कधी कधी आपल्याला दोन वेगवेगळी कामे करावयाची असतात पण गडबडीत नेमके उलट होते याचे त्याला तर त्याचे ह्याला मग त्यातून विनोद निर्माण होतो अशीच एक व्यक्ती हल्ली सोने स्वस्त झाले म्हणून पै पै करून जमवलेला पैसा खर्चून लॉकेट कम मंगळसूत्र नवीन प्रकारचे (हवे तर टू इन वन म्हणा ) बायको साठी खरेदी करतो आणि गडबड अशी होते कि बस....
याला म्हणतात .............. क्रॉस कनेक्शन
बायको विसरली मंगळसुत्र न्हाणीत,
पण शोधीत होती मच्छरदाणीत.
मच्छरदाणीचे मूळ उचकून काढले,
आणी त्या सवे मला खाली हि पाडले.
मच्छर उडाला,झोप मला चावली (मच्छर चावला म्हणून झोप उडाली नव्हे कारण क्रॉस कनेक्शन)
मंगळसूत्राची डबी न्हाणीत गावली.
मंगळसुत्र घातले लॉकेट समजून
वर साडी हि नेसली लुंगी जाणून
आता इकडे लाईन,तिकडे हि लाईन.
करावे आता लेडीज टोयलेट ज्वाईन
दरवाज्याला दिला जोराचा धक्का
आतून आवाज हि आला पक्का
कोण ग तू ताई का अक्का
कोणी हि असा घाई करू नका
करकर करीत दरवाजा उघडला
साडीतला वीर मग मात्र गडबडला
मंगळसुत्र पहाताच विसरले भान
साडीतच रे तू दिसतोस छान
मंगळसुत्र आता इकडे आण
वर लुंगी हि आता देऊन टाक दान
आता जरी गेली माझी शान
लवकरात लवकर तू हे मान.
मला खुश करायला एवढी का घाई
मी तर तुला रागावणार नाही
घरी जा लवकर लावून घे दार
लाडाने म्हणू दे वारे माझा यार
(No subject)