विदुषक.....

Submitted by आनंद पेंढारकर on 29 June, 2013 - 13:14

डोळ्यांनी पारदर्शक सांगून जातेस बरंच काही

आणि दगडांच्या या देशात नेमकं हेच चालत नाही

उरामध्ये भावनांचे नकोस हळवे पक्षी पाळू

हलक्याशा धक्क्याने लागतात आसवं बनून गळू

दगड नाही बनता यायचं, पाणीतरी नितळ नकोस होऊ

हळवा तळ घेऊन मनाचा नकोस जगाला सामोरी जाऊ

अश्रूंनी सांगण्या सारखं मनामध्ये खूप असतं

पण इथं आसवांचं कुणालाच अप्रूप नसतं

दुनियेच्या या सर्कशीत फक्त हसायचं, हसवायचं

विदुषक बनून जगाला, स्वतःला देखील फसवायचं

आनंद पेंढारकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोळ्यांनी पारदर्शक सांगून जातेस बरंच काही
आणि दगडांच्या या देशात नेमकं हेच चालत नाही
.
उरामध्ये भावनांचे नकोस हळवे पक्षी पाळू
हलक्याशा धक्क्याने लागतात आसवं बनून गळू
.
अश्रूंनी सांगण्या सारखं मनामध्ये खूप असतं
पण इथं आसवांचं कुणालाच अप्रूप नसतं
.
दुनियेच्या या सर्कशीत फक्त हसायचं, हसवायचं
विदुषक बनून जगाला, स्वतःला देखील फसवायचं

मस्तय. आवडलेत. Happy