फुटकर - १

Submitted by समीर चव्हाण on 8 July, 2013 - 05:04

संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिळण्याआधी वाटत होते मिळेल केव्हा
मिळल्यानंतर वाटत आहे काय पुढे मग

ही दुनिया ना मलीन इतकी कधी वाटली
मळल्यानंतर सगळ्यांना का असे वाटते

म्हटले तर नाही किंमत माझ्या शब्दाला
म्हटले तर नाही किंमत दुनियेत कशाला

तसा फार ना बदलला मुळी गाव तरीही
अजब ठिकाणी आल्याचे वाटलेच क्षणभर

तुझे नेमके काय बदलले कळले नाही
फार वेळ मी न्याहाळत राहिलो उगाचच

खाली-खाली वाटत होते फार वेळ मग
फार वेळ मी कोणाशी काही न बोललो

मला पाहुनी हसला जळमट काढत कोणी
मीही झटकत होतो त्याला कुठे माहिती<<<

अप्रतिम द्विपदी! समीर अ‍ॅट हिज बेस्ट!

(ह्या प्रकाराला 'फुटकळ' किंवा 'मुक्त द्विपदी' असे शीर्षक देऊन न्याय मिळावा असे वाटले).

लक्षपूरवक प्रत्येक द्विपदी वाचली
अजून एकदा /दोनदा वाचन करावेच लागेल त्याशिवाय अनेक ओळीतली खरी मजा नेमकी अनुभवता येणार नाही असे माझे मला वाटले

पण अडचण अशी आहे की एक तर एकाच धाग्यात इतक्या द्विपदीमुळे संख्यात्मकता ओव्हर डोस झाली आहे
या द्वीपदींचे विषयवार /आशयवार वगैरे वर्गिकरण करून टप्प्याटप्प्याने द्यायला हव्या होत्यात म्हणजे रसग्रहणालाही सोपे झाले असते आणि हळू हळू घोट घोट रिचवत लज्जतही वाढली असती ....(शेरांचे /द्विपदींचे घोट असे म्हणत आहे गैरसमज नसावा Happy )

एकापेक्षा एक बेहद्द सुंदर आहेत द्विपदी
शायरीचा /शायराचा बाज म्हणजे काय हे आपल्या लेखनातून वेळोवेळी शिकायला अनुभवायला मिळते
मराठी शायरीत एक वेगळे पणा कसा आणता येईल यास्तव आपले शेर फार अभ्यासनीय वाटतात मला

धन्यवाद समीरजी

धन्यवाद, भूषण.
(ह्या प्रकाराला 'फुटकळ' किंवा 'मुक्त द्विपदी' असे शीर्षक देऊन न्याय मिळावा असे वाटले).
शीर्षकांबद्दल संभ्रमात होतो, फुटकर/फुटकळ असे एकदा घेतले होते म्हणून टाळले. पुण्याच्या भेटीत बहुतेक शेर सुचले म्हणून भेट असे नाव ठेवले. तेही फार समर्पक आहे असे नाही.

मनापासून धन्यवाद.

मिळण्याआधी वाटत होते मिळेल केव्हा
मिळल्यानंतर वाटत आहे काय पुढे मग
.
ही दुनिया ना मलीन इतकी कधी वाटली
मळल्यानंतर सगळ्यांना का असे वाटते
.
म्हटले तर नाही किंमत माझ्या शब्दाला
म्हटले तर नाही किंमत दुनियेत कशाला
.
खाली-खाली वाटत होते फार वेळ मग
फार वेळ मी कोणाशी काही न बोललो


फार सुंदर.

सलेक म्हणजे काय?

सफर एवढी सुंदर घडेल ठाउक नव्हते
आसक्तीचे बीज देखता तरुवर झाल

मिळण्याआधी वाटत होते मिळेल केव्हा
मिळल्यानंतर वाटत आहे काय पुढे मग

ही दुनिया ना मलीन इतकी कधी वाटली
मळल्यानंतर सगळ्यांना का असे वाटत

म्हटले तर नाही किंमत माझ्या शब्दाला
म्हटले तर नाही किंमत दुनियेत कशाला

वा! अतिशय आवडले आणि भिडले..

