संवेदनशील आणि सक्षम

Submitted by मामी on 29 June, 2013 - 14:13

गेले अनेक वर्षं, गेले अनेक महिने, गेले अनेक दिवस आणि अगदी ठळकपणे आज सकाळपासून विविध माध्यमांतून जे काही समोर आलं त्याबद्दलचं हे विचारमंथन आहे.

नुकत्याच वाचनात आलेल्या आणि सध्याच्या परिस्थितीत खर्‍याच परिकथा वाटाव्यात अशा या Six Fairy Tales for the Modern Woman. यातली तिसरी परिकथा वाचून हे असं खरंच होईल का? असं सारखं वाटत राहिलं .....

सकाळी मुंबई मिरर मधला शोभा डेंचा लेख अगदी पटलाच .....

आजच्याच चतुरंगमधला हा ही लेखही असाच खोलवर अस्वस्थ करून गेला .....

त्यातून नेमकं आजच क्राईमपेट्रोलमध्ये एका मुलाला 'नाही' म्हणणार्‍या मुलीला धडा शिकवण्यासाठी पळवून नेण्याची मानसिकता पाहिली.

काय करण्याची गरज आहे? कुठे कमी पडतोय आपण?

मला वाटतं समाजातल्या प्रगल्भ घटकांनी सर्व पातळीवर एकजूटीनं प्रयत्न करून इतरांनाही या विषयावर प्रगल्भ करण्याची गरज आहे. शाळांतूनही लहानपणीच मुलांना स्त्रीविषयक संवेदनशील बनवण्याची गरज आहे. घरी, समाजात वावरताना सभ्यपणा म्हणजे काय हे त्यांना कळायला हवं. आई आणि इतर मोठ्या वयाच्या स्त्रियांबरोबरच आपल्या बरोबर वावरणार्‍या इतर स्त्रिया - मैत्रिणी, कलिग्ज, आप्त, स्वतःची बायको - यांच्याशी संवेदनशीलपणे कसं वागावं याची शिकवण देण्याची गरज आहे. पुरुषासारखाच स्त्रीलाही नाही म्हणणाचा अधिकार आहे आणि तिच्या नकाराचा अर्थ 'नाही' असाच असतो हे सांगण्याची गरज आहे.

त्याचबरोबर स्त्रीयांनाही अधिकाधिक सक्षम बनवण्याची गरज आहे. आपली स्वतःची मतं असू शकतात, ही मतं पारंपारीक मतांपेक्षा वेगळी असू शकतात, त्या मतांमागे एक प्रगल्भ आणि तार्किक विचारसरणी असू शकते, आपण मतं ठामपणे मांडू शकतो, आपलेही काही हक्क आहेत, सतत इतरांच्या अपेक्षांची पूर्ती करण्याव्यतिरीक्त आपल्या स्वत:च्या व्यक्ती म्हणून काही अपेक्षा, इच्छा असू शकतात, त्यांची पूर्ती करणं हा गुन्हा नाही अशा अनेकानेक विषयांवर अजूनही उजाडायचंय.

समाज म्हणून तर आपल्याला प्रगल्भतेची साधी सुरवातही माहित नाही. परंपरा मोडल्या तर त्याचे परिणाम कोण सहन करणार? चालत आलेली, समाजातल्या सो-कॉल्ड आणि पारंपारीक पॉवरफुल घटकांना शक्तीप्रदर्शनाला सोईची अशी चौकट कशाला मोडायची?

'अशा थोड्याफार घटना होत राहतात. चुका त्या घटनांत बळी पडलेल्यांच्याच असतात.' ही विचारसरणी मुळातच चुकीची आहे हे सांगणं गरजेचं आहे.

समाजाला संवेदनशील कसं करता येईल? स्त्रीला अधिक सक्षम कसं बनवता येईल? सगळेच मिळून एका वेगळ्या पातळीवर अधिक समृद्ध जीवन कसं जगू शकू? असंख्य प्रश्न!

