नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉरी, दसऱ्याला नाही, 20 ऑक्टो. ला आहे लग्न. मला दसराच 20 ला आहे वाटलं होतं.
त्यापूर्वी श्री व आजीचे कडाक्याचे भांडण होणार (श्री) म्हणे.

मंगळवार दि.८ आक्टोबर २०१३ ~ अपडेट

~ आज प्रथमच श्री अग्रेसिव्ह भूमिकेत पेश केला गेला आणि त्याने मोठ्या तडफेने 'सायली' प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला [आय होप सो !]. सायली सहाही आयांच्या समोर आली आहे आणि "आम्ही लग्नानंतर यूएसए ला जाणार आहोत' असे जाहीर करते....सहाही स्त्रिया अर्थातच गोंधळात पडतात, पण त्याचवेळी वरून श्री दिवाणखान्यात येतो आणि सायलीला तिच्या खोटारडेपणाबद्दल 'बेअक्कल मूर्ख मुलगी' अशी दूषणे देतो. आपण आतापर्यंत काहीच न बोललेली वाक्य कशी या मुलीने या स्त्रियांच्या मस्तकात घातली आहेत हे तो सिद्ध करतो. शिवाय सायलीच्या नकळत रेकॉर्ड केलेले संभाषण तिच्यासह सर्वांना ऐकवितो....त्यात उघड होते की सायलीला लग्नानंतर या घरात सहा सासवांच्या समवेत राहायचे नाही....वरवर ती सासूंच्या कौतुकाचे बोलत असे पण केवळ श्री ला जिंकण्यासाठी मी तसे बोलत होते ही बाबही रेकॉर्ड झालेली आढळते. या सत्य उजेडानंतर सहाही स्त्रिया हातचे काही न राखता सायलीवर शाब्दिक भडिमार करतात....आणि नंतर आजीही तिला तू आता आमच्या घरी येऊ नकोस अशी सक्त ताकीद देतात....नैराश्येपोटी घराबाहेर निघालेल्या सायलीला श्री समजावणीच्या दोनचार गोष्टीही सांगतो.

दुसरीकडे अनिल आपटे पोलिसांचा प्रसाद खाऊन, जान्हवीची बसस्टॉपवर माफी मागूनही शशिकलाबाईला हॉटेलमध्ये चहासाठी बोलावून घेतो आणि ७० हजार रुपयांची धमकी देत पुन्हा एकदा जानव्हीच्या लग्नाचा विषय काढतो....शशिकलाबाई काहीतरी गयावया करतात....पण हा वाघ्या बधत नाही... इतकेच नव्हे तर "मी विषारी सर्प आहे....तेव्हा माझा मोबाईल नंबर टिपून घेताना विषारी सापाचा म्हणून तो नोंदवा...' अशी उर्मट सूचनाही करतो....आता यावर शशिकलाबाई हताशपणे तिथून निघून जातात.

"गोकुळ" मीटिंगमध्ये सहा आया एका बाजूला व श्री दुसर्‍या बाजूला....पाच आयांना आजी जान्हवीला का नकार देत आहेत याचा उलगडा होत नाही; म्हणून त्या मूकपणे श्री च्या बाजूने उभ्या आहेत; पण आजी आपल्या निर्णयाशी ठाम.....श्री ला अजूनही कळत नाही की कालपर्यंत जान्हवीला होकार देत असलेली आजी आज अचानकच का बदलली आहे ? शेवटी आजी आपल्या मताशी पक्क्या आहेत तर श्री ही शेवटी एका निर्णयाप्रत येतो आणि तितक्याच निर्धाराने सर्वांसमोर आजीला सांगतो, "जर जान्हवीशी माझे लग्न होणार नसेल तर मी या घरी राहू शकत नाही..."

हा निर्णय सर्वांसाठी असह्य असाच शाबित होणार हे तर स्पष्टच.

शेवटी आजी ऐकेल . तिला ऐकावंच लागेल आणि लग्न होईल. पण मग जान्हवीच्या आईच काय होणार? त्या अनिलने तिला धमकी दिली आहे ना ? Happy

आजी नेहेमी गोष्टी लपवून का ठेवते श्रीपासून, सरळ सांगायचेना जान्हवीची आई काय म्हणाली, त्यात काय न सांगण्यासारखे, अजूनही इतका वेगवेगळ्या प्रकारे सोक्ष-मोक्ष लागूनही ह्यांच्या नात्यात पारदर्शकताच नाहीये, कोड्यातच बोलतात आणि लग्न लांबवतात.

