आभारास देखिल "पात्र नसलेलं" अदखलपात्र शास्त्र

Submitted by डॉ अशोक on 6 July, 2013 - 04:13

आभारास देखिल "पात्र नसलेलं" अदखलपात्र शास्त्र

मेडीकलच्या विद्यार्थ्याला अभ्यासक्रमात अनेक विषय सिकावे लागतात. शरीररचना शास्त्र, शरीरक्रिया शास्त्र, जीव रसायन शास्त्र, शरीरविकृती शास्त्र, शल्य चिकित्सा, औषध वैद्यक शास्त्र, प्रसूती व स्त्री रोग शास्त्र, बालरोग शास्त्र इ.ई. यात माझा विषय :" रोग प्रतिबंधक आणि सामाजिक औषध वैद्यक शास्त्र" हा ही एक विषय आहे. मेडीकल ला आलेल्या कोणाही विद्यार्थ्याला "करीअर म्हणून तू कोणता विषय निवडशील?" असं विचारलं तर पहिल्या पाच पसंतीक्रमात देखिल रोग प्रतिबंधक आणि सामाजिक औषध वैद्यक शास्त्र" हा विषय येणार नाही ! मात्र परिक्षेची तयारी करणा-या कोणाही विद्यार्थ्याला विचारा: "तुला नापास होईन अशी भिती कोणत्या विषयाची वाटते?" तर पहिल्या तीन विषयात "रोग प्रतिबंधक आणि सामाजिक औषध वैद्यक शास्त्र" हे नाव हमखास असणार ! तर असा हा "असून अडचण, नसून खोळंबा" असा विषय.

मेडीकलच्या पहिल्या वर्षी बहूतेक सर्व विभाग प्रमुख विद्यार्थ्यांना आपापल्या विषयाची तोंड-ओळख करून देतात. मी एकदा अशाच एका बॅचला प्रश्न केला: "विद्न्यानाचे मानवावर खूप उपकार आहेत. तर मागच्या दोन शतकात विद्न्यान्यानं मानवाला महत्वाच्या अशा काय देणग्या दिल्या असं तुम्हाला विचारलं तर काय सांगाल?" यावर मानवाचं चंद्रावर पाऊल, संगणक, अणू-विद्न्यान, विमानाच शोध, टेलीफोन अशी उत्तरं मिळाली. यानंतर मी विचारलं "आधुनिक वैद्यक शास्त्रानं बरंच साध्य केलंय. मागच्या दोन शतकातल्या अशा काही महत्वाच्या उपलब्धी तुम्हाला आठवतात कां?" यावर हार्ट-ट्रान्स्प्लान्ट, डीएनए चा शोध, ऍंटी बायोटीक्स चा शोध, क्ष-किरणांचा उपयोग इत्यादी दहा पंधरा गोष्टींची यादी तयार झाली. गंमतीचा भाग म्हणजे मागच्याचशतकात आधुनिक वैद्यक शास्त्रानं लसीकरणाच्या मदतीनं देवी सारखा भयानक रोग या भूतला वरून समूळ नष्ट केलाय, नारू सारखा रोगही नष्ट झालाय ही उपलब्धी कुणाला ही सांगावीशी वाटली नाही. प्रतिबंधक वैद्यकशात्राची ही कामगिरी कुणालाही दखल पात्र अशी वाटली नाही !

माझा विषय, रोग प्रतिबंधक आणि सामाजिक औषध वैद्यक शास्त्र", हा "आभारास देखिल पात्र नसलेला विषय आहे" असं आम्ही गंमतीनं म्हणतो ते यामुळेच!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर आहे अशोक तुमचे. अर्थात हा अतिशय महत्वाचा वि आहे. त्याचे सध्याचे नाव 'Community Health' आहे.पूर्वी त्याला Preventive & Social Medicine ( PSM) म्हणत. हा विषय प्रथम वर्षास प्रवेश घेतल्यापासून ते internship संपेपर्यन्त अभ्यासस असतो. त्यामुळे विद्यार्थी त्याला गमतीने' पीळ शेवटच्या मिनीटापर्यन्त'(PSM) असे म्हणत!
या विषयावर आपण जेवढा भर देउ तेवढी आपली महागड्या उपचारांपासून सुटका होउ शकेल. Prevention is the best cure हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

पीळ बरोबर आहे. असेच म्हणत असत. अजूनही म्हणत असावेत Wink

*

सर, थोडे पटले नाही तुमचे म्हणणे.

