Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 6 July, 2013 - 07:42
दिंडी मधले | दु:ख सावळे |
पुन्हा दाटले | शब्दामध्ये ||१||
पुन्हा मनाचा | बांध फुटला |
उर भरला | तव प्रेमे ||२||
पुन्हा जीवाला | भूल पडली |
चालू लागली | वाट जुनी ||३||
स्वप्न साजिरे | एक निळूले |
मनी जागले | आज पुन्हा ||४||
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे.
छान आहे.
कारण ? आली आली आषाढी
कारण ? आली आली आषाढी
वारकरी जमले चंद्रभागे काठी ...
अंजू,विजयाजी .धन्यवाद विजयाजी
अंजू,विजयाजी .धन्यवाद
विजयाजी खर आहे आषाढी आली कि एक nostalgia येतो .वारी पहिली की मन वरखाली होऊ लागते .