काही करता येईल का? आपल्यापुरते जरी छोटे छोटे बदल करू शकलो तरी सुरवात केल्याचं समाधान लाभेल.

चर्चा नेहमीच्या वाटेनं जाऊ नये अशी सदिच्छा प्रकट करते. खरोखरची तळमळ आणि त्याकरता काही ठोस विचार असलेली मतं इथे मांडली जावीत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या सगळ्यांची सुरुवात जन्मापासून व्हावयास हवी …आजही प्रत्येक घरात मुलांना निव्वळ शिक्षण दिले जाते मुलींना शिक्षणासोबत नैतिकतेचे शिक्षणहि दिले जाते…नैतिकता हि फक्त स्त्रियांनी पाळायची बाब नाहीये खरतर? मुलाला कमावता बनवला जाते…. फारफार तर त्याला (अम्मली पदार्थांचे) व्यसनं लागू नये एवढाच प्रयत्न केला जातो आणि एवढ्यात मुलांवरचे संस्कार संपलेत …. मुलींना मात्र कसे बसायचे, कसे चालायचे, कपडे कसे घालावे, कुणाकडे पाहून हसू नये, गळ्यातली ओढणी सुद्धा कशी घसरू देऊ नये…. घरातली कामं, मोठ्यांचा मान आणि काय काय ……… एवढ सगळं मुलींना शिकवतांना कुणा दुसर्याच्या बहिण लेकीवर ताशेरे ओढल्यास किंवा नजर वर करून पाहशील तर घराण्याची इज्जत काढशील अस कुणी का सांगत नाही त्यांच्या त्यांच्या घरातल्या मुलांना ……. मला वाटतं आजही स्कोप आहे …. नवीन पिढीने मनावर घ्यावे आणि निदान पुढल्या दहा वर्षानंतरच्या पिढीत तरी बदल दिसेल असे संस्कार आजच्या लहान मुलांना द्यावे……. पण त्याही पलीकडे 'संस्कार' या शब्दाचा गर्भितार्थ नीट प्रतिबिंबित व्हावयास हवा… नाहीतर आहेच ये रे माझ्या मागल्या … पिढी दर पिढी चालू आहेच ……

III.

Once upon a time a woman was approached by a drunk guy in a dark alley, but he was very polite, and explained that he had driven to the bar, but because he was responsible, he didn't want to drive home, but his cell phone was dead, so he asked the lady to call him a cab. She did, and he was grateful, and they said pleasant goodbyes before going their separate ways.

The End.
<<
ही ती तिसरी फेअरी टेल का?

असो.
या व्यतिरिक्त या धाग्यावर कोणतेही मत नोंदविणार नाही असे म्हणतो.

रांझणा पाहिलेला नाही, पण शोभा डेंचा लेख वाचल्यावर पहावा असंही वाटत नाही आता. हा पिक्चर बघून आता तरुणांमध्ये नव्याने स्टॉकिंगची लाट येईल.

स्त्री हि उपभोगाची वस्तू आहे आणि पुरुषापेक्षा तिचे स्थान कमी असावे हा संस्कार काळात नकळतपणे मनात रुजतो. आपल्या घरापासून सुरवात केली तर मुलीना सहजपणे पाणी आण, हे उचल अस सांगितलं जात,आपल्या घरात जरी आपण समानतेची वागणूक देत असलो तरी चित्रपट आणि इतर माध्यमातून एखाद्या स्त्रिला धडा शिकवायचा म्हणजे तिच्यावर अत्याचार करायचा, सूड घ्यायचा हे सहजपणे आणि भडकपणे दाखवलं जात. नकळत्या वयातल्या मुलांच्या कोवळ्या मनावर याचे परिणाम होत नाहीत का? आपल्याकडच्या भ्रष्ट तपास यंत्रणा आणि न्यायासाठी लागणारा वेळ यात काही सुधारणा होणार का ?

