बरीच आग्रही असते. आहारामधला मुख्य बदल शक्यतो सुट्ट्यांमध्ये गावी गेल्यावर होतो. त्यवेळी उष्मांकांवर ताबा रहात नाही.

३. यावर कधी विचारच केला नाही

या चर्चाप्रस्तावावरील चर्चेतून 'अ‍ॅचिव्ह' काय करायचे आहे तेही लिहिले असते तर बरे झाले असते का?
>>> चान्गले मार्क! ती कोर्स साठी विचारतीये. Happy

I go by nutrition value e.g. In Cereal, shredded wheat with sugar coating usually has 90% of Iron for daily requirement. That is supereasy way to include iron and not worry rest of the day.

१] तुमच्या नेहमीच्या (दैनंदिन) आहारातील पदार्थ तुम्ही कोणत्या निकषांनुसार निवडता?

अ] कॅलरीज (उष्मांक)
आ] पदार्थाची/ अन्नाची तुम्ही राहता त्या भागातील उपलब्धता
इ] तुमचे अन्नासाठीचे बजेट
ई] वैयक्तिक आवड / चव
उ] पदार्थ बनविण्यातला / खाण्यातला सोपेपणा
ऊ] त्यावेळचा मूड
ए] अन्य (उदा. पथ्य इ.)

२] तुमच्या या आहाराच्या सर्वसामान्य आराखड्यात तुम्ही कधी बदल करता का? किंवा बदल होतात/घडून येतात का?

हो. कंटाळा आला की. नेहमी भाजी पोळी असते, मग कधी इडली, दोसा, किंवा भजे असे मेनु बनतात

३] जगातील इतर लोक आपल्या आहाराच्या बाबतीत कोणकोणत्या बाबींचा व कारणांचा विचार करून आपला आहार ठरवितात असे तुम्हाला वाटते?

उपलब्धता आणि बजेट आणि पारम्पारिक पद्दती. उदा मराठी माणुस कोरियन अन्न फर दिवस खाउ शकणार नाही, त्याला पोळी भाजी लागणारच. (मराठी?)

ह्यात तुम्ही जगातील लोकसंख्येच्या बाबतीत लोकांचे वय, सामाजिक व आर्थिक स्थान/श्रेणी, लिंग आणि भौगोलिक स्थान यांचा विचार करू शकता.

१] तुमच्या नेहमीच्या (दैनंदिन) आहारातील पदार्थ तुम्ही कोणत्या निकषांनुसार निवडता?
माझा क्रम साधारण असा राहील

आ] पदार्थाची/ अन्नाची तुम्ही राहता त्या भागातील उपलब्धता - नसेल उपलब्ध तर कुठून खाणार
ए] अन्य (उदा. पथ्य इ.) - पथ्य असेल तर नाही खाणार
ई] वैयक्तिक आवड / चव - महत्वाचे
अ] कॅलरीज (उष्मांक) - हे पण महत्वाचे आहे असे पटवून घ्यावे लागते
उ] पदार्थ बनविण्यातला / खाण्यातला सोपेपणा -
ऊ] त्यावेळचा मूड
इ] तुमचे अन्नासाठीचे बजेट - अगदी पंचतारांकित हाटीलात गेलो की बघावे लागणारच की वो

२] तुमच्या या आहाराच्या सर्वसामान्य आराखड्यात तुम्ही कधी बदल करता का? किंवा बदल होतात/घडून येतात का? - बाहेरगावी गेलो की, सण समारंभ, सेलिब्रेशनस

३] जगातील इतर लोक आपल्या आहाराच्या बाबतीत कोणकोणत्या बाबींचा व कारणांचा विचार करून आपला आहार ठरवितात असे तुम्हाला वाटते? - पूर्वी कधी विचार नाही केला पण उपलब्धता असू शकेल

माझी उत्तरे

१] तुमच्या नेहमीच्या (दैनंदिन) आहारातील पदार्थ तुम्ही कोणत्या निकषांनुसार निवडता?

