कामात येते ती फक्त माणुसकी....

Submitted by मी मी on 29 June, 2013 - 02:24

'जो पर्यंत आपल्या घरात, परिवारात, आपल्या आजू-बाजूला सर्व सुरळीत आणि सुखरूप असतं तोपर्यंतच माणसाचे जात-धर्म, आपला-तुपला, सख्खा-परका, हा गरीब तो श्रीमंत असे जास्तीचे चोचले असतात ....पण खरी वेळ आली कि यातले काहीही कामात येत नाही कामात येते ती फक्त माणुसकी....'

…. माणूस मरणाच्या रेषेवर उभा असतांना आणि मदतीचा पुढे आलेला हात धरतांना हा हात कुठल्या प्रांतातला, कोणत्या जातीचा-धर्माचा नात्यातला कि अनोळखी, पापातला कि पुण्यवान या सर्वांचा कितीसा विचार करत असेल…?? संकटाच्या काळी आलेला कुठलाही हात हा 'देवरूप' वाटत असेल तर मग सगळं सुरळीत चालू असतांनाच हे सगळे चोचले आपण का पाळत असतो?…… एकदा 'The Burning Train' हा सिनेमा पाहतांना मला हा प्रश्न पडला होता तेव्हा वय थोडं लहानच होतं पण आज उत्तराखंड मध्ये आलेली आपदा बघता पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिलाच….

दगडाच्या देवदर्शनासाठी निघालेले कित्तेक जण संकटात सापडले आहेत आणि आज त्यांच्या मदतीसाठी धावून येणाऱ्या कोणत्याही जात धर्माच्या माणसात देव पाहत असतील …कोणत्याही धर्माच्या अन जातीच्या माणसाने दिलेले पाणी अन अन्नावर क्षण अन क्षण जिवंत काढण्याची कवायत करत असतील…….

कोणत्याही असल्या दांभिक आणि समाजातल्या काही ढोंगी लोकांच्या लोभाच्या राजकारणाला बळी पडून स्वतःची कठपुतळी होऊ देऊ नये….सदसदविवेक बुद्धीने विचार करून आतातरी चुकीच्या पायंडाना मोडीत काढायला हातभार लावण्याचा प्रयत्न करावा …… किंबहुना नवीन विचारप्रवाह प्रवाहित तरी केला जावा … याशिवाय आपल्यासारख्या साधारण माणसाकडून समाज बदलासाठी खूप काही अपेक्षा तरी कुठे आहेत ? ….

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

+१

अश्विनिमामी, तुमच्याकडे डिफॉल्ट स्पेलचेक आहे का, म्हणजे माबोवरचे लेखातही चुका दिसतात का ? Happy

अश्विनी मामी …. धन्यवाद …… फार काहीही नाही बरेचदा चुका किंवा टायपिंग मिस्टेक आहेत हे लक्षात येऊनही बदल करण्याचा कंटाळा करते मी … चोचले हा शब्द मात्र चुकीचाच ध्यानात होता :))

कोणत्याही असल्या दांभिक आणि समाजातल्या काही ढोंगी लोकांच्या लोभाच्या राजकारणाला बळी पडून स्वतःची कठपुतळी होऊ देऊ नये….सदसदविवेक बुद्धीने विचार करून आतातरी चुकीच्या पायंडाना मोडीत काढायला हातभार लावण्याचा प्रयत्न करावा
<<
<<
प्रयत्न करावा म्हणजे नक्की काय करायचे?