अत्याचारित स्त्री कडे बघण्याची आपली दृष्टी बदलायला हवी, हा प्रसंग एखाद्या अप्घातासारखा स्वीकारून तिला आयुष्यात उभा राहता यायला हवं. बलात्कार झाला म्हणजे सगळ संपल, आता पुढे काय हे बदलायला हव, अशा स्त्री ला स्वीकारून तिला आधार द्यायला आणि एक नॉर्मल आयुष्य जगायला एखाद्या पुरुशानेही पुढे यायला हवं. सध्या मी अमेरिकेत आहे आणि इथे हि गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. बलत्कार झालेल्या स्त्रियांना कमी लेखल जात नाही, त्यांची लग्न सुखी, संसार, मुल या सगळ्यांना सकारात्मक प्रसिद्धी दिली जाते. अत्याचारित स्त्रियांच्या दुखावर फुंकर घालायला हवी. आपल्याकडे दुदैवाने अशा घटना लपवाव्या लागतात कारण आपण त्या स्वीकारत नाही पुरुष उजळ माथ्याने वावरतो आणि बाईच आयुष्य उध्वस्त होत.

खूप दिवसापासून या सगळ्या उलट सुलट विचारांनी मी अस्वस्थ होते, त्यामुळे जस वाटल तस व्यक्त केलय, चूकभूल देणे घेणे.

मामी, उत्तम विषय. पण <<चर्चा नेहमीच्या वाटेनं जाऊ नये अशी सदिच्छा प्रकट करते.>> ही फार महत्वाकांक्षा झाली असं नाही का वाटत? इथे 'तशी' चर्चा झाली नाही तर बर्‍याच जणांना आत्मिक समाधान लाभत नाही....

माबोवरच इतकी असंवेदनाशील विधानं, अ‍ॅटिट्यूड्स पाहिलेत की मला हल्ली अतिशय सिनिकल वाटतं इथे अशा चर्चा करायला...
तेव्हा तुला मनापासून शुभेच्छा.

त.टी. शोभा डें ना आज जाग आली का? या आधी हिंदी सिनेमात असं कधी दिसलंच नाहीये का काय? १९६० च्या दशकापासूनच एकुणात ज्याची छेडछाड हिरॉईनला पसंत पडते तो हीरो आणि आवडत नाही तो व्हिलन असंच दाखवतात की.. ती छेडछाड कालानुरूप जास्त व्हायलंट, शारिरीक, अ‍ॅग्रेसिव्ह होत गेली आहे.

मला अमेरिकेतील मुलं काय पाहतात हे नक्की माहीत नाहीये, माझा मुलगा लहान आहे. पण भारतातील नातलगांची मुलं (वय सहा सात पासून पुढे) आरामात क्राईम पॅट्रोल वगैरे बघत असतात. अतिशय खटकतं मला ते. कोणालाही त्याचं काहीही वाटत नाही, सगळी फॅमिली बसून खून मारामार्‍या कश्या झाल्या ते बघत असतात. Uhoh
फॉर स्टार्ट्स, हे तरी थांबवलंच पाहीजे.

मामी, उत्तम विषय. पण <<चर्चा नेहमीच्या वाटेनं जाऊ नये अशी सदिच्छा प्रकट करते.>> ही फार महत्वाकांक्षा झाली असं नाही का वाटत? >> असे झाले तर मग ती मायबोली स्पे. फेअरी टेल होईल Happy

आपल्याला काही करता येईल का एवढाच प्रश्न असेल तर त्याचं उत्तर बहुतांशी हेच येईल की पुढची पिढी घडवताना जाणीवपूर्वक घडवणे. पण या अश्या घटनांमध्ये सामील असणारे कित्येक लोक आपल्या bracket बाहेरचे आहेत ज्यांना साधा सुसंस्कृतपणा माहीती नसतो. अश्या लोकांसाठी आपण खरंच काही करू शकतो का?

त.टी. शोभा डें ना आज जाग आली का?+१
स्वामिनाथन एस. अंकलेसरिया अय्यर यांचा लेख (डिसेंबर २०१२ मध्ये प्रकाशित झालेला.)

बाकी या विषयावर नव्याने, वर सगळ्यांनी लिहिलेल्यापेक्षा वेगळे लिहिण्यासारखे सध्यातरी काही नाही.