"अकाली म्हातारे झालेले गांव" मधे तुम्ही म्हणता :
>>गावातल्या लोकांनी सरकारदरबारी खेट्या घातल्या पण पदरी निराशा पडली होती आणि आता आपण काही तरी करावं अशी माझ्या त्या विद्यार्थ्याची त्याच्या गुरूकडे (म्हणजे माझ्याकडे) मागणी होती. मला ही ते पटलं.<<
त्याच बरोबर,

>>मी ही घटना नंतर विसरून गेलो होतो. माझी औरंगाबादला बदली झाली आणि एक दिवस माझ्या त्या विद्यार्थ्याचा फोन आला. तो म्हणाला: "सर, आनंदाची बातमी आहे. त्या गावाच्या नळ योजनेचं उदघाटन आहे आणि तुम्ही यावं अशी गावक-यांची इच्छा आहे. " मला त्या गावचे गावकरी औरंगाबादला येवून भेटून गेले. मी नाही जावू शकलो त्या समारंभाला.<<

म्हणजे, सर, तुमचे विद्यार्थी तुम्हाला गुरुस्थानी मानून मदतीसाठी तुमचा धावा तर करतातच, पण सामान्य जनांना तुमच्या विषयाचे महत्व पटून ते देखिल, तुम्ही विसरला असलात तरी, तुम्हाला योग्य श्रेय देण्यासाठी कार्यक्रमांना आदरपूर्वक आमंत्रितही करतात.

तर माझी शंका अशी, की तुमच्याच विषयाला 'आभाराला पात्र नसलेले शास्त्र' असे तुम्हीच का म्हणत आहात?

*
एकच धागा दोनदा प्रसिद्ध झालेला दिसतो आहे, अ‍ॅडमिन यांना विनंती करून एक अप्रकाशित करता येईल.

इब्लीस..
धन्यवाद !!

एकच धागा दोनदा प्रसिद्ध झालेला दिसतो आहे, अ‍ॅडमिन यांना विनंती करून एक अप्रकाशित करता येईल
प्रयत्न केला एक धागा डिलीट करायचा, पण जमलं नाही

कुमार१...
त्याचे सध्याचे नाव 'Community Health'
'Community Health' नाही "Community Medicine"

डॉ. अशोक, वैद्यक शास्त्राच्या विद्यार्थी मंडळीना कदाचित रोजच्या आयुष्याचा भाग म्हणून या शास्त्राचे फारसे कौतुक नसेलही पण आमच्या सारख्या सामान्य लोकांसाठी हे शास्त्र खूपच महत्वाचे आहे. आजारी पडून मग त्यावर औषधोपचार करुन घेण्यापेक्षा लसीकरण केले आहे त्यामुळे आजार होणार नाही हा दिलासा मिळतो तेव्हा कृतज्ञताच वाटते. काही वर्षांपूर्वी इथे फ्ल्यूची जबरदस्त साथ आली होती आणि वॅक्सिन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नव्हती. आमच्या गावच्या हेल्थ ऑफिसरनी खूप प्रयत्न करुन विविध संस्थांना एकत्र आणून गावातील सर्वांना एका विकेंडला मोफत लस उपलब्ध करुन दिली होती. आमच्यासाठी ते ऑफिसर हिरो होते. आजही लोकं डॉकने कसे सगळे जमवून आणले म्हणून कौतुक करतात.:)

इब्लीस.......

"तर माझी शंका अशी, की तुमच्याच विषयाला 'आभाराला पात्र नसलेले शास्त्र' असे तुम्हीच का म्हणत आहात?"
या विषयाबद्दल वैद्यकिय विद्यार्थ्यांचा ऍटीट्युड काय आहे ते त्या विषयाला "पीळ शेवटच्या मिनीटा पर्यंत" वगैरे म्हणतात, तसेच करीअर म्हणून त्याची निवड करीत नाहीत यात तर दिसून येतोच, पण माझ्या या लेखातल्या त्या शंभरातल्या एकालाही प्रतिबंधक शास्त्रातचं एव्हढं मोठं कॉन्ट्रीब्युशन आठवू नये या विषादातून आलेलं आहे इतकंच !
-अशोक

डॉ. अशोक,

नमस्कार . . . .

