अभ्यासाचे तंत्र कसे विकसित कराल ?

Submitted by balsanskar on 15 July, 2013 - 10:28

आताच्या काळात अभ्यासाचं तंत्र मुलांना व पालकांना माहिती असणं गरजेचं आहे. बरेच पालक आपल्या पाल्यांना प्रश्नोत्तरे पाठ करायला सांगतात. पुढे जाऊन घोकंपट्टीची सवय घातक पडू शकते. पाठ केलेल्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा लक्षात राहत नाही. तिथे विषयाचा

आताच्या काळात अभ्यासाचं तंत्र मुलांना व पालकांना माहिती असणं गरजेचं आहे. बरेच पालक आपल्या पाल्यांना प्रश्नोत्तरे पाठ करायला सांगतात. पुढे जाऊन घोकंपट्टीची सवय घातक पडू शकते. पाठ केलेल्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा लक्षात राहत नाही. तिथे विषयाचा आवका मोठा असतो. त्यामुळे विषय समजावून घेणं, विषयातील महत्त्वाच्या मुद्यांसाठी पेन्सिलनं अधोरेखित करणं, महत्त्वाच्या मुद्याचे टिपण तयार करणं तसेच त्याचे उपयोजन करणं, या गोष्टी अभ्यासाच्या तंत्राच्या दृष्टीनं उपयोगी ठरतात. अभ्यासाच्या तंत्राची सवय लहानपणापासून लागली, तर महाविद्यालयात विषयाच्या नोटस् स्वत: काढता येतात. गाईड वाचण्याऐवजी स्वतच्या नोटस् चांगल्या लक्षात राहतात. गाईडमध्ये प्रश्नांची उत्तरांची पुनरावृत्ती झालेली असते. पाठय़पुस्तकाच्या तुलनेत गाईड वाचायला वेळही जास्त लागतो. पाठय़पुस्तक वाचनाची सवय झाल्यावर पाठय़पुस्तक वाचायला कमी वेळ लागतो.

अभ्यासाचे तंत्र कसे विकसित कराल ?

१) शाळेत नवीन धडा शिकवण्यापूर्वी मुलांना वाचायला सांगा.

२) धडा शिकवून झाल्यावर शिक्षकांना प्रश्न विचारून शंकेचे निरसन करणं गरजेचं आहे. याबद्दल मुलांशी बोला.

३) घरी पुन्हा धडा वाचायला सांगा.

४) त्यानंतर महत्त्वाच्या मुद्यांच्या नोटस् तयार करायला सांगा.

५) परीक्षेच्या वेळी स्वतच्या नोटस् वाचण्याकडे मुलांचा कल हवा.

६) प्रश्न-उत्तराचा सराव करताना लिहून काढायला सांगा.

७) लिहिलेले दीर्घकाळ स्मरणात राहते.

अभ्यास करताना पिक्चर ज्या आवडीनं पाहतो, त्या आवडीनं झोकून देऊन अभ्यास करणं गरजेचं आहे.

हे स्वानुभवाचे बोल आहेत. माझ्या मुलांनी अभ्यासक्रमासाठी ही पद्धत अनुसरली होती. त्यामुळे नोकरीला लागल्यावर शालेय पाठय़पुस्तकातील अभ्यास त्याच्या मनात ताजा आहे. अभ्यास करताना पालकांनी टीव्ही बंद करून पाल्याजवळ बसलं म्हणजे त्यांची एकाग्रता साधली जाते. बराच वेळ आई-वडील आपला अभ्यास घेतात. ही भावनिक सुरक्षितता पाल्यासाठी यशदायी ठरते.

- प्रा. कुंदा कुलकर्णी, नाशिक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users