मयी, मीमराठी, rmd, बस्के ...... छान मुद्दे मांडले आहेत.

१. मुलामुलींना दोघांनाही जाणीवपूर्वक संस्कार केले गेले पाहिजेत.
२. नैतिकतेचे संस्कार आणि समानतेची वागणूकीची बैठक मुलग्यांच्या मनात लहानपणापासूनच घट्ट बसली पाहिजे.
३. अत्याचारीत स्त्रीबद्दलचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. कुटुंबपातळीवर, समाजपातळीवर आणि डॉक्टर आणि कायद्याचे रक्षक यांच्यात याबद्दल जागरुकतेची गरज आहे.
४. आपल्या आजूबाजूला वावरणार्‍या समाजातील इतर अनेक स्तरांतील घटकांना या प्रक्रीयेत सामावून घेणे गरजेचे आहे.

हे कसं साध्य करता येईल? काय अ‍ॅक्शन पॉइंटस घेता येतील? कुटुंबातून, शाळांतून, सामाजिक संस्थांतून, ऑफिसेसमधून राबवता येतील असे अ‍ॅक्शन पॉइंटस आपल्याला बनवता येतील का? ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणत्या साधनांचा उपयोग करता येईल?

उदा.
१. शालेय अभ्यासक्रमात नागरीकशास्त्रात या विषयावर भर देता येईल का?
२. सरकारतर्फे जाहिरात मोहीम सुरू करता येईल का?
३. या विषयावरची पथनाट्ये लिहून सामाजिक संस्थांना पुरवता येतील का?
४. आंतरजाल / फेसबुकसारखे माध्यम याकरता वापरता येईल का?

अजून विचार, कल्पना येऊ देत.

< १)शालेय अभ्यासक्रमात नागरीकशास्त्रात या विषयावर भर देता येईल का?>
नागरिकशास्त्राप्रमाणेच/पेक्षा भाषा विषयांत(ही). नववीच्या इंग्रजी माध्यमाच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात 'वाटेवरती काचा ग!' ही कविता आहे. दहावीच्या पुस्तकात विद्या बाळ यांचा, या विषयावरचा नसला तरी मुलांना विचार करायला प्रवृत्त करू शकेल असा एक पाठ आहे.

काल जीएसने फेसबुकवर ही न्यूज शेअर केली होती. ज्यांनी वाचली नसेल त्यांच्याकरता इथे काही भाग कॉपी पेस्ट करते आहे.

>>> Mumbai ka Gundaraj !

Inderjit Singh Bal, president of heavy transport sena( a shivsena outfit) attacks a woman injuring her badly, threatens her family and scotts free due to police inaction.
Dear Friends,
Past 3 days have been extremely traumatic for my family, all the things that you usually read in Newspapers, happening to “Other people”, My Wife Manisha & Us went through.
It started with a fight over a petty issue between 2 women from our society in which one woman slapped other Girl really hard on the face. When Manisha tried to intervene in victims defense and told her that such behavior cannot be tolerated in the society. The agitated woman Mrs Pawan Bal summoned her Husband Mr. Paramjeet Singh Bal & her Brother-In-Law Mr Inderjeet SIngh Bal (Who is President of “Heavy Transport Sena” a “Shiv Sena” outfit.).

On arrival Mr. Inderjeet Singh charged towards Manisha using abusive language and hit her very hard repeatedly with umbrella that he was holding in his hand, bruising her hand badly, then, he caught her hand and was about to smash her face with his fist when, one of the lady standing close along with Mr. Bal's mother tried to hold him back. He was in such a rage that he had to be held by few people to control.

By this time, I was informed about this & I arrived on scene to rescue Manisha, When I asked Mr. Inderjeet Singh why he had got involved in ladies argument and hit Manisha ?, he said that "This is how ladies are to be treated if they don't behave properly" at this time, his brother Mr. Paramjeet Singh Bal, caught me by my neck choking me and threatening me with dire consequences, if I take any action against them Or report the matter to Police. He further threatened that they have high profile contacts and they can finish anybody who opposes them.

