नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कुठे कुठे रुमाल टाकून जागा अडवण्याची पद्धत (ऐकिवात) आहे. रुमाल टाकून जागा अडवायची , मग स्वतः येऊन बसायचं.

रूमाल टाकणे>> Wink

सध्या मायबोलीवर इंटरनेट एक्स्प्लोररमधून स्क्रिप्ट लोड न झाल्याने मराठीतून पोस्टी टाकायला अडचण येते आहे. प्रतिसाद खिडकीत एक इंग्रजी अक्षर टाकून, मग ती पोस्ट सेव करून पुन्हा एडीट केली की मराठीतून लिहिता येतंय. ही भानगड मी याच बाफवर काल दोनदा केली होती Wink आणि अगोने मला पकडलं होतं.
पण आज नवा शोध लागलाय की प्रतिसादात एक इंग्रजी अक्षर टाकून सेव करायच्याऐवजी 'प्रतिसाद तपासा'वर क्लिक केलं उघडणार्‍या पानावर पूर्ण स्क्रिप्ट लोड झाल्याने व्यवस्थित मराठीतून लिहिता येतंय.

.

रूमाल न वापरण्याचा शोध आज वापरण्याची संधी मिळाली हो, पण कमेंटची लिंक कशी द्यावी याचा शोध तुम्हाला लागलेला दिसत नाही असे दिसते Proud

याचा शोध तुम्हाला लागलेला दिसत नाही असे दिसते << नाही ना. तुम्ही लावलात तर आम्हीपण शिकू.. आहे काय अन नाही काय Proud

शुक्रवार दि. ४ आक्टोबर २०१३ ~ अपडेट...

~ आज अनिल आपटेने शशिकलाबाईला रस्त्यावर बोलावून घेतले आणि जगू की मरू असा विचार करायला भाग पाडले. "मी ते ७० हजार घेणार नाही....जान्हवीशी माझे लग्न झालेच पाहिजे. श्री च्या घरी जाऊन सांगा जे तुम्ही या अगोदरच्या १८ स्थळांच्या आईबापाना सांगितले होते, जसे जान्हवीचे बिल्डिंगमधील एकदोन मुलाशी संबंध होते..." ~ ही असली बनावट बाब शशिकलाबाईंच्याच सुपीक डोक्यातून निर्माण झालेली असते आणि त्या आता आपटेला सांगतात. आपल्या मुलीच्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडविणारी सावत्र आई पाहून आपटे म्हणतो, 'तुमचे नाव शशिकला आहे, पण प्रत्यक्षात तुम्ही ललिता पवार आहात...' यावर शशिकलाबाई संतापतात स्वतःवरच....मात्र निरुत्तर.

घरी येऊन त्या संतापाच्या भरात घरात अगोदरच्या मारामाराने हर्षभरित झालेल्या बहीणभावापैकी पिंट्याच्या मुस्काडात मारतात आणि तुमच्यामुळे आता माझा जीव जाणार असा कांगावा करतात...तिच्या त्या अवताराकडे सहस्त्रबुद्धे आणि जान्हवी दोघेही लक्ष देत नाहीत.

दुसर्‍या दिवशी श्री रितीनुसार सहस्त्रबुद्धे यांच्या घरी येतो....जान्हवीचे वडील आणि आई याना वाकून नमस्कार करून आशीर्वाद घेतो व "मी तुमच्या जान्हवीशी लग्न करू इच्छितो.. त्यासाठी आज इथे तुमची परवानगी मागण्यासाठी आलो आहे....' आई सोडता घरातील सारेच खूष...विशेषतः वडील...भाऊ तर रडूच लागतात....जान्हवीच्या दोन्ही डोळ्यातून आसवांचा पूर....अर्थात दुसरीकडे हसणेही चालूच. आईला मात्र यात आनंद घेता येत नाही....कारण आपटेची धमकी तिच्या डोळ्यासमोर नाचत असते. ती खुबीने श्री ला "तुमच्या घरात अशा संदर्भात प्रमुख निर्णय कोण घेते ?" असा प्रश्न विचारते, त्याला श्री उत्तर देतो "आजी...". शशिकलाबाईना तेवढेच हवे असते.

