वाढदिवसाच्या सजावटी विषयी..

Submitted by _आनंदी_ on 15 July, 2013 - 02:49

माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे ... २ च दिवस राहिले तयारी साठी..
वाढदिवसाच्या तयारी संदर्भात कोणताही दुसरा धागा असेल तर सांगा.
काही प्रश्न
१) तिचे काही फोटो प्रिंट करुन लावायचे आहेत .. नुसते कलर प्रिन्ट काढले तर छान दिसतात का?
म्हणजे ब्ल्अर्ड नाही ना दिसत .. तस असल्यास दुसरा काही पर्याय आहे का?
२) जिथे खुर्ची ठेउन तिला उभे करणार आहोत, केक कट करण्यासाठी, तिथे मागे भिंतीवर आधी काही कागदी गिफ्ट पेपर चिटकवण्याचा बेत होता पण असे पेपर खुप डिझाइन चे आणि भडक कलर चे असतात,,, दुसरा काही छान पर्याय आहे काय?
काही डेकोरेशन च्या टीप्स प्लिज शेअर करा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

??????

तिचे काही फोटो प्रिंट करुन लावायचे आहेत .. नुसते कलर प्रिन्ट काढले तर छान दिसतात का?

>>हे फोटोच्या क्वालिटीवर अवलंबुन आहे. एक तरी प्रिंट काढुन पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही.

जिथे खुर्ची ठेउन तिला उभे करणार आहोत, केक कट करण्यासाठी, तिथे मागे भिंतीवर आधी काही कागदी गिफ्ट पेपर चिटकवण्याचा बेत होता पण असे पेपर खुप डिझाइन चे आणि भडक कलर चे असतात,,, दुसरा काही छान पर्याय आहे काय?

>> शक्यतोवर हॅपी बर्थडेचे एखादे छान हॅंगींग लावुन उरलेली भिंत रिकामी ठेवा. आणि शक्य असेल तर मुलीलाच फ्रेश रंगाचा फ्रॉक घाला म्हणजे फोटोत ती (मुलगी) उठुन दिसेल, भिंत नाही.

गुगल इमेजेसमध्ये "बर्थडे डेकोरेशन आयडिआज अ‍ॅट होम" म्हणुन सर्च करा. एक सोडुन हजार आयडिया मिळतील.

घरी करणार की बाहेर ?

घरात जागा किती? किती माणसे अपेक्षित आहेत? येणआर्‍या मुलांचा वयोगट काय?

जिथे खुर्ची ठेउन तिला उभे करणार आहोत, केक कट करण्यासाठी, तिथे मागे भिंतीवर आधी काही कागदी गिफ्ट पेपर चिटकवण्याचा बेत होता पण असे पेपर खुप डिझाइन चे आणि भडक कलर चे असतात,,, दुसरा काही छान पर्याय आहे काय?>>> एका थर्माकॉल शीटवर तिचे लहानपणापासूनचे फोटो कोलाज करून लावा ड्रॉइंगपिन्सनी आणि तो थर्माकॉल लावा भिंतीवर मागे.

नुसते कलर प्रिन्ट काढले तर छान दिसतात का?>> चांगला इफेक्ट येणार नाही पण.

धन्यवाद .. Happy
मुलगी १ वर्षाची .. पहिलाच वाढदिवस.. Happy
घरी लहान मुले जास्त येणार नाहित ... पाहुणे असतिल ..
घरात सगळे धरुन १२-१४ लोक असतिल...
फोटो प्रिंट साठी काही दुसरी युक्ती .. जस की वेगळ्या कागदाचा वापर ई. असेल तर सांगा..
थर्माकॉल ची पण आयडिया छान ..
लाजो यांचा धागा शोधते आता...
सगळ्यांना धन्यवाद

आनंदघन. जर फोटो लॅबमधून प्रिंट करता येत असतील तर करून घ्या. दोन तीन तासांत मिळतात. फक्त फोटोची क्लालिटी चांगली आहे का ते बघा. लॅबमधील व्यक्ती तुम्हाला योग्य रीत्या सांगेलच. समजा. फोटो क्वालिटी चांगली नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पुढच्या वाढदिवसाला ही आयडीया करू शकाल.