एकापेक्षा एक बेहद्द सुंदर आहेत द्विपदी
शायरीचा /शायराचा बाज म्हणजे काय हे
आपल्या लेखनातून
वेळोवेळी शिकायला अनुभवायला मिळते>>वैवकुंशी सहमत..:)

सुन्दर. "जे न साधले ...." या ओळी फार भिडल्या. कदाचित जवळच्या नात्यात अशा प्रकारचे वास्तव जवळून पाहिल्यामुळे असेल.
रचनेतील वेगळेपणा बरोबरच खोल आशयही भावला.

सगळ्यांचे आभार.

स्वाती आणि मुटेजी:
सलेक ह्या ठिकाणी सल एक अभिप्रेत आहे.
तडजोड नक्कीच आहे.

समीर

दिवस काढले थोडे, कंटाळलो तिथेही
फिरून मागे येण्यावाचुन मार्ग न दिसला

चिंतांचे पाऊल वाजले, तंद्री तुटली

सफर एवढी सुंदर घडेल ठाउक नव्हते
आसक्तीचे बीज देखता तरुवर झाले

मिळण्याआधी वाटत होते मिळेल केव्हा
मिळल्यानंतर वाटत आहे काय पुढे मग

तसा फार ना बदलला मुळी गाव तरीही
अजब ठिकाणी आल्याचे वाटलेच क्षणभर

तुझे नेमके काय बदलले कळले नाही
फार वेळ मी न्याहाळत राहिलो उगाचच

ओझरता लावला हात मी घरास तेव्हा
थोडेसे डुचमळले पाणी दोन्हीकडचे

खाली-खाली वाटत होते फार वेळ मग
फार वेळ मी कोणाशी काही न बोललो

म्हटले तर झाले बरेच काही दोघांमध्ये
म्हटले तर नाही काहीही सांगण्यासारखे

अप्रतिम शेर झालेत.

धन्यवाद समीर!

धन्यवाद, उल्हासजी आणि विजय.
वैभव, का हसलास ते बहुतेक समजले. पण खात्री नाही.

समीर

वैभव, का हसलास ते बहुतेक समजले. पण खात्री नाही.<<<<<<

कारण ऐकून तुम्हीच हसाल

खरेतर एका दुसर्‍या एका संकेतस्थळावर मराठीतून प्रतिसाद द्यायचा होता तिथे मराठीत कसे टायपायचे महीत नसल्याने अनेकदा मी मायबोलीवरील कुठल्याश्या धाग्यावर टाईप करतो आणि तिकडे पेस्ट करतो

यावेळी इथे मायबोलीवर तुमची ही रचना वाचत बसलो होतो म्हणून हा धागा समोर होता ..... साय्मल्टेनियसली तिथेही प्रतिसाद द्यायचा होता मग टाईप केले इथे आणि चुकून सेव्हही इथेच !!!
.....मग काय पुन्हा संम्पादित करताना ....जसे ......
..आमच्या गावाकडे शेजारी पाजारी आपल्या घरातील आजची विशेष पाक़कृती शेजार्‍याना वाट्ततात ....तेव्हा आपल्याकडे आज काही विशेष केले नसेल तर गृहिणी कश्या त्या आलेल्या खाऊच्या थाळीस परत करताना त्यात थोडिशी साखर ठेवतात आणि परत करतात .........
....तसे मी संम्पादित करताना काहीतरी ठेवावे म्हणून मग हा " Happy "स्मायली ठेवला
बाकी काही नाही सर ..........
Lol

समीर, आय मस्ट से... आजपर्यंत वाचलेल्या तुझ्या लिखाणातले सर्वोत्तम!!

प्रत्येक दोन ओळींनंतर, अर्थ आत भिनावा म्हणून थांबावे लागत असतानाच, पुढच्या दोन ओळींत कुठला खजाना मिळणार आहे, ह्याची उत्सुकता शेवटापर्यंत सजग राहते!

सर्वांगसुंदर

अनेक अनेक रुपके आवडलीत, शब्दकळा लाघवी.
कुठे त्रागा नाही, चिडचिड नाही- पण भाव मात्र आर-पार!

जियो दोस्त!

बागेश्री:

कुठे त्रागा नाही, चिडचिड नाही- पण भाव मात्र आर-पार!

महत्त्वाचं निरीक्षण आहे.
मनापासून धन्यवाद.