पुढे जान्हवीला तिथून घेऊन श्री बाहेर पडतो व तिला बॅन्केच्या दारात सोडतो....आता दोघांचे संवाद म्हणजे खेळकरपणाचे अंगणच...."बॅन्केत येऊन मी तुझ्य स्टाफला लग्नाची बातमी सांगून टाकतो...' असा प्रस्ताव श्री जान्हवीपुढे ठेवतो...पण जान्हवी हसून "आज नको श्री..." म्हणते व बाय करून ऑफिसमध्ये जाते.

उद्याच्या एपिसोडमध्ये जान्हवीची आई गोकुळ बंगल्यात येऊन श्री च्या आजीसमवेत बसलेली दाखविली आहे....म्हणजे इतरांपेक्षा ही शशिकला बया जान्हवीच्या लग्नातील मोठी धोंड ठरणार आहे हे मालिकावाल्यांनी ठरविले आहेच.

'तुमचे नाव शशिकला आहे, पण प्रत्यक्षात तुम्ही ललिता पवार आहात...'
>>>>>>>>>
शशिकला काय कमी व्हिलन होती ;-).
तिने पण डायलॉग मारायचा होता 'आपले टक्कल अनुपम खेर सारखे आहे पण टकला आत अमरीश पुरी आहे"

जान्हवीच्या बाबांचे काम करणार्‍या कलाकाराचे नाव काय? एकंदरीतच कलाकार खूप चांगले आहेत. पिंट्या, आई, बाबा, अनिल सगळेच मस्त काम करत आहेत. जान्हवी हसण्यापेक्षा रडण्याचा अभिनय जास्त चांगला करते.

सुमेधा....

जान्हवीच्या बाबाची भूमिका श्री.मनोज कोल्हटकर यानी केली आहे.

निलिमा....

शशिकलादेखील खलनायिकेच्याच भूमिका प्राधान्याने करीत होत्या....पण ललिता पवार ह्या सर्वार्थाने तसल्या रोल्समध्ये शोभून दिसत. बाकी 'अनुपम खेर अमरीश पुरी' असला शेरा शशिकलाबाई आपट्याला मारू शकत नव्हत्याच, कारण त्याच्यापुढे त्या हतबलच आहेत....पैशामुळे.

जान्हवीच्या बाबांचे काम करणार्‍या कलाकाराचे नाव काय?
नाव तर नाही माहित पण हा कलाकार अनुबंध नावाच्या सिरीअल मधे पण होता. सई ताम्हण्करचा मोठा भाऊ. त्यातही त्याची बायको कजाग होती. Happy

>>सध्या मायबोलीवर इंटरनेट एक्स्प्लोररमधून स्क्रिप्ट लोड न झाल्याने मराठीतून पोस्टी टाकायला अडचण येते आहे

मलाही २-३ दिवस तो प्रॉब्लेम येत होता.... शेवटी कंटाळून मी IE7 to IE8 अपग्रेड केले आणि प्रॉब्लेम सॉल्व झाला Happy

एकंदरीत श्री-जान्हवीचे लग्न लांबवण्याचे plans सुरु आहेत विविध कारणांनी, सध्या लग्नाचे मुहूर्त नाही आहेत बहुतेक, तसे पूर्वी तुळशीच्या लग्नानंतर लग्न कारायचेना, इथेपण तसेच करणार कि काय?

आदिति नाहिग, मी नाही लांबवत, मलापण लवकर अक्षता टाकायाच्यात श्री-जान्हवीवर, पण सिरीयलवाले काहीतरी खुसपटे काढत आहेतना रोज नवीन-नवीन म्हणून आपला अंदाज केला.

