प्रौढ वयोगटासाठी कुठला विमा चांगला आहे

Submitted by हर्ट on 3 July, 2013 - 10:05

जर तुम्ही तीस ते चाळीस ह्या वयोगटात मोडत असाल तर कुठला देशी विदेशी विमा घेणे योग्य आहे ह्यावर माहिती हवी आहे. आभारी आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विमा नेमका कशासाठी हवाय बी?
गुंतवणूक म्हणून्,लाईफ रिस्क करिता, दोन्ही मिळून, मेडिकल बेनिफिट करिता ?

ज्या व्यक्तिसाठी विमा हवाय ती भारतात की परदेशात?
अवलंबून की कमावती?
या अनेक गोष्टींवर कुठला विमा चांगला ते ठरते.

बी
मनस्मि १८ यांच्या धाग्यावर ही सगळी चर्चा झालेली आहे. ती वाचलीत का ?
{ तुमचा धागे काढण्याचा हक्क आहेच. तेव्हां ही पोस्ट उडवू कि राहू द्यावी याबद्दल काही अतिहुषार लोकांचं येईलच )

विमा म्हणजे गुंतवणूक नव्हे. दोन्हीची मिसळ, वडापाव, आम्रखंड असलं काहीही करू नये.
विमा म्हणजे आपल्या पश्चात आपल्यावर अवलंबून असणार्‍यांची आर्थिक सोय करून ठेवणे.
गुंतवणूक म्हणजे आपल्यासकट आपल्यावर अवलंबून असणार्‍यांच्या भावी गरजांची तरतूद करणं.
विमा कंपन्यांच्या युलिप योजना हे दोन्ही देण्याचा दावा करतात. पण त्यासाठी ज्या कॉस्ट्स्/फीज तुमच्या पैशातून वसूल केल्या जातात त्यापेक्षा बर्‍याच कमी कॉस्ट्समध्ये शुद्ध विमा + शुद्ध गुंतवणूक(वेगवेगळे) साधता येते

मेडिक्लेम आरोग्य विमा एकेक वर्षासाठी (काही उपचार खर्च वगळून) रक्क म भरून करता येतो .मात्र पन्नाशीच्या आत सुरू करावा . स्टेट बैँकच्या खातेदारांना शंभर रुपयात फक्त अॅक्सिडंट संबंधी खर्चाचा विमा आहे .

बी, तुमच्या ह्या काही दिवसात ओपन केलेल्या धाग्यांना फॉलो केले तर पाथ्२इन्डिया सारखी माहीती मिळेल असं दिसतय Happy

पॉलिसीज ची नावे शोधून लिहीते. पण अरे ३० - ४० ला आजकाल प्रौढ समजत नाहीत. ४० इज द न्यू २० असे कायम ऐकू येते. तथापि ही लाइफ बिल्डिंग फेज असल्यामुळे खालील विमे आवश्यक आहेत.

आपली एल आय सी मधून

गृहस्वामी साठी जीवनविमा,
स्वामिनीसाठी जीवन विमा.

अपघात विमा - हा एस बी आय / सिटी बँक क्रेडिट कार्डासोबत येतो.

मुलांसाठी शिक्षणाची तरतूद करण्यासाठी विमे.

आरोग्य विमा. या वयात चालू केला तरी उपयोग ४० - ५० वयात होतो.

http://www.licindia.in/amulya_jeevan-I_benefits.htm

अनमोल जीवन किंवा अमूल्य जीवनचा प्लान घ्या. इतर इन्श्युरन्स प्लान च्या हप्त्याची चौकशी करा. उरलेल्या पैशात हेल्थ इन्शुरन्स घ्या आणि निश्चिंत व्हा.

तुमच वय ४५ गृहीत धरून एक कोटी रु. च्या विम्यासाठी २० वर्षांसाठी २० वर्षे हप्ते भरण्याच्या अटीवर दोन योजनांची तुलना करूयात.