शीर्षक वाचुन ईथे आलो, हा माझाही विषय निघाला, फक्त रस्ता वैद्यकीय शास्त्राचा आहे.

आम्ही आमच्या कार्यात जेव्हा कोणा कंपन्यांना आम्ही पद्धति ( Systems ), बनवुन देतो, तेव्हा हाच बाणा आम्ही वापरलेला असतो.

( प्रतिबंध ), Prevention Mechanism, आणी आमच्या भाषणांत वा कॉन्फरन्स मध्येही हेच आवर्जुन सांगतो कि the Scientists who invented vaccines or preventive measures to prevent specific diseases, are on a much greater level than the Doctors who cure it.

हे एक उदाहरण देतो आम्ही, कि prevention is better than cure.

म्हणुन हे ईथे विदीत करतो कि तुमच्या कार्य क्षेत्राच्या बाहेर आहेत आणखीन आमच्या कार्य क्षेत्रासारखे , जिथे तुमचे कार्याची दखल घेतली जातेच, पण उदाहरण म्हणुन, आणी जर ते उदाहरण बनत असेल तर नक्कीच पात्र ही आहेच. . . . Happy
शुभेच्छा . . . .

डॉक्टर अशोक,

>> ... देवी सारखा भयानक रोग या भूतला वरून समूळ नष्ट केलाय, नारू सारखा रोगही नष्ट झालाय ही
>> उपलब्धी कुणाला ही सांगावीशी वाटली नाही. प्रतिबंधक वैद्यकशात्राची ही कामगिरी कुणालाही दखल पात्र
>> अशी वाटली नाही !

नेमकं हेच तर प्रतिबंधशास्त्राच्या यशाचं लक्षण नाही? रोग इतक्या समूळ प्रमाणावर नष्ट झाला की त्याची स्मृतीही राहू नये!

अर्थात प्रतिबंधशास्त्राचं योगदान लोकांसमोर आणण्याचे मार्ग शोधले पाहिजेत, यावर दुमत नाही. जेणेकरून लोकांचं हितही साधलं जाईल. Happy

आ.न.,
-गा.पै.

"आभारास देखिल "पात्र नसलेलं" अदखलपात्र शास्त्र" अन धागाकर्ते डॉक्टर असा योग बघितल्यावर जरा कुशंकेनेच कीबोर्ड अन बोटे परजित धागा उघडला की असेल कैतरि ज्योतिषफितिषावर नेहेमीच उडवली जाणारी राळ Proud
पण विषय भलताच वेगळा निघाला. जे मांडले आहे ते कटू सत्य आहे. Happy
पण असे का?
तर माझ्यामते पाश्चिमात्य ज्ञानाबरोबरच त्यान्चेकडून आयात केलेली वाढीव उपभोगित्वाची अन त्याद्वारे विकासाची संकल्पनाच इथेही कारणिभूत असावी. रोग निर्माण झाला, अस्तित्वात राहीला तरच मेडिकल व्यावसायिक (उपचार/औषधेनिर्मिती) तगुन रहाणार ना? अन येवढ्या मोठ्या व्यावसायिक रित्या "गुन्तवणूक" केलेल्या वैद्यकीय विद्यार्थी शिकविण्याच्या अन औषधेनिर्मितीच्या व्यवसायास काटछाट देऊ शकणारा हा अव्यापारेषू व्यापार कोणते भान्डवलदार करतील? मग हवेच कशाला रोग प्रतिबंधक आणि सामाजिक औषध वैद्यक शास्त्र? आभार सोडाच, त्याचा उल्लेखही होणार नाही, त्यावर काही काम-संशोधनही होणार नाही, याची पुरेपुर काळजी खाजगी/सरकारी पातळीवर घेतली जाईल.