This Bal family (Owning Bal Roadways), residing in our colony for past 20 years, has been regularly abusing and hitting people, however there is such a strong fear about them in the area, that people refuse to lodge any complaint. In fact it was only Me & Manisha who always took them head on for their non-compliance in society matters.

Now all the ladies in the colony are feeling highly insecure and they find it unsafe for women to even walk in the society.

After this, there was usual roller coaster ride of Police not registering FIR and only insisting on lodging normal NC, taking injured Manisha to municipal hospital for official medical report and standing there in long queue (Yes, even at 10:30 in the night), Then next day summoning all the contacts that one has and making Police agree to file proper FIR etc. etc.>>>

मामी,

भाऊ तोरसेकारांचे दोन लेख सापडले :

१. शाहरुखला सुपरस्टार आपणच बनवला ना?
२. तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरण

रांझणा पाहिला नसल्याने हे लेख कितपत लागू पडतात ते माहीत नाही. मात्र कलाकारांच्या/दिग्दर्शकांच्या अभिव्यक्तीवर निर्बंध असावेत का हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

आ.न.,
-गा.पै.

मामी:
अतिशय अप्रतिम धागा!!. संवेदनाशील आणि प्रगल्भ नागरीक घडवण हे सर्व पातळीवर आणि युद्धपातळीवर होण अत्यावश्यक आहे. घर, शाळा, समाज (यात मिडिया पण आला). हे सोप्प काम नाही पण होण अत्यावश्यक आहे. नाहीतर आपल काही खर नाही. एकतर्फी प्रेम आणि त्यातून होणारे भ्याड हल्ले (अर्थात मुलींच्या विरुद्ध जास्ती) ही एक सामजिक कीड आहे. एकतर्फी प्रेमाच बॉलीवूड ने केलेल उद्दातीकरण बघून तर संतापच होतो. पण हा काही नवीन ट्रेंड नाही. एकतर्फी प्रेम, हिरॉईन को सताना, फिर मनाना, उसका आखिर मे मान जाना हा बॉलिवूडचा जुना आणि हिट्ट (अतिशय किळसवाणा) फॉर्म्युला आहे. आणि बॉलीवूड्चा जन्-सामान्यांवरचा पगडा बघितला की तर मन कापत. सगळ्या जगाला "योग" ची सुरेख भेट देणारी भारतीय संस्कृती बॉलिवूड ने हाय़जॅक केली आहे हेच खर!

मात्र कलाकारांच्या/दिग्दर्शकांच्या अभिव्यक्तीवर निर्बंध असावेत का हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

कबूल आहे. स्वातंत्र्य (अभिव्यक्ती स्वातंत्र्य पण यात आल) आणि जबाबदारी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत!

दलित, शोषित, स्त्री, वंचित आणि कामगार या एकमेकांना पूरक चळवळींमधे एकेकाळी प्रत्यक्ष काम केलेले कार्यकर्ते नेटवर आहेत. पण ते लिहीत नाहीत असा अनुभव आहे. प्रत्यक्ष काम करतानाचे समाजाचे आणि व्यवस्थेचे अनुभव इतरांना वाचायला मिळावेत असं मनापासून वाटतं. काम करण्याची उर्मी असलेल्यांना त्यातून बरंच शिकता येईल.

सायो, गामा ... माहितीबद्दल धन्यवाद.

या विषयावर जनजागृती करता / स्वतःचंच मूल्यमापन करण्याकरता 'तुम्ही हे करताय का?' अशा धर्तीवर एक प्रश्नावली किंवा मुद्दे लिहून ते जास्तीतजास्त लोकांपर्यंत सर्क्युलेट करता येईल. या अनुषंगानं निदान व्यक्तीगत पातळीवर सजगता आणता येईल.

अशा प्रश्नावलीत कोणकोणते मुद्दे इन्क्ल्युड करता येतील?