Dhanyavad Ashokmama! Kharach aaji dokyat jaatat agadi..saral sangun takava na Shri la ki Janhavi chya aai ne kaay sangitala te. Sangat ka nahit tya?

लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि दिग्दर्शक मंदार देवस्थळी तोकडे कुठे पडले असतील तर आजी आणि श्री यांच्या समजूतदारपणाच्या संवादात. या आधीही जान्हवीविषयी घरी येऊन काहीही खोटेनाटे सांगणार्‍या अनिल आपटेचे नावही त्या श्री ला सांगत नाहीत....केवळ हवेत 'तिचे लग्न झाले आहे....ती नवर्‍याला सोडून आपल्या अकांउंटन्टशी अफेअर करीत आहे...." आता आपला नातू ज्या मुलीच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे त्याला अमुक एक अनिल आपटे नामक इसम घरी आला होता त्याने ही बातमी सांगितली असे सांगता येत नाही ?

तिच गोष्ट शशिकलाबाईची....ह्या बाईला आपल्या नजरेसमोरदेखील आणू नये असेच आजी म्हणत असतात. त्यांच्या दर्जाविषयी त्यानी विघ्नेश्वराच्या मंदिरासमोर जाहीर उच्चार केलेला असतोच; मग अशी बाई आपल्याच बंगल्यात येऊन आपल्याच मुलीच्या चारित्र्याविषयी पहिल्याच भेटीत काय वाटेल ते अभद्र बोलते आणि आजी ते सारे ऐकून घेतात आणि चटदिशी विश्वासही ठेवतात.....बरे, ठेवला विश्वास...मग आता वाद सुरू झाला आहे घरात तर त्याच क्षणी श्री ला का सांगत नाहीत त्या...की, जान्हवीची आई इथे आली होती आणि तिने त्या मुलीच्या चारित्र्याविषयी काहीबाही वाईट सांगितले आहे....

पण नाही...निव्वळ कोणत्याही क्लृप्तीने एपिसोड वाढवित न्यायचे हेच प्रकार.

अशोककाका तुमच्या पोस्ट किती मुद्देसुद असतात. आवडते वाचायला. आणि तुम्ही इतर प्रेक्षकांचा विचार करून अपडेट उशीरा टाकता हेही खूप आवडलं. मी एपिसोड बघितला तरी तुमच्या पोस्ट सोडत नाही वाचायच्या. Happy

मामा, जान्हवीची आई एकांतात आजीला भेटून आधि श्रीची शपथ घालते कि जे काही ती सांगेल ते तिने त्यांना सांगितले आहे असे कोणालाही सांगायचे नाही. तसेच आजीकडून वदवून घेते कि श्रीची शपथ कोणाला सांगणार नाही.
पण तरी सुद्धा तिची आई घरी येऊन गेली याबद्दल देखिल कोणीच श्रीला सांगितले नाही.
नाही तेव्हा फालतू बडबड करतात या बायका!

लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि दिग्दर्शक मंदार देवस्थळी तोकडे कुठे पडले असतील तर आजी आणि श्री यांच्या समजूतदारपणाच्या संवादात.
>> एकदम बरोबर! + १

धन्यवाद मुलींनो....

तुम्हा सर्वांना हा अपडेट प्रकार पसंत पडला असल्यामुळेच मग मीही काही बाबी लक्षात घेऊनच त्याबाबतचा मजकूर इथे देत असतो...त्यातीलच एक भाग म्हणजे रात्री ११.३० नंतर टंकन करणे....तसाही मी बारापर्यंत जागा असतोच, त्यामुळे यासाठी फार काही त्रास होतो अशातील भाग नाही.

