अधूरी एक कहानी...

Submitted by विनार्च on 2 July, 2013 - 00:53

लेकीचा नविन उद्योग. बाबाच्या मोबाईलमधे फोटोमुव्ही मेकर आहे याचा शोध तिला लागल्या बरोबर तिने केलेला त्याचा वापर
https://www.facebook.com/photo.php?v=605514456146412&set=vb.100000635908...
(
व्हिडियो कसा अपलोड करायचा ते माहित नाही म्हणून ही लिंक देतेय )

हा प्रकार भयानक आवडल्याने आम्ही सरळ मुव्ही बनवायची फायनल केल. आता आम्ही पडलो क्रियेटिव्ह न टॅलेन्टेड डायरेक्टर सो सगळी कॅरेक्टर्स आम्हीच बनवली... आपल निवडली Wink
तर स्टोरी साधारण अशी..... एक असते मुलगी हं

2013-05-20 16.11.35_0.jpg

आता हिरविन म्हटल्यावर हेयरस्टाईलची काळजीपण घ्यायला लागते भाऊ....
2013-05-20 16.11.48_0.jpg

साईझ झिरोचा जमाना हय Wink
2013-05-21 09.20.34_0.jpg

भरपूर फूटेज खावून हिरविनीचा फस्ट लूक झाल्यावर पुढची ईस्टोरी ... तिची आई तिला सांगते की आज्जी कडे जाऊन ही फ्रुट बास्केट देऊन ये..
ही आई
2013-05-21 14.49.51_0.jpg

आणि आज्जीच्या भुमिकेत आहेत....
2013-05-22 16.27.56_0.jpg

फ्रेन्डला बाय बाय केल्याबिगर आम्ही कुठ बी जात न्हाय म्हणून ही फ्रेन्ड
2013-05-22 16.27.22_0.jpg

अरे हो .... सांगायचच राहून गेल की ही एकदम वरिजन इस्टोरी असल्यामुळे आज्जीच घर जंगलाच्या पलिकडे आहे.. तर आपली हिरविन निघाली रमत गमत जंगलातून
2013-05-22 16.26.39_1.jpg

नाऊ अ‍ॅक्शन टाईम.... अचानक तिच्या समोर येतो जायंट डॉगी न म्हणतो ," आता मी तुला .. ( खावून टाकणार... वाटल ना पण असं नाही आहे कारण वर म्हटल्या प्रमाणे आम्ही व्हेरी क्रियेटिव्ह न टॅलेन्टेड डायरेक्टर आहोत म्हटल Wink ) जायला नाही देणार ..... हा हा हा आपल भ्वॉ भ्वॉ भ्वॉ "
2013-05-22 16.28.37_0.jpg

मंग हिरविन आपली अक्कल हुशारी वापरुन बरं का .... त्याच्या समोर सुपर कलरफूल चेंडू टाकते... न तो बसतो खेळत नी ही जाते पळत Happy
2013-05-22 16.48.41_0.jpg

पुढे तिच्या समोर येतो जायंट बनी. तो तिला म्हणतो ," मी तुला खावून टाकणार.... हा हा हा " ( इथे खावून टाकणारच आहे बर का.... कारण वर लिहीलेलच आहे की आता परत सांगू म्हणताय...)
मग ही बया भूकेल्या बनी पुढे गाजर टाकते न घेते आपली सुटका करुन
2013-05-23 14.37.53_0.jpg

(इथे नेमकी, आहे तितक्याच चिकन मातीत काम चालवावे लागेल अशी धमकी प्रोड्युसर कडून मिळाल्या कारणाने आमचा बनी मल्टी कलरमधे आहे... आपल्या टॅलेन्टवर संशय घ्यायच काम न्हाय Wink )

हिरविन पोचते आज्जीकडे न सगळीकडे आनंदी आनंद गडे Happy

तर असा हा आमचा पिक्चर आधी घरांच्या प्रश्नात अडकला (हिरविनीच आणि आज्जीच हो) ... लेगो ब्लॉक्सने प्रश्न सोडवल्यावर बॅग्राऊंडला काय बर पेंट कराव ? ह्यात सापडलाय गेला दिड महिना.... हा प्रश्न सुटायची काही चिन्ह दिसत नाही आहेत म्हणून निदान माबोवर फोटो तरी टाकावेत म्हणून हा प्रपंच Happy
बाकी जर कधी प्रश्न सुटलाच तर पिक्चरच फस्ट स्क्रिनिंग माबोवरच.... हे पक्क प्रॉमीस Happy
तस आमच दि एंड साठी "रोज" पण तय्यार आहे

2013-05-20 15.07.12_0.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लई भारी वाट्तेय ष्टोरी.. हिरवीण बी झ्याक हाय.. Happy
हापिसात लिंक बघता येणार नाही.. सांच्यापारी बाकी बगु

सहीये. लिहिलंय पण एकदम मस्त....

लेकीची कल्पनाशक्ती सॉलीड आहे. असाच अजून वाव देत रहा तिला.

वॉव, सगळी कॅरेक्टर्स मस्तच केली आहेत. प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं दिसतंय. बनी, भुभू आणि त्याचा चेंडूही क्युट आहेत. अनन्याला मोठ्ठी शाब्बासकी! Happy

साईज झिरो ..... Lol

खूप खूप धन्यवाद Happy
लिखानाच कौतुक केल्यामुळे मुठभर मास माझ्यावर पण चढल ( आधीच एक्सेस आहे Wink )

खूप खूप आभार.... Happy
इथल कौतुक पाहून मुव्ही पूर्ण करायची मनावर घेतलय, बघूया कधी होते रिलीज ते Wink