आई, तुला काही कळत नाही...

Submitted by स्वाती२ on 8 July, 2013 - 07:53

लेक नुकताच हायस्कूलला गेला तेव्हा घडलेला हा किस्सा. त्याच्या मोठं होण्याच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा अधोरेखीत करणारा. साधारण ४ वर्षांपूर्वीचा. इतरत्र पूर्वप्रकाशित.

दोन आठवड्यापूर्वी एका कामासाठी लेकाला शेजारच्या गावाला जावे लागले. ड्रायवर नेहमीप्रमाणे मी. ४०-५० मिनीटांची ड्राइव्ह. वेळ घालवायला काय काडी टाकावी याचा विचार करत होते तेवढ्यात पाठच्या सीटवरून लेक ओरडला.
"तू मला आठवण नाय केली. Now I am in trouble."
"तुझ सेलफोन, आयडी,पाकीट वगैरे तू लक्षात ठेवायचस. आज काय विसरलायस? का फाईलच विसरलास?" माझं सुरू झालं.
"सगळं घेतलय मी."
"मग?"
"जे. टी. ला परवा birthday च text करायच राहीलं. देवा! " लेकाने धावा सुरु केला.
चिरंजिवांच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता आणि स्वारी कॅलेंडर वर खुण करुनही birthday wish करायला विसरली होती.
"त्यात काय आता कर की belated" माझे दोन पैसे.
"येस! अब आयेगा मझा." मी आनंदाने गाणं गुणगुणायला सुरुवात केली.
"आता निदान गाऊ तरी नकोस. मला जरा विचार करु दे" लेकाने विनवले.
पाच एक मिनिटांनी सेलफोन काढून त्याने अंगठे नाचवायला सुरुवात केली. पाच मिनिटांनी परत बीप.
"We are cool" लेकाने सुटकेचा निश्वास टाकला.
मी उडालेच. चक्क भांडण तंटा नाही म्हणजे काहीतरी घोळ होता.
"J.T. is such a good friend," मी पुटका टाकला.
"डोंबलाची good," लेक खवळलाच.
"मी text काय केलं माहितेय? मी सांगितल की सेल ची बॅटरी मेली म्हणून text नाय करता आला. बॅटरी टाकल्याबरोबर लगेच करतोय."
"अरे तुझी मैत्रिण ना ती. मग असं खोटं..."
माझं बोलणं तोडत लेक सुरू झाला. "मग काय सांगायच? कामाच्या गडबडीत दिवसभरात वेळ नाही झाला आणि संध्याकाळपर्यंत इतका दमलो होतो की विसरून गेलो? पुढल्या birthday पर्यंत ऐकवल असतं मला. सालं काढली असती माझी."
"काहीही काय! थोडीशी रुसली असती. पण तू नीट सांगितल असतस तर पटलं असतं," माझा उपदेश.
"Mom, you don't know anything about girls"
माझा कानावर विश्वास बसत नव्हता. आता मी देवाचा धावा सुरू केला.
"हॅलो. मी पण मुलगीच आहे."
"No. You are a Mom." लेकाने ऐकवलं.
"तुला माहीत नाय Mom. सी. आर. चिडतो का खेळायला वेळ नाही म्हटलं तर? but these girls. लगेच चिडचिड. मग सांगाव लागतं खोटं "आईने ग्राउंड केलेय "म्हणून. मला काय हौस आलेय खोटं बोलायची? आम्ही मित्र ठेवतो एकमेकांचे birthday लक्षात? पार्टी दिली, नाही दिली ठेवतो हिशोब? पण these girls. आधी birthday लक्षात ठेवणार. मग आमचे locker सजवणार. मग आमच्या कडून अपेक्षा. विसरलं की वर्षभर ऐकवणार. ती सी.एस. , मधेच आठ-दहा दिवस बोलणच बंद करते. मी विचारलं "what I did wrong" तर म्हणे "Nothing". पण आदळआपट चालू. मग एक दिवस परत काही झालच नाही अस बोलायला सुरुवात. मी तर आता विचारणच सोडून दिलय. You don't know anything mom." लेकाने समारोप केला.

कसतरी हसू आवरत मी लेकाला कामाच्या ठिकाणी सोडलं. रात्री जेवताना नवर्‍याला किस्सा सांगितला. जेवण संपवून उठत नवर्‍याने ऐकवलं, " जागा असेल तर सांगतो त्याला "Welcome to the club".

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Welcome to the club>>>>>>>>>>>>>> Lol

छान.

Happy

खल्लास!
याला म्हंतात जीएफ!
तरी बरं, बॉईज ना थोडंतरी समजतं. इथे तुमची मुलगी असती, तर २-४ वर्षं आधीच सुरुवात झाली असती या डायलॉगची : "मॉऽम, तुला काही समजतच नाही!"

"Mom, you don't know anything about girls">>> टिनेजर्सना कायमच आपल्याला आईवडिलांपेक्षा जास्त अक्कल आहे, असे वाटत असते, नाही का? यावरुन मला एक फॉरवर्ड आठवले.. ज्यात लहानपणी बाबा म्हणजे हिरो. थोडा मोठा झाला, की बाबाला तर काहीच कळत नाही आणि एका स्टेजला आल्यावर बाबा किती ग्रेट याची पुन्हा जाणीव होणे, असं काहीसं होतं... बाकी लेखनशैली मस्त! Happy आणि हो! ह्या लेखाच्या संदर्भाने मात्र लेकाचं विधान अगदी बरोब्बर हां Proud

मस्त मजा आली शेवटचा पॅरा वाचताना... खास करून वाचताना आपसूकच तेथील अ‍ॅक्सेंटमध्ये तुमचा मुलगा मराठीत हे नेमके कसे बोलला असेल तसेच वाचले गेले.. Happy

धन्यवाद!

माझ्या डॉकचा एक मुलगा १८ वर्षांचा आणि एक २५ चा. १८ वर्षाच्या मुलाच्या मते तिला काही कळत नाही आणि बाहेरच्या जगात टक्केटोणपे खाऊन परत आलेल्या पंचविशीतल्या मुलाच्या मते ती सर्वज्ञ आहे. Happy

माझ्या डॉकचा एक मुलगा १८ वर्षांचा आणि एक २५ चा. १८ वर्षाच्या मुलाच्या मते तिला काही कळत नाही आणि बाहेरच्या जगात टक्केटोणपे खाऊन परत आलेल्या पंचविशीतल्या मुलाच्या मते ती सर्वज्ञ आहे. >>>>

+100

स्वाती२... तुला अनुमोदन आणि हज्जारतरी गावं इनाम. आमच्याकडे अधिक जनरल स्टेट्मेंट होतं.."आई, यू डोन्ट नो एनिथिंग"

पुढल्या काही वर्षांत त्या "एनिथिंग"मधे कपात होत होत मी सर्वज्ञ असल्याचा साक्षात्कार कसा तो होऊदे ... म्हणजे झालं.

Pages