जीवन आनंद ही सर्वात लोकप्रिय योजना आहे. अमूल्य जीवन ही टर्म इन्श्युरन्सची योजना आहे (पैसे परत मिळत नाहीत)

जीवन आनंद - वार्षिक प्रीमियम रु. ६,१९,००० / .
अमूल्य जीवन - वार्षिक प्रीमियम रु. ७६,००० /

विम्याची रक्कम किती असावी ? - एलआयसी कडे तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या साधारणपणे २२ पट इतकी विम्याची रक्कम ग्राह्य धरतात. तुम्ही कुठे काम करता, आर्थिक स्थैर्य आणि वाढ, रिस्क फॅक्टर्स किती आहेत, तुमचं स्वास्थ्य हे सर्व पाहून ती कमी जास्त होऊ शकते. रिस्क असल्यास रिस्क रायडर्सचा वाढीव प्रीमियम भरून पूर्ण विमा उतरवता येतो. याउलट
आपल वार्षिक उत्पन्न वजा टॅक्सेस आणि घर खर्च इत्यादी वजावट धरून जे उत्पन्न येतं, त्याच्यात घर, एनएजमीन, शेतजमीन, शेअर्स, सोनंनाणं, शिक्षणासाठीची तरतूद, गव्हर्नमेंट बाँडस यांची तजवीज करून शिल्लक रकमेचा विमा उतरवणे आणि तो वाढवत नेणे हा लोकप्रिय पर्याय आहे.

ऑनलाईन टर्म प्लॅन्स बरेच स्वस्त आहेत (विमा कंपनीला एजंट कमिशन द्यायला लागत नसल्याने अ‍ॅक्विजिशन कॉस्ट कमी असते)
४५ वर्ष/ हेल्दि/नॉन स्मोकर व्यक्तीला २५ ते ३० हजार प्रिमियम मधे १ कोटी चा विमा क्रिटिकल इलनेस / डिसेबलीटी रायडर सकट मिळु शकतो. उरलेले ५०-५५ हजार डेट फंडात गुंतवले तरी ते विम्यापेक्षा उत्तम परतावा देतील

जीवन आनंद मधे २० लाख ही विम्याची रक्कम असेल, तर तुमच्या प्लानची मुदत संपल्यानंतर तुम्हाला सर्वायवल बेनेफिट मिळतो. पण २० लाखाचा विमा १०० व्या वयापर्यंत किंवा मृत्यूपर्यंत चालूच राहतो. १०० च्या आत मृत्यू झाल्यास तुम्ही निश्चित केलेली विम्याची रक्कम वारसाला मिळते. यासाठी फक्त प्लान चालू असेपर्यंतच पैसे भरायचे असतात. त्यानंतर नाही.

( टीप मी विमा प्रतिनिधी नाही :). माहिती पडताळून घेणे. इतरही कंपन्या आहेत. )

पाटील. टर्म इन्श्युरन्स मधे एजंटचं कमिशन अतिशय कमी असतं. त्यामुळे एजंट हा प्लान कधीच कुणाला सांगत नाहीत.

मस्तच आहे जीवन आनंद.
http://www.licindia.in/endowment_005_illustration.htm
१ लाखाच्या इन्शुरन्ससाठी २५ वर्षांत एकूण १,१३,३७५ प्रिमियम भरायचा. २५ वर्षे जगलात तर १ लाख नक्कीच परत मिळतील. एलायसीला गुंतवणुकीवर द.सा.१० टक्के परतावा मिळाला तर तुम्हाला एकूण चक्क २,४१,००० परत मिळतील.

याउलट तुम्ही प्रतिवर्षी ४५३५ (वार्षिक प्रिमियमची रक्कम ) ८ टक्के व्याजाने गुंतवलीत तर २५ वर्षांनंतर फक्त ३,३१,००० परत मिळतील.

अमूल्य जीवन अगदीच उपयोगाची नाही. एकही पैसा परत मिळणार नाही. सगळे पैसे फुकट.

भरत, बरोबर. एकही पैसा मिळणार नाही परत. कारण तो प्युअर इन्श्यरन्स आहे. वर दोन्हीच्या प्रीमीयम मधला फरक दाखवला आहे.
लाईफ प्लान २० वर्षे, हप्ते भराण्याची मुदत - २० वर्षे (वार्षिक), विमा रक्कम - १ कोटी.