आ] पदार्थाची/ अन्नाची तुम्ही राहता त्या भागातील उपलब्धता

ई] वैयक्तिक आवड / चव
उ] पदार्थ बनविण्यातला / खाण्यातला सोपेपणा

२] तुमच्या या आहाराच्या सर्वसामान्य आराखड्यात तुम्ही कधी बदल करता का? किंवा बदल होतात/घडून येतात का?
बदल हवाच असतो. होतात तसेच घडूनही येतात

३] जगातील इतर लोक आपल्या आहाराच्या बाबतीत कोणकोणत्या बाबींचा व कारणांचा विचार करून आपला आहार ठरवितात असे तुम्हाला वाटते?
उपलब्धता, आवड सोय

१ यात पोषणमूल्य हे हवेच ना?
उदा: फायबरचे महत्त्ब कळल्यापासून गेले काही वर्षे आमच्याकडे मैद्याचा ब्रेड आणि साधी मारी बिस्किटे जाऊन व्होल व्हीट/मल्टि ग्रेन ब्रेड आणि हाय-फायबर/रागी/ओट्स बिस्किट खाल्ली जातात.

मी करत असलेल्या कोर्सच्या असाईनमेन्ट संदर्भाने मला खालील प्रश्नांची उत्तरे मायबोलीकरांकडून जाणून घ्यायला आवडतील.

१] तुमच्या नेहमीच्या (दैनंदिन) आहारातील पदार्थ तुम्ही कोणत्या निकषांनुसार निवडता?

अ] कॅलरीज (उष्मांक)
आ] पदार्थाची/ अन्नाची तुम्ही राहता त्या भागातील उपलब्धता
ई] वैयक्तिक आवड / चव
उ] पदार्थ बनविण्यातला / खाण्यातला सोपेपणा
ऊ] त्यावेळचा मूड

याशिवाय प्रोटिन्स/व्हिटॅमिन्स याचाही विचार केला जातो. ऑर्गनिक पदार्थ वापरायला आवडते पण बर्‍याचदा ते अतिमहाग असतात. तसेच प्रोसेस्ड/प्रीपॅक्ड/इंस्टंट फुड बिग नो! अशा ग्रोसरीला माझ्या पँट्रीत फक्त ३-४% जागा आहे.

२] तुमच्या या आहाराच्या सर्वसामान्य आराखड्यात तुम्ही कधी बदल करता का? किंवा बदल होतात/घडून येतात का?

हो!
३] जगातील इतर लोक आपल्या आहाराच्या बाबतीत कोणकोणत्या बाबींचा व कारणांचा विचार करून आपला आहार ठरवितात असे तुम्हाला वाटते?
भौगोलिक परिस्थिती, आवड, स्वयंपाकासाठी लागणारा वेळ, खर्च. तसेच इतर sMskRutee (cultures) चा प्रभाव.

ह्यात तुम्ही जगातील लोकसंख्येच्या बाबतीत लोकांचे वय, सामाजिक व आर्थिक स्थान/श्रेणी, लिंग आणि भौगोलिक स्थान यांचा विचार करू शकता.

] तुमच्या नेहमीच्या (दैनंदिन) आहारातील पदार्थ तुम्ही कोणत्या निकषांनुसार निवडता?

अ] कॅलरीज (उष्मांक) - १.५
आ] पदार्थाची/ अन्नाची तुम्ही राहता त्या भागातील उपलब्धता - हे खरंतर पहिलं आलं पाहिजे, पण निदान भारतातल्या मोठ्या शहरांत राहणार्‍यांना या मुद्द्याचा फारसा विचार करण्याची गरज वाटत नसावी.
इ] तुमचे अन्नासाठीचे बजेट - ५
ई] वैयक्तिक आवड / चव - १
उ] पदार्थ बनविण्यातला / खाण्यातला सोपेपणा - ३
ऊ] त्यावेळचा मूड - २
ए] अन्य (उदा. पथ्य इ.) - लागू नाही.

२] तुमच्या या आहाराच्या सर्वसामान्य आराखड्यात तुम्ही कधी बदल करता का? किंवा बदल होतात/घडून येतात का?

हो कधीतरी होतात की बदल.

३] जगातील इतर लोक आपल्या आहाराच्या बाबतीत कोणकोणत्या बाबींचा व कारणांचा विचार करून आपला आहार ठरवितात असे तुम्हाला वाटते?

त्या त्या प्रदेशातील पारंपारीक पद्धतीचं जेवण घेण्याकडे सहसा लोकांचा कल असावा असं वाटतं.

