मराठी विनोदी कार्यक्रम

Submitted by विजय देशमुख on 14 July, 2013 - 22:43

काल बर्‍याच दिवसांनी फू बाई फू बघितलं. एक दोन भाग चांगले वाटले तर एका भागात भाऊ कदम आणि सुप्रिया पाठारे यांची स्कीट (मराठी?) खुपच आवडली. हा भाग इथे बघता येईल.

http://www.youtube.com/watch?v=52ADZig2WTU

इथे अनधिकृत दुवे देऊ नये अशी अ‍ॅडमिनची सुचना आहे. पण हा दुवा झी मराठीच्या यु-ट्युबवरिल अधिकृत चॅनेलचा वाटतोय. नसल्यास कळवावा, काढुन टाकू.
वेळेअभावी आपण सगळेच भाग बघु शकत नाही, तेव्हा आपल्याला आवडलेल्या कार्यक्रमाची/ भागाची लिंक इथे द्याल का? वेळही वाचेल आनि उत्तम विनोदी कार्यक्रम बघता येतील. [आणि फालतू वगळता येतील Wink ]

विनोदी कार्यक्रमासाठी उपग्रह वाहिनी-मराठी ग्रूपमध्ये धागा दिसला नाही म्हणुन इथे लिहिलं. असल्यास कळवावा. उगाच रणकंदन नको Lol

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विजय फु बाई फु माझा एकमेव आवडता मराठी कार्यक्रम , बहुतेक सगळे भाग मी मराठीवर आहेत , सगळे मस्त आहेत.

ज्यांनी उंच माझा चे काही भाग चुकले/ चुकवले गेले असतील त्यांच्या करता Vईडीओ.इंडिया.काम ह्या साईट वर १ ते ४१४ भाग पाहायला मिळू शकतात. video.india.com/marathi

हम्म. पुर्वीचे भाग बघत होतो. कितीतरी स्पर्धकांना 'जज' करणाची लायकी नसलेल्या स्वप्नीलच्या इंग्रजीमधून चालणार्‍या मर्कटलीला आणि लठ्ठ सावंत बाईंच्या (थोड्याच राहिलेल्या) हेअरच्या श्टायली सोडल्या तर उत्तम कार्यक्रम.

स्वप्नीलच्या इंग्रजीमधून चालणार्‍या मर्कटलीला>>>> +१०००
तो बहुदा सिद्दूच्या हसण्याची नक्कल करतो का?

कितीतरी स्पर्धकांना 'जज' करणाची लायकी नसलेल्या स्वप्नीलच्या

>> ह्याला खुप अनुमोदन.. सतिश तारेंना स्वप्नीलने जज करणे म्हणजे...

'फु बाई फू' - भाऊ कदम, कुशल भद्रिके, हेमांगी कवी व नाईक हे जातीवंत हास्यवीर आहेत; इतरांचा परफॉर्मन्स मुख्यत्वे स्क्रिप्टवरच विसंबून असतो असं आपलं माझं बाळबोध मत. इतरानी उत्स्फुर्तपणे हंसणं ही विनोदाची खरी कसोटी असते; सहकलाकारानी, परिक्षकानीच दिलेली मोठ्ठी दाद दाखवत राहून इतराना हंसायला प्रवृत्त करायला पाहाणं खरं तर 'हास्यास्पद'च !!
'कॉमेडी एक्सप्रेस' - नो कॉमेंटस.

भाऊ +१

सहस्पर्धकांच्या प्रतिक्रिया बघणेबल नसल्याने पहायचा कंटाळा केला जातो. तसंच प्रत्येक अ‍ॅक्टच्या आधी कर्कश्श आवाजात गाणे म्हणत नाचत एण्ट्री घेतलीच पाहीजे का ? हा ही प्रश्न पडतो अनेकदा.

प्रियदर्शन जाधव - हेमंत ढुमे, कुशल बद्रिके - हेमांगी कवी, ह्रुषिकेश जोशी - लीना भागवत आणि, भाऊ कदम- सुप्रिया पाठारे ह्या चार जोड्या छान जमल्या होत्या. बाकि हास्यास्पद होतं.

ह्या कार्यक्रमांमधून परिक्षक स्वतःचे ईगो कुरवाळून घ्यायचं काम करतात ते फार रसभंग करतं (उदा. स्वप्निल-सर ... ताम्हणकर बाईंच्या शब्दात 'स्वप्निल-स्सा' किंवा अश्विनी कळसेकर'जी' 'मॅडम').

इतरांच्या कार्यक्रमात हेमांगी कवीची दाद बघून 'हिला त्यासाठी वेगळे पैसे देतात की काय' असं वाटतं...
प्रत्येक अ‍ॅक्टच्या आधी कर्कश्श आवाजात गाणे म्हणत नाचत एण्ट्री घेतलीच पाहीजे का >> +१