फोटोग्राफी स्पर्धा.. जुलै.."पाउस..आयुष्याचा सोबती" निकाल

Submitted by उदयन.. on 4 July, 2013 - 05:03

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " जुलै " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

जुलै महिना म्हणजे हमखास पावसाळी वातावरण..धुवांधार पाउस..ओले रस्ते..सर्वत्र हिरवळ..भिजण्याचा आनंद आणि गरमागरम कोळाश्याच्या शेगडीवर खमंग भाजलेले कणिस आणि त्यावर लिंबु चा रस... एकच छत्री आणि भिजणारे दोघे जण..बाहेर तुफान पाउस आणि त्यात तोडकी छत्रीचा आधार..

आपली शाळा ..पाठीवर दफ्तर.. हाफ पँट ...एक जोरदार उडी बाजुला साठलेल्या डबक्यात..पाय चिखलात बरबटलेका..तोंडावर मनसोक्त समाधान..वर भिजण्याचे निमित्त...शिक्षकांचा ओरडा..भिजलेल्या अवस्थेत वर्गाबाहेर उभे राहणे...

लोकल ट्रेन.. .पावसाची साथ...तुषार झेलण्यासाठी उघडलेली खिडकी.. हमखास दरवाज्याजवळ असंख्य सुयांसारखे टोचणारे तुषार घेत उभे राहणे...

१) प्रथम क्रमांक :- रंगासेठ

सुंदर फोटो. भक्ति, प्रेम, निष्ठा.सर्व काही ह्या फोटोत सामावले आहे. आयुष्याची संध्याकाळ झाली, गात्रे थकली, तरी विठूची ओढ काही कमी झालेली नाही..भक्ति व प्रेमात कुठेही खंड पडलेला नाही. थंडी, वारा, पावसाची तमा न बाळगता हा वारकरी आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटायला निघाला आहे. चेहर्‍यावरचे भाव फारच सुंदर टिपले आहेत.

1st rangaseth.jpg२) द्वितीय क्रमांक :- इंद्रधनुष्यः पावसात चाललेला माणुस

हा फोटो एखाद्या छान अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग चा भास करुन देतोय. रस्त्यावर कोणीच नाहीये व हा एकटाच चाललाय. हाच फोटो जर का "Rule of thirds" वापरुन काढला असता तर आणखिन आवडला असता.

2nd indra.JPG

३) तृतीय क्रमांक :- R M D पावसाने टवटवीत हिरवंगार झालेलं भिजकं मन

मागच्या गडद पार्श्वभुमीवर हे हिरवंगार टवटवीत पान छान उठुन दिसते आहे... त्याच्या भोवतालची ती वेलींची साखळी व त्यावरचे थेंब त्याला आणखिनच ऊठाव आणता आहेत. त्याच्यावर पडलेला सुर्यप्रकाश व त्याची गडद पार्श्वभुमी ह्यामुळे त्याला थोडासा glow पण आला आहे.

3rd RMD.jpg

उत्तेजनार्थ क्रमांक -

१) अतुलनिय :- नेकलेस पॉईंट
ह्या प्रचित आकाश व जमिन almost "Rule of thirds" वर छेदली गेलीय. त्या नदीच्या वळणावर नजर सारखी फिरती रहाते आहे. जर नदीचे वळण crop न करता पुर्ण आले आते तर आणखिन मजा आली असती

UTTEJANART.JPG२) प्रसन्न : पाऊस हा ट्रेकर्स लोकांचा खास सोबती..
त्याच्या शिवाय ट्रेक ला मजाच नसते. सज्ज्ञ गडावरुन घेतलेल्या या प्रचित पावसाळी वातवरण आणि त्यामुळे वातावरणात आलेला कुंद पण जो आपण आयुष्यात कधिना कधि अनुभवतो तो छान कॅप्चर झाला आहे.