मात्र सुरवातीला रुचीपालट म्हणून आणि मग बरेचदा इतर प्रदेश / भूभाग / देशातील पदार्थ चाखून बघितले जातात आणि आवडले तर पारंपारीक पदार्थांबरोबर किंवा त्यांना पर्याय म्हणून सामावून घेतले जातात. उदा. आमच्याघरी वांगी = बाबागनोश हे समिकरण हिट्ट आहे. बाबागनोशाशी ओळख झाल्यापासून आमच्याकडे आपलं पारंपारिक भरीत, वांग्याची भाजी, भरली वांगी असं सगळं फार म्हणजे फारच क्वचित होऊ लागलं आहे. Proud

१] तुमच्या नेहमीच्या (दैनंदिन) आहारातील पदार्थ तुम्ही कोणत्या निकषांनुसार निवडता?

अ] कॅलरीज (उष्मांक)
आ] पदार्थाची/ अन्नाची तुम्ही राहता त्या भागातील उपलब्धता
इ] तुमचे अन्नासाठीचे बजेट
ई] वैयक्तिक आवड / चव
उ] पदार्थ बनविण्यातला / खाण्यातला सोपेपणा
ऊ] त्यावेळचा मूड
ए] अन्य (उदा. पथ्य इ.)

यांत प्राधान्यक्रम देणं अवघड आहे कारण हे सगळंच बघावंच लागतंच. मूड आहे म्हणून कुपथ्य करता येत नाही आणि आवड नसताना काहीतरी समोर आहे म्हणून खाल्लं असंही होत नाही. दैनंदिन बाबींत सोपेपणा आवश्यकच असतो. कधीतरी आवड/मूड म्हणून मोठा घाटही घातला जातो. उपलबधता म्हणजे लोकली प्रोड्यूस्डच अन्न घेतो का - तर असं काही नाही. कॅलरीजपेक्षा न्यूट्रीशनल व्हॅल्यूज जास्त महत्त्वाच्या वाटतात.

२] तुमच्या या आहाराच्या सर्वसामान्य आराखड्यात तुम्ही कधी बदल करता का? किंवा बदल होतात/घडून येतात का?

अर्थातच.

३] जगातील इतर लोक आपल्या आहाराच्या बाबतीत कोणकोणत्या बाबींचा व कारणांचा विचार करून आपला आहार ठरवितात असे तुम्हाला वाटते?

जगात लोक आहार ठरवताना खालील आठ गोष्टींचा विचार करतात :
अ] कॅलरीज (उष्मांक)
आ] पदार्थाची/ अन्नाची राहत्या भागातील उपलब्धता
इ] अन्नासाठीचे बजेट
ई] वैयक्तिक आवड / चव
उ] पदार्थ बनविण्यातला / खाण्यातला सोपेपणा
ऊ] त्यावेळचा मूड
ए] अन्य (उदा. पथ्य इ.)

Proud

उष्मांकाचा विचार करावाच लागतो. पण आहार सकस ,षडरस -युक्त असावा. हे महत्वाच. त्यामुळे दुपारच्या म्हणजे मुख्य जेवणात--वरण- भात, पालेभाजी किंवा सल्याड, फळभाजी, पोळी किंवा भाकरी, दह्याची कोशिंबीर किंवा दही- ताक यापैकी एक, तेल-तुप बेताच, अस असत.
नाश्त्यात बदल केला जातो. [शाकाहारीच].
रात्री साधारण हलक- फुलक म्हणजे भाजी- पोळी [भाकरी -पिठल], खिचडी- ताक किंवा सार. वन-डिश अस काहीस असत..
बजेटचा विचार फारसा नसतो. चविष्ट असाव.
आमच्या येथे फळ फारशी चांगली येत नाही. त्यामुळे नेहमी नाही पण सिझनल-- आंबा, पेरु, बोर,संत्री, खातो.
सणाला मात्र पारंपारिक चालत आलेल . साखर, तेल-तुप याचा फारसा विचार नाही..
अधुन-मधुन चवीत बदल म्हणुन बाहेरही जातो जेवायला.खाण्यात विविधता हवीच. अस मला वाटत.
छान विषय.धन्यवाद.

१] तुमच्या नेहमीच्या (दैनंदिन) आहारातील पदार्थ तुम्ही कोणत्या निकषांनुसार निवडता?

अ] कॅलरीज (उष्मांक)
आ] पदार्थाची/ अन्नाची तुम्ही राहता त्या भागातील उपलब्धता
इ] तुमचे अन्नासाठीचे बजेट
ई] वैयक्तिक आवड / चव
उ] पदार्थ बनविण्यातला / खाण्यातला सोपेपणा
ऊ] त्यावेळचा मूड
ए] अन्य (उदा. पथ्य इ.)