सोनाली ~ बरोबर मुद्दा....चला वादाकरीता मान्य करू की आजीने शपथ घेतली असल्याने श्री ला जान्हवीची आई इथे येऊन गेली आणि तिने जान्हवीच्या चारित्र्याविषयीच्या बातम्या सांगितल्या आहेत हे उघड केले नाही. पण त्याच सुमारास दोन आयाही तिथे असतात आणि त्याना तर हा शपथेचा प्रकार काहीच माहीत नसतो, त्यानी श्री ला 'जान्हवीची आई आली होती...' असे सांगणे संयुक्तिक दिसले असते....एरव्ही कधी श्री घरी येतो आणि कधी त्याच्यासमवेत आपला संवाद सुरू होतो असाच आविर्भात असतो सार्‍या बायकांचा..... म्हणून मी म्हटले की लेखिका आणि दिग्दर्शक तोकडे पडले ते अशा प्रकरणाला सुसंगत बनविण्यामध्ये.

लेकीन फिर भी चलता है.....शेवटी मालिका त्यांची आहे....आणि आपल्याला ती आवडली असल्याने... पाहतो आपण.

अन्जू....निलिमा ~ धन्यवाद.

अशोककाका तुमच्या पोस्ट किती मुद्देसुद असतात. आवडते वाचायला. आणि तुम्ही इतर प्रेक्षकांचा विचार करून अपडेट उशीरा टाकता हेही खूप आवडलं. मी एपिसोड बघितला तरी तुमच्या पोस्ट सोडत नाही वाचायच्या>>>>>>> +११११ Happy

थॅन्क्स...जान्हवी आणि अदिति....

झी नॉमिनेशन्स...मला वाटते ते १२ तारखेलाच त्यांच्या साईटवर प्रकाशित होतील....त्याच दिवशी अ‍ॅक्टर अ‍ॅक्ट्रेस साठी मतदान करता येईल, दर्शकांना....[असे वाटते]

बाकी शशांक आणि तेजश्री मालिका चालू असताना येतात नमस्कार करत आणि मतदानाचे आवाहनही करतात. जान्हवी तिच्या चाळीतच उभी आहे हे पाहताना बरे वाटते.

झी अ‍ॅवॉर्ड्समध्ये माझी सगळी मत या मालिकेला आहेत. काल नंदनने पण मतदानाचे आवाहन केले सहाय्यक भुमिकेसाठी त्याला नामांकन मिळाले आहे. मी त्यालाही मत देणार आहे. आयांसाठी जर सगळ्या सहाजणी उभ्या असतील तर माझ मत श्रीच्या छोटी आईला (लीना भागवत) भोळी भाबडी पण प्रेमळ व्यक्तिरेखा खूपच छान रंगवली आहे तिने

सुमारास दोन आयाही तिथे असतात आणि त्याना तर हा शपथेचा प्रकार काहीच माहीत नसतो, त्यानी श्री ला 'जान्हवीची आई आली होती...' असे सांगणे संयुक्तिक दिसले असते...>>> अगदी, माझ्याही हेच आलं होतं मनात

अशोककाका तुमच्या पोस्ट किती मुद्देसुद असतात. आवडते वाचायला. > + १
सिरियल बघता येत नाही ; पण हे वाचायला खूप मजा येते.

शुभांगी शशिकला बाईंपेक्षा आपटेभौ जास्त डोक्यात जातो.... तोच भारी आहेत व्हिलन म्हणुन.........

अशोककाका तुमच्या पोस्ट किती मुद्देसुद असतात. आवडते वाचायला. > + १

अशोककाका, गणपतिच्या सुट्टित घरी गेले होते तेव्हा मम्मी ही सिरियल पाहत होती. तिच्यामुळे मी पण तेथे ४-५ एपिसोड्स पाहिले आणि सिरियल आवडू लागली. पण इथे बेन्गलोरला परत आल्यावर माझ्या नोन-मराठी रूममेट्समुळे हि मराठी सिरियल रेग्यूलर नाही पाहू शकत.
पण रोज न चुकता तुमचे अपडेट्स वाचते त्यामुळे काहीच मिस्स नाहि होत. वाचायला खूप मजा येते.