अन्जू....अदिति.... परवाच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये कुणी चैत्राली जोशी नामक लेखिकेने ह्या मालिकेचे वार्तांकन केले आहे....दिग्दर्शक मंदार देवस्थळीची मुलाखतही आहे. चैत्राली यानी मालिका किती लोकप्रिय झाली आहे याचा छान उहापोह केला आहे लेखात. चाळीतील चित्रण आणि सहस्त्रबुद्धे कुटुंबाची सर्वसामान्यांप्रमाणे जीवनशैली सार्‍यांना आवडली असल्याचे मागोव्यात दिसते. एक प्रवाह असाही दिसतो की मालिका 'लग्न होऊन चटदिशी संपू नये...' म्हणजेच देवस्थळी लग्न जितके लांबविता येईल तितके ते लांबविण्याचा प्रयत्न करतील.

जान्हवीची आई शशिकलाबाई [आशा शेलार] आणि लग्न न जमलेला अनिल आपटे [सतीश सलगारे] ही दोघे त्याबाबतीत जितकी विघ्ने आणता येतील तितकी आणणारच...[आणि आपण ती पाहात बसणार हेही खरेच !]

मागे कोणीतरी म्हटलेय तसे शशिकलाबाई आणि आपटे यांचे लग्न व्हावे अशी माझी फार्फार इच्छा आहे Happy

अशोककाका, माझ्याकडेपण मटाच येतो, माझा राहिला वाटते वाचायचा लेख, पण लग्न झाल्यानंतर सिरीयल संपेल असे मला वाटत नाही, आहेतना सहा जणी आणि त्यांचे प्रॉब्लेम्स, ते जान्हवीच सोडवणार म्हणून तर अजून सुटले नाहीत, आहेना वाव सिरीयल वाढवायला, तेव्हा लग्न कसे पटकन दाखवले तर बरे होईल.

ती कविता लाड असताना चार दिवस मधे काम करायला लागली. ती नंतर मेढेकर झाली, २ मुले झाली, मुलांची दहावी झाली तरी सासुचे दिवस संपतच नव्हते. तसेच आता जान्हवीचे होईल बहुतेक Happy रोहीणीबाईंना अंदाज आला असेलच एव्हाना.

वेल....तुझ्याही म्हणण्यात तथ्य आहेच म्हणा. सख्खा सासरा परदेशी गेला आहे भांडून....दुसरा सासरा स्वर्गवासी...तिसर्‍याला बाहेर काढले आहे आजीने....तर आत्या आपल्या नवर्‍याला कंटाळून माहेरी आली आहे... तर पन्नाशीला आलेली श्री ची मावशी 'अत्यानंद महाराजांच्या' चरणी सेवा अर्पण करून बसली आहे... अशा पाच तर्‍हा आहेतच घरी....म्हणजेच गोखलेंच्या घरी डोके ताळ्यावर असलेली एकमेव सहावी व्यक्ती म्हणजे आजीच. श्री आहे, पण तो उद्योगात.

याचाच अर्थ जान्हवीला सासुरवाडीत अगदी ढीगभर कामे असणारच....सार्‍यांच्या गाड्या त्या त्या स्टेशनला लावण्याची.... त्यामुळे लग्न लवकर लावतीलही.

अशोक काका, तुमच्या रोजच्या अपडेट्स बद्दल धन्यवाद.

शशिकलाबाई [आशा शेलार] , अनिल आपटे [सतीश सलगारे] , जान्हवीचे बाबा [मनोज कोल्हटकर] , पिंट्या , जान्हवी , श्री यांची कामे खरेच छान झालीत. गोकुळातल्या बायका मात्र डोक्यात जातात. तिथले बरेच प्रसंग मी फास्ट फॉरवर्ड करते. Happy

ईथे येऊन अपडेट्स वाचायला खरंच खूप आवडते. पण गेल्या आठवड्यात यायला जमलंच नाही. आता सगळे वाचून काढले.
अशोकमामा, तब्येतीची काळजी घ्या.

धन्यवाद मंडळी.... खरं सांगायचं झाल्यास अपडेट्स हा प्रकार तुम्हाला जितका आवडत आहे तितकाच तो इथे टंकणे मलाही भावतच आहे....त्याला कारण म्हणजे मालिकेतील पात्रांवर आपण सारेच प्रेम करू लागलो आहोत.