100_1704.jpgजिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

नियमः-

१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :

१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी"

२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"

३) फोटोग्राफी स्पर्धा.. मार्च.."भावमुद्रा"

४) फोटोग्राफी स्पर्धा.. एप्रिल.."चाहुल उन्हाळ्याची"

५) फोटोग्राफी स्पर्धा.. मे..."खेळ मांडला"

६) फोटोग्राफी स्पर्धा..जुन.. "कळत नकळत"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे अवघड दिस्तय प्रकरण. भर पावसात क्यामेरा बाहेर काढण्याचे धाडस होत नै, त्यामुळेच तर् मागल्या महिन्यात इतकेवेळा विषय समोर दिसूनही फोटो काढता आला नव्हता Sad पण असो.
प्रयत्न नक्कीच करणार. Happy
हव तर प्लॅस्टिकच्या पिशवीत क्यामेरा ठेवुन फोटो काढीन पण काढिनच Proud

लिंबुभाउ तुमच्या साठी पण एक मोठ्ठी प्लॅस्टीक ची पिशवी घ्या........... नाहीतर कॅमेरा राहिल सुका तुम्ही मात्र भिजाल Happy

DSCN3359.jpg
पाऊस पडताना खिडकीच्या जाळीवर जमलेले पावसाचे बिंदू.

अचानक जोरात पाऊस पडला. आणि पाहता पाहता त्या धबधब्याचे पांढरे पाणी चिखलमिश्रीत होऊन गेले. एका ठिकाणाहून पांढरे तर दुसरीकडून चिखलयुक्त पाणी वाहत होते.
DSCN3729_0.jpg

अरे च्यायला आधी सांगायचे ना...माझ्या पोराचा होडी खेळतानाचा फोटो इथे टाकला असता....
एकच फोटो पुन्हा चालेल का?

पावसाळा म्हणजे...

१. इरलं घेऊन भर पावसात घरी परतणारे खेड्यातले काहीजण

pavasala_MB.JPG

२. पावसाने टवटवीत हिरवंगार झालेलं भिजकं मन Happy

green_heart_MB.jpg

>>> माझ्या पोराचा होडी खेळतानाचा फोटो इथे टाकला असता.... <<< अरे हां यार. पण अजुन बिघडत नाही. नविन होडी करुन दे पोराला, पाऊस तर काय आहेच की! Happy
(अस सान्गु नकोस की आता पोर होडी होडी खेळण्याच्या वयाचे नाही, तस तर तू देखिल अजुनही होडी होडी खेळू शकतोस Proud हा.का.ना.का. )

बाहेर मस्त पाऊस कोसळतोय.. गाडी समोरील रस्ता धुक्यात कुढतरी गुडुप झालाय.. हातात कॅमेरा असला तरी बाहेर जाऊन क्लिक करणं अशक्य आहे.. आणि तो बघा.. आपल्याच नादात एकतारी चालला आहे.. मस्त पाऊस अनुभवत.

उदयन यांच्या परवानगीने ३ फोटो टाकत आहे.
१. मुळशी जवळ पावसात बैल जोडी नांगरत आहे.

Picture_15.JPG

२. भर पावसात शेतीची मशागत चालु आहे

Picture_16.JPG

३. भोरच्या रस्त्यावर असणारा सुंदर "नेकलेस पॉईंट"

_MG_3171.JPG

भरून आलेलं आभाळ नेहमीच तुझी आठवण करून देतं
कारण , तुझी आठवण आली की मलाही असचं भरून येतं **

bhooshi dam0.jpg

** ही चारोळी फार वर्शापूर्वी माबो वरचं वाचली होती . कोणत्या माबोकराची आहे आठवत नाही
पण तेन्व्हापासून कायम मनात घर करून आहे.
कधीही आभाळ बघितल की खरचं भरून येतं.

माझ्याकडूनही हा एक खारीचा वाटा Happy
अन मायबोलीकर कार्यकर्त्यान्ची कामाप्रती असलेली निष्ठा भर पावसातही कशी दृगोच्चर होते ते देखिल पहा.
DSCN2356 Pavsala-himya-chhatri.jpg

Pages