येस्स आपटेभाऊ तर विनर आहेत ग. बाकी तांबडेबाबांचे शिष्य आहेत म्ह्णा कॉम्पिटिशन मधे Lol
पण शशिकला बाईंसमोर मोतीवाल्या बाई अगदीच बाळबोध वाटतात. Lol

आता आजी कसं बसं तयार होणार लग्नाला
मग जान्हवीचा छळ करणार काही दिवस
एपिसोडची संख्या वाढलीच ना? Wink
आधी या आया आजीवर विश्वास ठेवणार नाहीत...
मग एक दिवशी त्या जान्हवीला तिच्या मित्रासोबत पहाणार (त्याचं नाव मला आठवत नाहीये)
मग त्या पण जाच करणार..
एपिसोडची संख्या वाढली ना?

(असं नको होईला पण... दर्जेदार मालिकेची वाट लागेल Sad )

सर्व मुलींना धन्यवाद...

रावी....जरी अपडेट्स वाचत असला तरीही नियमितपणे सीरिअल पाहाता आली नाही तरी शनिवारी तसेच रविवारी सार्‍या आठवड्याचे भाग झी वर प्रसृत होतात...रात्री १० नंतर...त्याचाही आनंद सलगपणे तुम्ही घेऊ शकाल.

स्नेहा.... काही तांत्रिक प्रॉब्लेम असेल तर सारे एपिसोड तुम्ही यू ट्यूबवर जाऊन 'झी मराठी' लिंकद्वारे एकत्रित बघा....छान अनुभव येतो....माझ्याकडूनही काही वेळा एखादा भाग हुकलाच तर मी तिकडेच जातो.... शिवाय जाहिराती नसल्याने सलगपणे भाग बघता येतो.

रिया ~ आजीचे पात्र आतापर्यंत समजूतदार स्त्री अशा रंगाने रंगविले असल्याने ती टिपिकल सासूसारखी नव्या सुनेला जाच करेल असे वाटत नाही....

तरीही पाहू या....आले देवस्थळींच्या मनी, काय करेल तिन्ही लोकीचा स्वामी ??

जान्हवीचा चाळीतील मित्र = मनिष

आजीला शपथ असली तरी आयांनी श्री ला सांगायला हवे होते जाह्नवीच्या आईचे म्हणणे>>>>१००० वेळा अनुमोदन.
पण अ‍ॅटलिस्ट, श्रीने सायलीचे बोलणे टेप केल्याच्या दुसर्या(च !!) दिवशी आया आणि आज्जी यांचं शंकानिरसन करून टाकलं की ती थापा मारते आहे, हुश्श. ह्याबद्दल दिग्दर्शकाचे मनापासून आभार....नाहीतर सर्वसाधारण मालिकांच्या गतीने म्हणजे....पुढील ४-५ आठवडे अंडी उबवल्यासारखं फक्त सिट ऑन द एव्हिडन्स....मग हमखास त्या सायलीला पत्ता लागणार आणि ती जंग जंग पछाडून तो इन्क्रिमिनेटिंग पुरावा नष्ट करणार..मग सगळं मुसळ केरात आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या..हरे राम..

असो.इथे लिहिणं योग्य नव्हे,गल्ली चुकली आहे, पण अ‍ॅवॉर्डांवरून आठवलं....सर्व मायबोलीकरांनी झी मराठी ला विनन्ती करायला हवी....एक अ‍ॅवॉर्ड कॅटॅगरी वाढवा म्हणून....झी मालिकांमधील सर्वात मठ्ठ / बावळट व्यक्तिरेखा :
नामांकनं सगळ्यांना माहित आहेतच....मंजिरी (तुतिमी),राधा, तिचा सोनुला..आपलं सौरभ (राहीबा)..झी मराठी कॅरॅक्टर्स वेलकम Wink

रच्याकने..... या मालिकांमधे एकजात सगळ्या लग्न झालेल्या मुली २४ तास साड्या नेसताना का दाखवतात? आजकाल कोणती लग्न झालेली मुलगी २४ तास साडीत असते?

या मालिकांमधे एकजात सगळ्या लग्न झालेल्या मुली २४ तास साड्या नेसताना का दाखवतात?>>

'एलदुगो' मधे मुक्ता बर्वे कुठे २४ तास साड्या नेसत होती?
'तुमाज'मधली कुठलीही मुलगी २४ तास साडीत दाखवलेली नाही.
Happy

Pages