MS Dhoni भारताचा सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे का?

Submitted by Mandar Katre on 12 July, 2013 - 11:07

ICC च्या सर्व ट्रॉफी जिंकून तिरंगी मालिकाही खिशात घालणार्या जिगरबाज कप्तान MS Dhoni याचे हार्दिक अभिनंदन.....

आजवर कोणालाही न जमलेले जबरदस्त winning team spirit निर्माण करून भारतीय क्रिकेटला अत्त्युच्च मानाचे पद मिळवून देणारा कप्तान मात्र काही दिवसापूर्वी match fixing च्या आरोपाखाली संशयाच्या जाळ्यात ओढला गेला होता ................

माबोकरांना काय वाटते ?

MS Dhoni भारताचा सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mandar Katre, प्रश्न थोडा बदलायला पाहिजे. भारताच्या जागी बीसीसीआय हवं होतं.
आ.न.,
-गा.पै.

Best Test Team for some time. (आता नाहीय)..
World Cup 2011
Champions Trophy 2013
World T20 2007

आणि त्या सगळ्यात फक्त कप्तान म्हणून नव्हे, तर उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून कामगिरी.

अजूनतरी कुठल्याही इतर भारतीय कप्तानाच्या नावावर इतके विक्रम नाहीत.
कालचा विजय त्यामानाने लहान होता (स्पर्धा तीन देशांची होती) पण जखमी असताना त्याने सामना स्वबलावर खेचून आणला आणि तोही Tail-Enders बरोबर असताना...आणि असले विक्रम तो बर्‍यापैकी सातत्याने करतो..

तेव्हा बेशक..

* बरेच जण म्हणतात कि धोनी लकी कॅप्टन आहे. पण नशिबाशिवाय कोणाचे काय चाललाय ? तेंव्हा तो भाग बाजूला ठेवला तर World Cup 2011, Champions Trophy 2013, World T20 2007 जिंकल्यावरही तो सर्वश्रेष्ठ आहे का असा प्रश्न का पडावा ?
* सांघिक खेळ आहे म्हटल्यावर सर्वांनी काही काही तरी देणे अपेक्षितच आहे. हे इतरांच्या वेळी न होता धोनीच्याच वेळेला झाले ह्यात त्याचा काहितरी वाटा असणारच असे धरायला हरकत नसावी.
*जेवढ्या अपेक्षा सध्याच्या टिमच्या डोक्यावर आहेत त्या बघता अशा तीन high prestige high tension tournaments जिंकणे नक्कीच खायचे काम नाही. एक लॉईड नि पॉंटींग वगळता असे कोणाला जमले नाही (स्टीव्ह वॉ पण धरता येईल त्यात फक्त champions trophy जिंकल्याचे आठवत नाहि त्याने) तेंव्हा धोनी नक्कीच त्या लिस्टमधे शोभून दिसतो.

वन डे आणि टी २० साठी नि:संशय धोनी हा श्रेष्ठ कॅप्टन आहे. पण टेस्ट साठी मात्र सौरव त्याच्यापेक्षा श्रेष्ठ होता असं वाटतं.

हो.

वन डे आणि २०-२० चे विश्वचषक आणि चॅम्पियन ट्रॉफीच नाही तर कसोटीतही भारत पहिल्यांदा नंबर वन बनला ते धोनीच्याच काळात. वैयक्तिक विक्रम करण्यात खुश असणाऱ्या संघाला त्याने आधी विजयाचा विचार करायला शिकवले. शेवटपर्यंत लढायची जिगर स्वत:च्या उदाहरणातून दाखवली. निर्विवादपणे तो भारताचाच नाही तर मी पाहिलेला जगातील सर्वोत्तम कर्णधार आहे.

MS Dhoni भारताचा सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे का?
>>>
माझे रँकिंग..
1. विराट
2.धोनी
3.कपिल देव
4. दादा
5. अझर

माझे रँकिंग - मी पाहिलेले - अझरपासूनचे ...

१) धोनी
२) दादा
३) रोहीत शर्मा

अझरला लहानपणी बघायचो तेव्हा कर्णधार म्हणजे नुसते टॉस उडवणारा, आणि शेवटी स्टेजवर ईंग्लिश बोलणारा कोणी तरी घ्यायचा म्हणून असतो असेच वाटायचे..
मग सचिन कर्णधार होता तेव्हा वाटायचे हो बरोबर, वर्गातला हुशार मुलगा मॉनिटर हवा, तसे भारताचा सर्वोत्तम खेळाडू कर्णधार हवा..
सुदैवाने सचिन टोटल फ्लॉप झाला आणि मग दादा कर्णधार झाला. त्यामुळे कर्णधाराची खरी भुमिका काय असते, त्याचा औरा कसा असावा हे समजू लागले.
पुढे द्रविड कुंबळे हे दादानंतरचे संघातले बेस्ट पॉसिबल पर्याय म्हणूनच बघितले गेले.
मग धोनी आला आणि पुन्हा संघाला दादानंतरचा कर्णधार मिळाला असे वाटले.
आताचा कोहली मात्र पुन्हा सचिनच्या कॅटेगरीत जात वर्गातला हुशार मुलगा मॉनिटर हवा, तसे भारताचा सर्वोत्तम खेळाडू कर्णधार हवा.. असे झालेय. आणि आपण रोहीत शर्मा नावाच्या कल्पक कर्णधाराला मुकत आहोत.