फूटबॉल (पोस्टर कलर )

Submitted by विनार्च on 15 July, 2013 - 06:10

रंगांशी आमचा खेळ हल्लीच सुरु झाला पण चित्र मात्र पूर्ण होत नव्हत.... हे पुर्ण झालेल न लेकीच्या मनासारख जमलेल पहिलच चित्र. अगदीच सुरवात आहे मान्य आहे पण तरी ही इथे टाकतेय कारण इथे मिळणार्‍या सुचनांच्याच जोरावर तिचा पुढचा प्रवास सुरु होतो Happy
ह्या चित्रातील रंगाच्या सिलेक्शन पासून डिझायनर झाडापर्यंत सगळी लेकीचीच कल्पना आहे. माझ काम शेजारी बसून तिच्या कामात अडथळा न आणता पाण्याची वाटी सांभाळणे Wink

2013-07-15 10.25.43.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर आहे.

करायचीच म्हणून एक बारीकशी सुचना.... कपड्याना थोडी माती लागल्याशिवाय हा खेळ, खेळला असे आमच्या अंगोलात म्हणत नाहीत.. शिवाय मोजे जरा वरपर्यंत हवेत Happy

मस्त !

chhan alay Happy

दिनेश., पाटील , अन्जू ,पौर्णिमा,अविगा,मुक्तेश्वर कुळकर्णी ,जाई. ,Mrumil,डॅफोडिल्स ,प्रीति,सिंडरेला खूप खूप धन्यवाद __/\__ Happy

दिनेशदा "दिनेश." हा तुमचाच आय डी आहे का?
सुचना एकदम बरोबर दिली आहे तुम्ही Happy अचूक निरीक्षण

अरे वा , मस्तच ! मी स्क्रिनच्या डाव्या बाजूला झुकले पटकन... न जाणो माझ्या उजव्या खांद्यावर बॉल बसायचा Wink
मस्त अ‍ॅक्शन आलीय चित्रात, मुलांचे चेहरे, कपडे ( त्यांच्या हलण्याची दिशा), प्रत्येकाची अ‍ॅक्शन, रिअ‍ॅक्शन एकदम मस्त !
३ डि इफेक्ट वर थोडं अजून लक्ष यायला हवय, पण ते येईल हळूहळू. बोलू आपण