मात्र आज शनिवार दि. ५ आक्टोबर २०१३ चे अपडेट्स लिहिताना खंतच वाटते. त्याला कारण म्हणजे जान्हवीच्या आईने...शशिकलाबाईने...बेधडक गोकुळ बंगल्यावर एकटीने जाणे आणि श्री आजींच्या मनी जान्हवीच्या चारित्र्याबाबत संशय निर्माण करणे ही बाब पचनी पडली नाही. कथानकात ती स्त्री जान्हवीची सावत्र आई दाखविली आहे....पण प्रत्यक्ष जीवनात मी अशीही उदाहरणे पाहिली आहेत जिथे सख्खी आई करणार नाही इतके कल्याण सावत्र आईने आपल्या मुलींचे केले आहे [शिक्षण, नोकरी आणि लग्न ह्या आघाड्यावर]. समाजात अशा मालिका पाहताना जो प्रेक्षक वर्ग टीव्हीसमोर बसलेला असतो त्यामध्ये अशा सावत्र आयाही असणार हे दिग्दर्शकाला समजणे गरजेचे होते. पण हा भाग अत्यंत ओबडधोबड पद्धतीनेच रंगवायचा असा ठरावच जणू देवस्थळी आणि कंपनीने केला असल्याचे भासत होते. सबब त्या २०-२२ मिनिटांच्या एपिसोडमध्ये पडद्यावर जास्तीतजास्त वेळे आजी, शशिकलाबाई आणि अनिल आपटे यानीच भस्त केला...आणि विषय काय ? तर चाळीत जान्हवीच्या किती भानगडी होत्या, पण आता लग्नानंतर ती व्यवस्थित वागेल.... किती खोटेपणा एखाद्या आईने आपल्याच मुलीबाबत सासरच्या प्रमुख व्यक्तीशी करायचा ? या दरम्यान अनिल आपटे कानाला मोबाईल लावून बसलेला आहे रस्त्यावर....तर त्या दरम्यान त्याला डी.एस.पी. ऑफिसमधून फोन येतो...जान्हवीला त्रास देण्याच्या तक्रारीसंदर्भात...पण आपटे तसला फोन बकवास आहे म्हणून फोन करणार्‍याला शिवीगाळ करतो आणि बंद करतो....याची किंमत त्याला बहुधा चुकवावी लागेल असे चित्र दिसते. आज जान्हवी व श्री ला विशेष असे काहीच काम नव्हते.

मात्र शेवटी आजी श्री ला बोलावून घेतात आणि त्याला काळजीने सल्ला देतात, "श्री, बिथरून जाऊ नकोस; पण मी जर तुला जान्हवीशी लग्न करू नकोस असे सांगितले तर तू ऐकशील ?" असे विचारून त्याला चिंतेच्या आणि अंधाराच्या गर्तेत टाकणे हा प्रकार.

पाटीलसाहेब सहमत. मालीका हास्यास्पद होत चालली आहे. शशीकलाबाईंनी मौसीची भुमिका पार पाडली. Happy

मुंबईचे डिएसपी हल्ली फोनवरून समज देतात? एक हवालदार पाठवुन आपटेला पोलीस स्टेशनवर आणुन झापु शकत नाहि?

कठीण आहे.

होय राज..... डीएसपीना श्री थेट फोन करतो, ही बाब मान्य करता येईल कारण त्याच्या उद्योगातील नावलौकिकामुळे त्याचा तेवढा दबदबा झाला असेल....पण पोलिस यंत्रणेला त्याचा मोबाईल नंबर सापडतो, घरचा पत्ता मिळत नाही ही बाब अनाकलनीय आहे. शिवाय मुंबईतील पोलिसांच्या फोनला धुडकावून लावण्याची मग्रुरी आपटेच्या अंगी असू शकते ही बाबदेखील पटणे जड जाते.

पण मामा, आपटेला कुठे माहित आहे कि तो खरच पोलिसांनी केलेला कॉल होता....त्याला वाटतं कि कोणीतरी दुसराच पो.च्या नावाने कॉल करुन त्याला घाबरवायला बघतोय.

Pages