<१. मुलामुलींना दोघांनाही जाणीवपूर्वक संस्कार केले गेले पाहिजेत.
२. नैतिकतेचे संस्कार आणि समानतेची वागणूकीची बैठक मुलग्यांच्या मनात लहानपणापासूनच घट्ट बसली पाहिजे.
कुटुंबातून, शाळांतून, सामाजिक संस्थांतून, ऑफिसेसमधून राबवता येतील असे अ‍ॅक्शन पॉइंटस आपल्याला बनवता येतील का?>

कुटुंबातचा विचार केला तर स्त्रीला घरात 'नाही' म्हणता येतं का? तिचा 'नाही' कसा घेतला जातो?
संस्कार जाणीवपूर्वक वगैरे करता येतात की आपल्या वर्तनातून आपसूक होतात? (विशेषतः संस्कारकर्त्यांच्या उक्ती आणि कृतीत अंतर असतं, तेव्हा)

मामी मस्त चर्चा

मुळात ह्याची सुरुवात घरातुनच झाली पाहिजे. घरी आपले बाबा आईला कसे वागवतात, आजोबा आजीशी कसे वागतात, शेजार चे काका काकुशी कसे बोलतात.. इ.इ ...मुलं सगळं अ‍ॅबझोर्ब करत असतात...

मुळात स्त्रीला समान समजणे घरातुन दिसले पाहिजे, आजुबाजुला दिसले पाहिजे.... मला हा अनुभव खुप येतो. मी अशा क्षेत्रात आहे जिथे स्त्रीयांपेक्षा पुरुष संख्येने जास्त आहेत. मेल डॉमिनेटिंग एरीया... दुर्दैवाने बर्‍याचदा.. "अरे ही पुढे चालली" हा अ‍ॅटिट्युड दिसतो. ह्यात "ही" ला एक वेगळा वास येतो.

"फ्रंट ऑफिस मे चिकनी लडकी रखो.. कोई चिल्लाता हुवा आयेगा तो उसको देखके थंडा पडना चाहिये" ह्या बॉस च्या कॉमेंट वर दात विचकुन हसणं आपण बंद करणार आहोत का? एखादा प्रॉजेक्ट मिळाला नाही तर " ब्युटिफुल लुकिंग गर्ल्स हॅव डन नथिंग?" असा शेरा ऐकुन आपण ओशाळं हसणं कधी बंद करणार....

समानता मनात असावी लागते. ती जाणीवपूर्वक आपल्या कॄति मधुन झळकावी लागते. आई रोज चहा करते , केर काढते ही बातमी आहे का?... बाबा केर काढतात, बाबा साफसफाई करतात.... ही "बातमी" होता कामा नये आंगवळणी पडलं पाहिजे.

आमच्याकडे बाबा सहजतेने घरात खुप कामं करत असतो. एकदा मुलीने डब्यात त्याने केलेला पदार्थ नेला. तिच्या वर्गात ह्या घटनेची "बातमी" झाली... तिला समजलच नाही काय वेगळं झालं ते... त्या वेळेस तिला समजावुन सांगताना आम्हाला खुप कसरत करावी लागली होती.

आई गर्ल चाईल्ड वाईट असते का? मग तिला किल का करतात पोटात असताना? मी बॉर्न झाल्यावर तू रडली होतीस का?----- मुलीच्या ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मला आणि बाबाला एक तास लागला.

हे प्रबोधन शाळा शाळा मधुन चित्रफिती, बौधिकं, परीसंवाद, भाषणे, ह्यातुन करणं गरजेचं आहे. स्त्री व पुरुष दोन समान आहेत हे ठाई ठाई मनावर बिंब्वलं गेलं पाहिजे. आर्थातच त्याची सुरुवात शाळा व घरातुन हवी.