जीवन आनंद - वार्षिक प्रीमियम रु. ६,१९,००० / .
अमूल्य जीवन - वार्षिक प्रीमियम रु. ७६,००० /
==============================
फरक - रु ५,७३,००० वार्षिक. २० वर्षातली बचत- रु. १,१५,२०,०००
दरवर्षी अगदी बँकेच्या ८ टक्के स्कीममधे गुंतवले तरी मूळ मुद्दल + आठ टक्के + पुढच्या वर्षीची बचत हे वीस वर्षे गुंतवत जायचे. बघा बरं करून. (गणितात मी कच्चा आहे )
आणि फिक्स्ड डिपॉझिट मधे गुंतवणे हा एकमेव ऑप्शन नाही. (इतर कंपन्यांचा टर्म इन्श्युरन्स याहीपेक्षा स्वस्तात पडतो. पण एसबीआय, एचडीएफसी वगळता वीस वर्षे मार्केट मधे कोण तग धरून राहील याबद्दल कल्पना करता येत नाही).

एलायसीला गुंतवणुकीवर द.सा.१० टक्के परतावा मिळाला तर तुम्हाला एकूण चक्क २,४१,००० परत मिळतील. >>

हा परतावा म्हणजे बोनस बद्दल बोलताय का ? एलआयसी विमाधारकांना आपल्या नफ्यातून बोनस देत असते. दसादशे व्याज नव्हे. हा बोनस दर हजारी असतो. त्यात अनेकांचा गोंधळ होतो. जेव्हां तुम्हाला १० टक्के बोनस सांगितला जातो तेव्हां तो दर हजाराला दहा असा त्याचा अर्थ होतो. हा बोनसही त्या त्या वर्षाचा जमा होतो. तुम्ही ही १० टक्के रक्कम कशी काढली हे समजत नाही.

माझ्या पोस्टमध्ये एलायसीने केलेल्या हिशोबाची लिंक आहे. १० टक्क्याने २,४१,००० मिळतील असं एलायसी म्हणतेय. ते कसं ते तपासायची गरज मला वाटत नाही. वार्षिक प्रिमियमच्या रकमेतून लाइफ कव्हरचा+ एलायसीचा स्वत:चा खर्च (ज्यात एजंटांचं नाममात्र कमिशन आलं) भागवून उरलेली रक्कम ते गुंतवणार. त्यावर त्यांना १० टक्के परतावा मिळणार.त्याच लिंकमध्ये दुसरा अंदाज ६ टक्क्याचाही आहे. हे सगळं अर्थात जर-तर आहे.(एलायसीच्या म्हणण्याप्रमाणे आणि ते योग्यच आहे. पंचवीस वर्षे परताव्याचा दर काय राहील हे मुक्त व्याजदरांच्या अर्थव्यवस्थेत+ इक्विटीमार्केटमध्ये कोणीही सांगू शकत नाही).

भरत
सिनॅरियो १ - ६% आणि आणि सिनॅरियो १०% याबद्दल सहमत आहे.

नाममात्र कमिशन - जीवन आनंदचं कमिशन ३५% पहिल्या वर्षाला, दुस-या वर्षाला १०% आणि तिस-या वर्षापासून २% शेवटपर्यंत आहे. वरच्या एक लाखाच्या पॉलिसीमधे अमूल्य जीवनचा हप्ता किती बसेल ते मिळत नाहीये ( लिंक चालत नाहीये आता). पण तो खात्रीने हजाराच्या आतच असेल.

अमूल्य जीवन - कमिशन १% फक्त तीन वर्षे.

http://www.loksatta.com/arthvrutant-news/finance-watch-142459/
"वित्तीय नियोजन करताना अगदी मूलभूत गोष्टीही सहसा लक्षात घेतल्या जात नाहीत. यासंबंघाने बहुतांशांकडून अभावितपणे होणाऱ्या चुका ठरावीक पठडीतल्याच आहेत. अशा ठळक सहा घोडचुकांचा हा मागोवा......
गुंतवणुकीच्या बाबत आपण अनेक जणांवर नको तितका विश्वास ठेवतो. जीवन विमा विक्रेता.हा एक तर नातेवाईक असतो किंवा जवळचा मित्र. किंवा जवळच्या मित्राचा मित्र. त्यामुळे साहजिकच तो विश्वासातला असतो. त्याच्यासाठीही विक्रीचे लक्ष्य दिलेले असते. त्याची पत ही त्याने कंपनीकडे जमा केलेल्या प्रीमियमच्या रकमेवर ठरविली जाते. त्यामुळे जास्तीत जास्त प्रीमियम गोळा करून आपली पत आणि आवक वाढविणे हे त्याचे ध्येय असते. विमा इच्छुकाच्या दृष्टीने विमा छत्रापेक्षा प्राप्तिकर वाचविणे आणि गुंतविलेले पसे परत मिळविणे या गोष्टींना जास्त महत्त्व असते. परिणाम: ज्या विमा योजनांमध्ये विक्रेत्यांचे आणि कंपनीचे भले आहे अशा 'एन्डाऊमेंट' विमा योजनांची विक्री जास्त होते. विमा इच्छुकाच्या फायद्याच्या 'प्युअर टर्म' योजनांची विक्री अगदी नगण्य असते."