भिंतीना भरपूर फुगे, कागदी रिबीनी, पताका लावून रंगीबेरंगी सजावट करता येइल. (फक्त केके कापताना वगैरे फुगे फोडू नका, लहान बाळ दचकतं की रडायला लागतं शिवाय चकमकी खान्याच्या ताटात वगैरे पडते ते वेगळंच.) स्टेशनरी शॉपमधे मिकीमाऊस, छोटाभीमचे पोस्टर्स विविध साईझमधे मिळतात ते भिंतीवर चिकटवता येतील.

मी लेकीच्या पहिल्या वाढदिवसाला फुगे भींतींवर लावले होते. जिथे केक कापणार त्यामागे क्रेप पेपरच्या गुंडाळ्या केल्या होत्या आणि त्यांचे डेको केलेले.मुलीचे फोटो बारश्याला वापरले म्हणून वाढदिवसासाठी घरातल्याच पडद्यावर हँडमेड पेपरची फुले करून लावली व त्यावर तिच्या नावाच्या स्पेल्लिंगचे एक एक अक्षर लावून माळ केली. ही माळ सोनेरी फितीवर अक्षरे आणि फुले चिकटवल्याने हलकी झाली व टाचण्या आणि सेलोटोपने चिकटवता आली.

माझ्या एक मैत्रिणीने मोठ्ठे मिकी आणि मिनीचे स्टिकर आणून पुठ्ठ्यावर लावले नि त्याचे नीट कातर काम करून कट ऑट्स बनवले. तिच्या बाळाचे फोटो काढले त्यांच्या मध्ये आणि मग काही दिवस भींतींवर चिकटवले.

ठाण्यात असाल तर खारकर आळीत/ महागिरी मार्केटजवळ बरीच बड्डे दुकाने आहेत ती तुम्हाला ५०० ते १००० मह्ये बॅनर प्रिन्ट करून देतात.

फुगे भिंती वर पक्के चिटकवण्यासाठी काय वापरावे..... भिंतीला वाढदिवसाच्या थिमचे ( जंगल/ डिस्ने../बार्बी..)असे प्रिन्ट असलेले कापड्/पडदा लावावा. त्यावर फुगे लावावे/ फुग्यांचे माळ करुन लावावी....फुग्यांचा दोर्‍याला सुई-धाग्याने स्टिच करावे. प्र्त्येक फुग्याला मुलीचे एकेक फोटो लावावे.
अगदीच काही तसे कापड नसले तर वेगवेगळ्या रंगाच्या ओढण्या भिंतीला लावाव्यात.

केक चाकूनं कापण्यापेक्षा एक स्पेशल छोटा केक तिच्यासमोर ठेवा. तिला त्यात बोटं बुचकळून त्याचं जे काय करायचं ते करू द्या. पहिलूनच केक खाणार असेल आणि स्वतःच्या हातांनी खाता येत असेल तर एंजॉय करेल. Happy

हॅपी बड्डे! Happy

"वाढदिवसाचे फ्लेक्स"
थोडी विचित्र वाटली तरी भारी आयडिया आहे.
तुम्हाला जे फोटो प्रिंट करून कोलाज करावेसे वाटते आहे, ते सगळे डीजिटल फोटो नेऊन फुले, झाडे, फुलपाखरे, वै सकट एक चित्र प्लस बर्थडे मेसेज इ. कांपोज करून मोठा फ्लेक्स बोर्ड प्रिंट करून आणा. अजिब्बात खर्चिक आयटम नाहिये तो.
फ्लेक्स प्रिंटिंगच्या दुकानातल्या डीटीपी ऑपरेटरशेजारी बसून फोटोशॉप करवून घ्या. (फ्लेक्स म्हणजे तेच ते पुढार्‍यांचे रस्त्यांवर वाढदिवसाचे लावतात ते.) नीट रोल करून आणला तर छान विना घडीचा टिकतो, धुवून स्वच्छही करता येतो, दिसतोही छान, हवी ती रंगसंगती करता येते. पुढे तिच्या रूममधे एक संपूर्ण भिंत भरून वॉलपेपरसारखा वापरता येतो.

Mi mazya mulichya birthdayla iblis yanchi same theme waparli hoti, aani aata te flakes mulichya room madhe lawale aahe, jo baghel to compliment dilyashivay rahat nahi....