शोभा डेंच्या लेखाची री ओढणारा बिझिनेस स्टँडर्ड मधला मिहीर शर्मा यांचा लेख
लेखकाला हिंदी चित्रपटांची आवद नाही हे बाजूस सारले तरी काही मुद्दे लक्षणीय आहेत.
But what really got to me, and dragged this column out of me, is the response of that director, Aanand L Rai - a man who should perhaps see a therapist for many reasons, but definitely because of his creepy obsession with the letter A. Here's Rai's eloquent defense: "Has she (De) seen Varanasi, felt its pulse? ...There's a life beyond metropolises that some people who have grown up in the metros cannot understand. And I don't see the need to explain myself to them. It's different cultural breeding. In a small town pursuing a girl until she says yes is a sign of true love." An awe-inspiring blend of ignorance and arrogance; it should thus come as no surprise to you that Rai grew up not in a small town, but in middle-class Delhi. It is people like that who once glorified the caste-ridden hells that are our villages; and now they pine for the imagined purity of our small towns. Nor is Rai alone. Here's a representative reviewer, Sudhish Kamath in the supposedly progressive The Hindu: "Yet, Kundan is as selfless a lover we can realistically find today, maybe if we looked in simple small towns uncorrupted by the ideals of intellect, progress and politics.

हिंदी सिनेमामुळे हे सगळे होते ही एक 'मिथ' आहे. सिनेमा तेच दाखवतो जे समाजात आधीच घडत असते, सिनेमा समाज घडवत नाही. >>

हा डिबेटचा विषय आहे. दुसरी बाजू थोडक्यात अशी दाखवता येईल कि बॉबी या चित्रपटाआधी घरातून पळून जाउन लग्न करण्याचं प्रमाण नगण्य होतं. बॉबीनंतर त्यात जाणवण्याइतकी वाढ झाली. सिनेमा हे अनेक लोकप्रिय माध्यमांपैकी एक प्रभावी माध्यम आहे. पूर्वी हिंदू - मुसलमान आमेन दाखवायचे तेव्हां विद्वेष जरा कमीच होता. पण नंतर अनेक माध्यमं आली. कुजबुज मेडीया हे देखील माध्यमच. या माध्यमातून दुहीची बीजं पेरली गेली. समाजात बदल स्वतःहून होत नसतात, त्यासाठी संप्रेरकांची गरज असते, ज्यात माध्यमं आघाडीवर आहेत. याखेरीज समाजात बदल होऊ नयेत म्हणून काही अंतर्गत माध्यमं कियाशील असतात. पण जेव्हां बदल आकर्षक वाटतो तेव्हां समाज तिकडे वळतो. खूप मोठा आणि गुंतागुंतीचा विषय आहे.

मस्त विषय मामी. आधी बोललं गेलेलं इथं परत बोललं जाणर पण काय हरकत आहे?
फार मुळापासून बदल होण्याची गरज आहे. आधी पण एक दोन धाग्यांवर लिहिल्याप्रमाणे, हे बाईचं हे पुरुषाचं असल्या मक्तेदार्या कशाला?
मीरा खूप छान लिहिलंत नेहमीप्रमाणे.
पुरुषांच्या mentality मधे फार फरक पडलेला अजून दिसत नाही. पण बायकांना मात्र त्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत हे दाखवायला हल्ली त्याच त्या जुन्या बकवास jokes ना appreciate करावे लागते. मीरा म्हणतायत तस्ले कमेंटस डोक्यात जातात तरी होत रहातात. बायकांना पण चालतो कि front desk वर handsome माणुस दिसलेला.
बायकांचे driving, त्यांचे नवर्यांचे bank balance तळाला पोचवणे, नवर्‍यांनी सैपाक करणे, धुणं भांडी करणे यावर किती दिवस हसणार आपण?
कधी आणी कुठं सुरुवात करणार समान जबाबदार्या घ्यायला? आणि अगदी जबाबदार्‍या divide करायच्या म्हटल्या तरी त्यात एकमेकांच्या कामाना, कर्तृत्वाला कमी लेखून कशाला?
grow up India!!

चर्चा मस्त सुरू आहे.
जेंडर बेस्ड कामाची विभागणी, गैरसमज, विनोद हे जगभर सर्वत्र होत असावे. पण हे ग्लोरिफाइड सताना, मनाना प्रकरण आपल्याकडे जास्त असावे.