लोकसत्ताच्या त्या लिंकमधला एण्डॉवमेण्ट आणि टर्म इन्श्युरन्सचा भाग महत्वाचा आहे. पण बाकिचा लेख हा एखाद्याला कुठलाच निर्णय घेता येऊ नये अशा पद्धतीचा आहे. विशेषतः पोस्टाच्या गुंतवणुकीबाबत आपण किती रिस्क घेत असतो याची कल्पना नाही हे विधान बुचकळ्यात पाडणारं आहे. रिस्क नसलेल्या योजनात पैशांची किंमत कमी होणार हे उघड आहे. जास्त रिटर्न मिळण्यासाठी हाय रिस्क घ्यावी लागते हे ही उघड आहे. हाय रिस्क हाय गेन हा वाकप्रचार प्रचलित आहे. यातला रिस्क हा शब्द बोलका आहे. आणि रिस्कच घ्यायची नसेल तर कमी परतावा मिळतो हा मार्केटचा साधा नियम आहे. लोकांना ही माहिती सकारात्मक पद्धतीने मिळायला हवी. गेल्या कित्येक पिढ्यांचा इतिहास काढला तर सोने आणि जमीन या गुंतवणुकींतून चांगला परतावा मिळतो. सोनं आंतरराष्ट्रीय बाजाराच्या मर्जीवर अवलंबून असतं हे मान्य केलं तरी लाँग टर्म मधे ती सुरक्षित आणि किफायतशीर गुंतवणूक ठरते. सोनं नॉनप्रॉडक्टिव्ह असल्याने खेळतं भांडवल अडकून पडतं. पण ते तर फिक्स्ड डिपॉझिटमधेही अडकून पडतं. तसंच लग्न आदि कार्याच्या वेळी उपयोगी पडते. जमीनीच्या बाबतीत कुठे गुंतवणूक केली असता जास्त परतावा मिळेल याची चाचपणी करून आणि कायदेशीर बाबी पाहून केलेली गुंतवणूक अनेकांना लाभदायी ठरली आहे. न बघता केलेली गुंतवणूक नुकसानीत जाते यात नवल नाही.
कॅल्युलेटेड रिस्क कशी घ्यावी याबद्दलचं मार्गदर्शन अशा लेखांमधे अपेक्षित आहे.

ती एक लेखमाला आहे. सगळेच मुद्दे एकाच लेखात येऊ शकणार नाहीत.
व्याजावर स्थिर दराने पैसे लावताना मूळ रक्कम परत मिळण्याची आणि व्याज दरातील बदलाची अशी दोन रिस्क्स असतात.
माझी गुंतवणूक काही वर्षांसाठी ९ टक्क्याने असेल आणि बाजारातले एकंदर व्याजदर चढे झाल्याने नवी गुंतवणूक १० टक्क्याने होत असेल, तर माझ्या रोख्यांची सेकंडरी डेब्ट मार्केटमधली किंमत त्या प्रमाणात घसरेल.
अर्थात पोस्टात/सरकारी रोख्यांत पैसे गुंतवणार्‍यांना हा तर्क लावणे तितकेसे बरोबर नाही(हे मान्य) कारण (१)त्यांच्या दृष्टीने मुद्दल वेळेवर परत मिळण्याची हमी व ठरलेल्या दराने व्याज मिळत राहण्याची हमी याच गोष्टी पुरेश्या असतात. (२) या गोष्टींना सेकंडरी मार्केट बहुधा नसते. त्या तुम्ही कोणाला विकू शकत नाही.
फारतर अधिक व्याजदर कमविण्याची संधी जाणे ही एक प्रकारची जोखीम म्हणता येईल.