बृहन महाराष्ट्र मंडळ २०१३ उभ्या उभ्या विनोद...

Submitted by परदेसाई on 1 July, 2013 - 10:07
ठिकाण/पत्ता: 
बृहन महाराष्ट्र मंडळ अधिवेशन ..प्रॉव्हिडंस.. २०१३

उभ्या उभ्या विनोद ला नक्की यायचं हां.....

?: पहाटे, ९:३० ला? हसण्यासाठी?

मला माहीत आहे.. एवढ्या सकाळी मनुष्य वैतागलेला असतो. पण म्हणूनच हसण्याचं आमंत्रण देतोय..

?: पण ९:३० ही काय हसण्याची वेळ आहे का?

खरं तर हॉटेलमधून कसं बसं निघून पोहे/भजी शोधण्याची वेळ आहे. पण सोबत विनोदाची फोडणी...

?: पण तुमचे आधीचे विनोद ऐकलेत हो मी..

पण आता नवीन विनोद सांगतोय ना.. आधीच्या कार्यक्रमातला एकही विनोद नसतो...

?:पण मुलांचं काय कर? ट्यांना मरहाटी कळट नाही फार..

त्यांच्यासाठी इंग्रजी विनोदाची खास सोय आहे हो..

?: पण सगळे विनोद PG-13 असतील ना? म्हणजे बाहेर पांचटपणा करतात. पण आम्ही बरोबर असताना उगाच नको

आम्ही आमच्या मुलांनाही आणतोय. काळजी करू नका.. PG-13 सोडा अगदी घरगुती विनोद सांगतो

?: पण....

आता सबबी सोडा आणि तयार व्हा. जरा सकाळीच उठायला लागणार म्हटल्यावर किती कारणं सांगताय. A joke a Day keeps stress away... हे ऐकलंय ना?

?: पण ते Apple होतं बहुतेक आणि न्यूटन म्हणाला होता...

आत डोक्यात Apple पडलं म्हणून असं म्हणाला असेल. भोपळा पडला असता तर...

?: आं.

(तर नक्की यायचं .. काहीही कारणं चालणार नाहीत....)

UUV-2013.jpg

माहितीचा स्रोत: 
उ उ वि माध्यम प्रायोजक
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 6, 2013 - 09:30 to 10:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हिडिओ उपलब्ध करुन देणार का? >>> बघू.. व्हिडीयो आहे... शक्यतो देत नाही. पण शुभदा, कौस्तूभ, रणजीत, वैशाली बद्दल विचार करण्यात येईल.. Happy

<<<पण ९:३० ते १०:३० ही वेळ काटेकोरपणे पाळली.>>> हे खूप आवडलं. <<<< जवळपास १००० प्रेक्षकांचा हॉल पूर्ण भरला होता.>>>वा, वा छान!

Pages