पोषणमुल्य, पदार्थाची त्या भागातील उपलब्धता, चव, पदार्थ बनविण्यातला सोपे पणा याचा मेळ घालून आहार निवडला जातो. बजेट विचारात घेतले जातेच. उदा. समान गुणवत्त असेल तर ब्रँड नेम साठी जास्त पैसे देत नाही. स्टोअर ब्रँड घेते. ऑर्गॅनिकचा शिक्का आहे म्हणून सरसकट सगळे ऑरगॅनिक घेत नाही. सध्या पथ्याचा विचार करावा लागत नाही. मात्र पाहुणे येणार असतील तर पथ्य विचारात घेऊनच पदार्थ केले जातात आणि सोपेपणाचा विचार कमी होतो.

२] तुमच्या या आहाराच्या सर्वसामान्य आराखड्यात तुम्ही कधी बदल करता का? किंवा बदल होतात/घडून येतात का?
हो. बदल अर्थातच होतात, केले जातात. बरेचदा निव्वळ रुचिपालट हे बदलाचे कारण असते. काही वेळा पदार्थाची उपलब्धता कमी-अधीक होते त्यामुळे बदल करणे अपरिहार्यही होते. काहीवेळा पोषणमुल्यांच्या दृष्टीने उत्तम असा दुसरा पर्याय सहज उपलब्ध झाल्यानेही बदल केला जातो.
३] जगातील इतर लोक आपल्या आहाराच्या बाबतीत कोणकोणत्या बाबींचा व कारणांचा विचार करून आपला आहार ठरवितात असे तुम्हाला वाटते?
उपलब्धता, बजेट, चव, सोपेपणा आणि पोषणमुल्य या सगळ्याचाच मेळ घातला जात असावा. मात्र मी जिथे रहाते तिथे उपलब्धता, बजेट आणि चव याच बाबींचा विचार प्रामुख्याने होतो.

अधिक/ अवांतर :-

तुम्हाला सोपं जावं म्हणुन याचा गुगल फॉर्म बनवता येईल. ते बनवण आणि मिळालेल्या माहितीचं पृथःकरण (Analysis) सोपं जाईल.

बघा जमल तर . आम्हालाही टिक करायला सोप Happy

सर्व प्रतिसादकांचे खूप धन्यवाद!

या उत्तरांचा सारांश व त्यावरील माझे विचार, त्यातून काढलेले निष्कर्ष हे मला असाईनमेन्टमध्ये लिहायचे होते. त्यासाठी तुम्ही दिलेली उत्तरे खूपच महत्त्वाची होती.

माझ्यासाठी : इतर लोक आपल्या आहारात कशाला (कोणत्या निकषाला) प्राधान्य देतात ह्यात स्थल-वय-आर्थिक स्थिती-आवड-उपलब्धता-कामाचे स्वरूप (बैठे काम/ मेहनतीचे काम इ.) - पथ्य - आहारशास्त्रीय दृष्टिकोन इत्यादी कोणत्या बाबी दिसून येतात, त्यांचे व माझे निकष जुळतात का, इतरांच्या निकषांवरून काय लक्षात येते, कोणत्या निकषांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाते यांसारख्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या.

तसेच जगातील इतर लोकांच्या आहारासंदर्भात ते खाण्यासाठी कोणते निकष लावत असतील ह्याचा आपला अंदाज / अभ्यास --- आणि प्रत्यक्ष कोर्स फोरमवर वेगवेगळ्या देशांच्या व वेगवेगळ्या आर्थिक/ सामाजिक श्रेणीतील / वयोगटातील लोकांनी त्यांच्या आहाराच्या निकषांबद्दल दिलेली उत्तरे --- या दोन्हींत असणारी तफावत किंवा साम्य हा एक वेगळा अभ्यासाचाच विषय होईल!

पोषणमूल्ये हा निकष महत्त्वाचा आहे. लिहिताना राहून गेला. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

(कोर्समध्ये जगातील लोक दिवसाकाठी आहारातून घेत असलेल्या कॅलरीज व त्या कॅलरीजची आहारातील विभागणी - त्यातील मायक्रोन्युट्रियंट्सचे प्रमाण - स्टेपल्सचे प्रमाण - आहारवैविध्य हे वेगळ्या प्रश्नात चर्चिले जात आहेत.)

@विजय देशमुख, हो, गूगल फॉर्मची कल्पनाही उत्तम आहे. सध्या या असाईनमेन्टचे काम झाले आहे. पण पुन्हा गरज लागेलच, तेव्हा लक्षात ठेवेन. थँक्स! Happy